चीनचे अवाढव्य धरण: पृथ्वीवर होतोय जडपणावर परिणाम

 चीनचे अवाढव्य धरण: पृथ्वीवर होतोय जडपणावर परिणाम

थ्री गॉर्ज डॅम चीनमधील सर्वात मोठं धरण आहे.हे धरण चीनच्या हुबेई प्रांतातील याँग्झी नदीवर धरण बांधले गेलेले असुन १९९४ मध्ये बांधावयास सुरू झाले तर २०१२ मध्ये यीचे बांधकाम पूर्ण झाले. २.३ किलोमीटर लांबीचे, ११५ मीटर रुंद आणि १८५ मीटर उंच असे हे जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण आहे. हे धरण बांधण्यासाठी अडीच लाख कोटींपेक्षा जास्त खर्च आला आहे.४ लाख ६३ हजार टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. चीनचे हे धरण अमेरिकेच्या हूवर धरणापेक्षा ११ पट अधिक वीज निर्मिती करू शकते.भारतातील धरणाची तुलना केली तर ते भारतातील सर्वात मोठे धरण उत्तराखंडमध्ये टिहरी धरण हे भगिरथी नदीवर आहे. हे धरण भारतातील सर्वात उंच धरण आहे. हे धरण२६० मीटर उंच आणि ५७५ मीटर लांबीचे आहे.यावरून चीनच्या धरणाचा अंदाज लावता येतो.

चीनचे अवाढव्य धरण: पृथ्वीवर होतोय जडपणावर परिणाम

या अवाढय धरणामुळे जलाशयात इतके पाणी साचले आहे की त्याचा पृथ्वीवरील जडपणावर परिणाम झाला आहे. यामुळे पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीने थोडा वेग मंदावला आहे. दिवसाची वेळ ०.०६ मायक्रोसेकँड्सने वाढली आहे, जेव्हा पृथ्वीची फिरतानाची गती कमी होत आहे, यामुळे दिवस थोडा जास्त झाला आहे. या धरणाच्या बांधकामामुळे उत्तर आणि दक्षिण ध्रुवदेखील आपापल्या ठिकाणाहून २-२  सेंटीमीटर अंतरावर गेले आहेत, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

 पृथ्वीच्या फिरण्यावर ह्या धरणाचा कसा परिणाम होऊ शकतो हे पाहुया: आपल्याला मोमेन्ट ऑफ इनर्शिया म्हणजेच जडत्वाच्या क्षणाविषयी समजून घ्यावं लागेल.“जडत्वचा क्षण (मोमेन्ट ऑफ इनर्शिया )”-

दिलेल्या अक्षांविषयी एखाद्या ऑब्जेक्टच्या जडत्वचा क्षण असे वर्णन करतो की त्या अक्षांबद्दलची कोनीय गति बदलणे किती कठीण आहे.वस्तुमानाच्या त्याच्या फिरण्याच्या अक्षांकरिता जितके जास्त अंतर असेल तितके हळू फिरते

पृथ्वीच्या फिरण्यावर त्याचा प्रभाव पडतो. जेव्हा पाण्याची पातळी जास्तीत जास्त असेल तेव्हा त्यामुळे एकूण ६३,६३२ कि.मी. क्षेत्रावर पूर येऊ शकतो. या जलाशयात सुमारे ३९.३ घन किमी (९.४३ घन मैल) पाणी असेल. त्या पाण्याचे वजन ३९ ट्रिलियन किलोग्रॅम (म्हणजेच ४२ अब्ज टन) असेल.त्या आकाराच्या वस्तुमानात बदल झाल्याने “जडत्वचा क्षण (मोमेन्ट ऑफ इनर्शिया )” म्हणून ओळखल्या जाणार्‍या घटनेमुळे पृथ्वीच्या फिरण्यावर परिणाम होईल.


समुद्रसपाटीपासून १७५ मीटर उंचीवर ३९ ट्रिलियन किलोग्राम पाणी वाढल्यामुळे पृथ्वीचा जडत्वचा क्षण वाढेल आणि अशा प्रकारे त्याचे परिभ्रमण धीमे होईल.त्याचा कालावधी कमी असेल. शास्त्रज्ञांनी मोजले की अशा वस्तुमानाच्या शिफ्टमुळे दिवसाची लांबी केवळ ०.०६ मायक्रोसेकंदने वाढु शकते आणि पृथ्वीला मध्यभागी अगदी थोडी अधिक गोलाकार आणि वरच्या बाजूला अधिक सपाट बनवु शकते. 

हे अवाढय धरण पाहता त्याचा पृथ्वीवर होणारा अल्पसा परिणाम असला तरी निसर्गावर हस्तक्षेप नक्कीच मानला जातो.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম