किती किती उपाय केले तरी ढेरी कमी होत नाही

 

किती किती उपाय केले तरी ढेरी कमी होत नाही

काय आहेत कारणं???

सुटलेले पोट आपले सुखवास्तूपण कितीही दाखवत असले तरी आजकालच्या ट्रेंडिंग फॅशन नुसार ‘आऊटडेटेड’ तर आहेच पण तुमचे तुमच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष दर्शवणारे आहे. पुरुषांमध्ये पोटाचा घेर ९० सेंमी. (३६ इंच) व महिलांमध्ये ८० सेंमी. (३२ इंच) किंवा त्यापेक्षा जास्त असणे धोकादायक आहे.सुटलेले पोट तुमच्या व्यक्तिमत्वाचे तीन तेरा वाजवते. अशावेळी नक्कीच तुम्ही निराश होता आणि पोट कमी करण्याच्या अगदी हात धूऊन मागे लगता.

किती किती उपाय केले तरी ढेरी कमी होत नाही

मित्रांनो हे मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढणारे पोट हळूहळू तुमची तहानभूक,तुमची झोप सगळे काही तुमच्यापासून हिरावून घेते याचीही काही गंभीर कारणे आहेत याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
चला तर जाणुन घेऊया
पहिले कारण आहे
दारू:जर्नल करंट ओबेसिटी रिपोर्ट्समध्ये प्रकाशित झालेल्या एका सर्वेनुसार वजन आणि पोटाचा घेर वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे तुम्ही अतिप्रमाणात करत असलेले मद्यपान आणि स्मोकिंग. तुम्ही तुमच्या मद्यपानावर आणि स्मोकिंगवर नियंत्रण ठेवले नाही तर ते नक्कीच तुमच्या पोटाचा आकार वाढवू शकते.
आहार: जंकफूड जास्त खात असाल तर ते तुमच्या पोटाची चरबी वाढण्याचे मुख्य कारण होऊ शकते.विकत आणलेल्या पाकिटबंद किंवा इतर कोणत्याही खाद्यपदार्थांमध्ये हायड्रोजनचं प्रमाण जास्त असतं. हे पोटाचा घेर वाढण्यास कारणीभूत ठरतं. त्यामुळे असे प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाणं कटाक्षानं टाळावं. आपल्या कॅलरीजचे सेवन कमी करण्याच्या प्रयत्नात, आपण आपल्या आहारातून आवश्यक सूक्ष्म आणि मॅक्रोन्युट्रिएंट्स देखील काढून टाकण्याची शक्यता आहे.
कमी खाण्यामुळे शरीरातील ऊर्जा योग्य प्रमाणात वापरली जात नाही आणि ती पोटाच्या बाजूने साठू लागते, पर्यायाने पोटाचा आकार वाढतो. अति तेलकट, तिखट, खारवलेले पदार्थ खाणे, जेवणाच्या वेळा न पाळणे यामुळे होणारे मंद पचन देखील पोटाची चरबी वाढवते.
व्यायामाचा अभाव: बैठ्या जीवन शैलीमुळे किंवा कामाच्या बैठ्या स्वरूपामुळे आजकाल व्यायाम न करण्याकडे सर्वांचा कल वाढला आहे आणि याचा परिणाम निश्चितच तुमच्या शरीरावर होतो आहे. यामुळे देखील पोटाचा आकार वाढत आहे. कामाच्या व्यापामुळे टाळला जाणारा व्यायाम लठ्ठपणाला आमंत्रण देतो.
     अनुवांशिक: कधी कधी लठ्ठपणा तुम्हाला तुमच्या आई-वडिलांकडून देखील गुणसूत्रांच्या रूपात मिळू शकतो. ज्यामुळे तुम्ही तुमचे रुटीन थोडे जरी बदलले तरी तुमची जाडी वाढू शकते. तेव्हा या कारणावर मात करण्यासाठी तुमचा आहार आणि सवयींवर तुम्हाला खूपसारे नियंत्रण ठेवावे लागते.
मानसिक आरोग्य : जर मानसिक आरोग्य ठीक नसेल तर शरीरात कार्टिसोस हार्मोन्सक्ची वाढ होऊन शरीरात बदल होतात याचा परिणाम म्हणून चरबीची अतिरिक्त वाढ होते.
पाणी: शरीराला पाण्याची आवश्यकता असते पण कमी प्रमाणात पाणी पित असाल तर अपचन सारख्या समस्या होऊन चरबी वाढते.
उपाय:
वजन नियंत्रित ठेवण्यात प्रथिनं महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे प्रथिनंयुक्त पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करणं गरजेचं असतं.भूक लागल्याशिवाय खाऊ नका. भूक खरी आहे का हे पाहण्यासाठी एक ग्लास पाणी सावकाश पिऊन १० मिनिटे थांबा! जर भूक तशीच राहिली तर जरूर खा! खरी भूक मारू नका. दोन जेवणांच्या मध्ये फक्त आणि भरपूर मोड आलेली कडधान्ये, कच्च्या पालेभाज्या व फळभाज्या आणि फळे खाणे योग्य. मुद्दाम पोट कमी करण्यासाठी म्हणून कुठलाही पदार्थ वज्र्य नाही. फक्त जे खायचे असेल ते जेवताना आणि योग्य प्रमाणात खा, याचबरोबर दररोज योगसाधना करणं आवश्यक आहे.व्यायाम + दररोज  १२ सूर्यनमस्कार हे शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्यादृष्टीनं फायदेशीर असतं. योग आणि योग्य आहार याचा समतोल साधता आला तर तुमचं शरीर सुदृढ राहील यात काही शंकाच नाही.
साखरेचं प्रमाण कमी करणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या शरीराला ग्लुकोजची गरज असते. पण, त्याचा अतिरेक घातक ठरतो. त्यामुळे योग्य प्रमाणात ग्लुकोज मिळण्यासाठी फळं खाण्यास प्राधान्य देऊ शकता. अचानक प्रमाण कमी करण्यापेक्षा हळूहळू नियंत्रणात आणावं. हा एक बदल पोटाचा घेर कमी करण्यासाठी
उपयुक्त ठरेल. रात्री झोपण्याआधी एक कप दालचिनीचा चहा पिण्याने पोटाचा घेर कमी व्हायला लागेल. रात्री झोपण्याआधी हळदीचं दूध प्यायला हवं. हळद सर्दी, खोकला यासारख्या व्हारल इंनफेक्शन मध्ये उपयोग येते. शिवाय हळदीमुळे पचन सुधारून वजन देखील कमी व्हायला लागतं. हळदीत ऍन्टीऑक्सीडेंट भरपूर असतं. ज्यामुळे शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर फेकले जातात. हळदीमध्ये कॅल्शियम आणि प्रोटिन असतं. ज्यामुळे झोप चांगली लागते आणि वजन कमी होतं.

आदर्श डायट प्लॅन
दिवसातून फक्त २ च वेळा जेवायचं.. जेव्हा भूक लागेल त्या २ वेळात पोटभर जेवायचे आणि जेवण हे ५० मिनिटांच्या आत संपले पाहिजे.. ५० मिनिटाच्या पुढे पाण्याशिवाय काहीही तोंडात टाकायचे नाही.. कडकडीत भुकेच्या २ वेळा ओळखायच्या त्या वेळात पोटभर जेवायचे.. ५५ मिनिटात जेवण उरकायचे..दोन जेवणाच्या मध्ये काहीही खायचं प्यायचं नाही.. पाणी सोडून..सकाळचा चहा आणि नाश्ता सोडावा लागेल.. सकाळी भूक लागत असेल तर सरळ जेऊन घ्या.. जेवण झालं की ५५ मिनिटांच्या आत चहा पिला तर चालेल
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম