तळसंदे येथील दुर्मिळ शेषशायी महाविष्णु मंदिर

तळसंदे येथील दुर्मिळ शेषशायी महाविष्णु मंदिर 


फेसबुक लिंक http://bit.ly/3hKvOIM

पेठवडगाव पासुन ८ किमी वर वाठार ते वारणानगर  रस्त्यावर तळसंदे हे गाव आहे.गावात एक प्राचिन तलाव आहे.त्यास विष्णु तलाव म्हणतात. हा तलाव गावाचं वैभव समजलं जातं.या भव्य तलावामुळे गावाला तळसंदे हे नाव मिळाले आहे. या तलावाच्या मध्यभागी श्री शेषशाही महाविष्णू मंदिर आहे.याचा उल्लेख पुराणात असुन पराशरऋषी व अनेक ऋषिमुनींनी येथे तपश्चर्या केली आहे.मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी असुन  हे मंदिर पुरातन मंदिरात मोडते.

तळसंदे येथील दुर्मिळ शेषशायी महाविष्णु मंदिर
प्रतितात्मक मुर्ती

तलावाच्या मध्यभागी असलेल्या या मंदिरात श्री महाविष्णू यांची शेषशाही रूपातील मूर्ती आहे. या मूर्तीच्या पायाशी भारत कन्या व कन्याकुमारी (शक्ती, आदिशक्ती) अशा दोन मूर्ती आहेत.

तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या या मंदिरात जाण्यासाठी दगडी शिळेचा पूल होता. पण सध्या सभोवती पाणी असल्याने दिसत नाही.मंदिराची उत्तर व दक्षिण बाजूची पूर्ण भिंत कोसळली आहे.आतील एका बाजूचा थरच कसाबसा अजून तग धरून आहे. मूर्तीचा कालावधी लक्षात घेतला, तर कित्येक वर्षांची ही मूर्ती जीर्ण होत चालली आहे. पुर्वी उन्हाळ्यात तलावातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर भाविकांना येथे जाता येत होते पण आम्ही गेलो तेव्हा (मे २०२२)  उन्हाळ्यात देखील पाणी असल्याने जाता आले नाही.यामुळे मुर्तिचा फोटो घेता आला नाही. पाणी असल्याने गावातील पुजारी व भक्त दररोज पोहत जाऊन पुजा सेवा पार पाडतात. 

तळसंदे येथील दुर्मिळ शेषशायी महाविष्णु मंदिर

मंदिराची पूर्णत: पडझड होत आली आहे. याकडे भक्तांसह ग्रामस्थ व स्थानिक नेत्यांचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.

तळसंदे गावातील लोक या तलावातील पाण्याचा वापर शेतीसाठी, अंघोळ व जनावरे धुण्यासाठी करतात.

तळसंदे येथील दुर्मिळ शेषशायी महाविष्णु मंदिर

मंदिराचा परिसर पाहता पर्यटनस्थळ म्हणून देखील विकास करता येण्यासारखा आहे. तलावात नौका विहाराची सुविधा निर्माण केली तर उत्तम निसर्ग पार्कमुळे गावच्या विकासासाठी उत्त्पन्नाचे साधन होईल. मूर्तीचे संवर्धन करणे,भाविकांना कायम स्वरूपी जाता यावे यासाठी पूल बांधणे,अशी अनेक कामे तातडीने केली पाहिजेत.

या पुराणातील प्रसिद्ध व अध्यात्मात मोठे महत्त्व आहे.  जिल्ह्यात श्री महाविष्णूची मंदिरे दुर्मिळ असुन  कमी प्रमाणात आहेत. याबाबत ग्रामस्थ व शासन उदासिन दिसुन येतात. 

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম