मिलिटरी जवानांचा विशिष्ट हेअर कट का असतो?

 

  मिलिटरी जवानांचा विशिष्ट हेअर कट का असतो? 

आपण केशकर्तनालयात गेल्यावर कारागिराचा ठरलेला प्रश्न असतो.'कोणता कट मारू?' 

मग आपणास हवा तो कट मारून आपली केस कापली जातात.या कटात फेमस कट म्हणजे 'सोल्जर कट' किंवा 'मिलिटरी कट'.काहीजण आवडीने हा कट मारून घेतात.पण मिलिटरी मध्ये शिपायापासुन मेजर पर्यन्त या विशिष्ट पद्धतीने केस कापली जातात. यामध्ये केस अगदी छोटे ठेवले जातात.ब्रिटिशांनी हा नियम मिलिटरी मध्ये केला असुन अजुनही या नियमात बदल नाही.

मिलिटरी जवानांचे हे छोटे केस पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की यांचे केस लहान का असतात? 

याची कारणे ठराविक असली तरी आपणास ती माहिती हवी. 

जवानांचा विशिष्ट हेअर कट का असतो?

लहान केस असले की, डोके कसे एकदम हलके वाटते. जवानांना बरयाच वेळी अंघोळीला वेळ मिळत नाही यावेळी या लहान केसामुळे फायदा होतो तसेच नदीनाल्यामध्ये जावे लागत असल्यास, पावसाळ्यात भिजल्यावर केस आोले राहुन आजारी पडण्याचा संभव कमी होतो. कारण केस खसखसा नाही पुसले तरी चालते.दुसरे एक कारण म्हणजे हेल्मेट वापरताना केसांचा अडथळा येत नाही.लांब केस प्रसंगी बाधा आणु शकतात.झटापटीच्या वेळी शत्रुच्या हाती केस लागले की,सगळे संपलेच समजा. शिवाय मोठे केस असले की, ते परत परत डोळयासमोर येतात व अडचणी प्रसंगी एकाग्रता भंग होते. 

सगळयात महत्त्वाची बाब म्हणजे सगळ्या जवानांचे एकसारखे केस स्टाईल असल्याने समानतेची भावना वाढीस लागते.व शिस्तही लागते. 

ही कारणे वरवर पाहता क्षुल्लक वाटत असली तरी लढाईच्या वेळी कोणताही अडथळा येऊन ते कारण बनु नये म्हणून मिलिटरी मध्ये केस लहान ठेवणे बंधनकारक केले आहे.आणि हा नियम जगातील बहुतांश देशाच्या मिलिटरी मध्ये बंधनकारक आहे.

लहान केसांचा फायदा असा आहे की ते जवानाच्या डोक्यापर्यंत पोहोचणाऱ्या हवेचे संतुलन राखण्यास आणि डोके थंड ठेवण्यास मदत करतात जेणेकरून तो कठीण परिस्थितीतही योग्य निर्णय घेऊ शकतो.पण हा नियम फक्त शिख जातीच्या जवानांना लागु नाही.
 2002/03 चा संरक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार भारतीय लष्करात मुस्लिम, हिंदू आणि ख्रिश्चनांना दाढी ठेवण्याची परवानगी नाही, असे नियम सांगतात.

 01 जानेवारी 2002 पूर्वी नियुक्ती/नोंदणीच्या वेळी ज्या मुस्लिम कर्मचार्‍यांनी मिशांसोबत दाढी ठेवली होती, त्यांनाच दाढी आणि मिशा ठेवण्याची परवानगी असेल. सेवेत रुजू झाल्यानंतर दाढी वाढवणाऱ्या मुस्लिम कर्मचाऱ्यांनी दाढी काढावी.असा नियम सांगतो. 

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম