भयंकर! प्रयोगामुळे डीएनए सुध्दा बदलले
१९९१ पर्यंत म्हणजे रशिया एकसंध होता तोपर्यंत जगात यूएसएसआर (union of soviet socialist republic) नावाचा देश अस्तित्वात होता.
या रशिया व अमेरिका दोन देशामध्ये कोल्डवॉर सुरू होते.दोन्ही देश महत्वकांक्षेने पछाडलेले होते.
पण १९९२ मध्ये एकसंध रशियाचे तुकडे झाले व त्यात सामील असणारे देश वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये वाटल्या गेले.
१९७० च्या दरम्यान यूएसएसआर (union of soviet socialist republic)मध्ये युक्रेन सिटि मध्ये (त्यावेळी युक्रेन रशियाचा भाग होता.) chernobyl ह्या ठिकाणी pripyat ह्या यूएसएसआर च्या सर्वात मोठ्या Dream City साठी लागणार्या वीजे साठी,V.I lenin atomic power plant निर्माण करण्यात आला होता.यामधुन प्रचंड प्रमाणात वीज निर्मिती करण्यात येणार होती. ह्या संपूर्ण प्लांट चे एकूण ४ यूनिट होते :-यूनिट १- १९७७
यूनिट २- १९७८
यूनिट ३- १९८१
यूनिट ४- हा १९८३ साली पूर्ण झाला.
अशातच २५-२६ एप्रिल १९८६ रोजी यूनिट ४ मध्ये एक प्रयोग चालू होता या प्रयोगादरम्यान काही वैज्ञानिकांच्या चुकी मुले वा कमी अनुभावा मुळे एक भयंकर स्फोट झाला. ह्या झालेल्या स्फोटा मुळे सर्वदूर प्रमाणाच्या बाहेर रेडियशन पसरल्या गेल्या. हे रेडियशन किरणोस्तर्जन इतके भयंकर होते की अग्निशामक दलाच्या जवानांचे डीएनए सुद्धा ह्या रेडियशनने बदलले गेले. त्यांचे डोळे अक्षरशः फुगले गेले होते.अतिभयंकर प्रमाणात लक्षणे दिसण्यात आली.
ह्या भयंकर प्रयोगामुळे संपूर्ण शहर हे हजारो वर्षासाठी उध्वस्त झाले. या प्रयोगात एकूण ६० लोकांना(सरकारी आकडा) आपला जीव गमवावा लागला होता.सुमारे ५००० टन वाळू स्फोटाच्या ठिकाणी टाकण्यात आली होती. आज सुद्धा ह्या ठिकाणी कोणीही वास्तव्य करू शकत नाही.हे संपूर्ण शहर हे विराण अवस्थेत आढळून येते.या ठिकाणी कोणताही जीव तग धरू शकत नाही.शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की पूर्वीच्या वनस्पतीच्या आजूबाजूचा प्रदेश 20,000 वर्षांपर्यंत राहण्यायोग्य नसेल.