पाऊस चालु असताना डिजिटल सेट टॉप बॉक्स’ अचानक बंद का पडतो?



पाऊस चालु असताना डिजिटल सेट टॉप बॉक्स’ अचानक बंद का पडतो?


बाहेर पाऊस पडत असतो म्हणून टी.व्ही. लावावा तर खराब सिग्नल मुळे टी.व्ही. न लागावा असा अनुभव तुम्हाला कधीतरी आलेला असेलच.उपग्रहामार्फत येणाऱ्या फ्रिक्वेन्सी (लहरी) पावसात  जड होतात आणि त्या तुमच्या सेट टॉप बॉक्सच्या एन्टीणा पर्यंत पोहोचू शकत नाही. थोडा जरी पाऊस पडला तरी आपल्या टीव्हीवर एक मेसेज येतो की, खराब वातावरणामुळे आपला सेट टॉप बॉक्स सिग्नल रिसीव्ह करू शकत नाहीये.

पाऊस चालु असताना डिजिटल सेट टॉप बॉक्स’ अचानक बंद का पडतो?

तुमच्या टीव्हीसेट ला जोडला गेलेला सेट टॉप बॉक्स एका एन्टीण्याद्वारे सिग्नल पकडतो. हे सिग्नल अंतराळात असलेल्या सॅटेलाइटच्या माध्यमातून येत असतात. हे सिग्नल तुमच्या सेट टॉप बॉक्स पर्यंत Ku Band फ्रिक्वेन्सी द्वारे पोहोचतात.

पाऊस चालु असताना डिजिटल सेट टॉप बॉक्स’ अचानक बंद का पडतो?

पावसात ह्या फ्रिक्वेन्सी जड होतात आणि त्या तुमच्या सेट टॉप बॉक्सच्या एन्टीणा पर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून पावसाळ्यात थोडी आद्रता वातावरणात पसरताच हे सिग्नल फ्रिक्वेन्सी पकडू शकत नाही. ह्याचाच परिणाम तुमच्या टीव्हीवर होतो. आणि त्याचा मेसेज तुमच्या टीव्ही स्क्रीनवर येतो.तसे पाहता डीटीएचची शिफारस केवळ दुर्गम स्थानांसाठी केली जाते.

 DTH तांत्रिकदृष्ट्या केबल टीव्हीच्या मागे आहे.डिजिटल केबलमध्ये वापरल्या जाणार्‍या फायबर ऑप्टिक केबलच्या तुलनेत डीटीएचमध्ये चॅनेल वाहून नेण्याची क्षमता कमी आहे.

ब्रॉडकास्टिंग सॅटेलाइट सेवा म्हणून इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन (ITU) ने वाटप केलेले फ्रिक्वेन्सी बँड आहेत

 

1.  10.7 - 12.75 GHz ITU क्षेत्र 1 (युरोप, रशिया, आफ्रिका) मध्ये

 2.  12.2-12.7 GHz ITU क्षेत्र 2 (उत्तर आणि दक्षिण अमेरिका)

 3.  ITU क्षेत्र 3 (आशिया, ऑस्ट्रेलिया) मध्ये 11.7-12.2 GHz

हे सिग्नल मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी बँडमध्ये प्रसारित केले जातात (MW वारंवारता 300 MHz - 300 GHz पर्यंत वाढते).जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा टीव्ही सिग्नल का मिळत नाहीत याचे कारण पाऊस व त्यामुळे होणारी आद्रता या घटनेमुळे आहे. रेन फेड म्हणजे प्रामुख्याने वातावरणातील पाऊस, बर्फ किंवा बर्फाद्वारे मायक्रोवेव्ह रेडिओ फ्रिक्वेन्सी (RF) सिग्नल शोषून घेणे आणि विशेषत: 11 GHz वरील फ्रिक्वेन्सीवर होणारे नुकसान.हे वादळाच्या पुढच्या काठाच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक हस्तक्षेपामुळे सिग्नलच्या ऱ्हासाला देखील सूचित करते.

यामुळे जर तुम्ही आपल्या सर्विस प्रोव्हायडरला दोषी मानून सर्विस बदलायचा विचार करत असाल तर त्याचा काहीही उपयोग तुम्हाला होणार नाही. कारण ह्यावर कुठलाही उपाय आजवर शोधण्यात आलेला नाही. ह्यापेक्षा मोठी फ्रिक्वेन्सी म्हणजेच सी बॅण्ड सोबत देखील हीच समस्या उद्भवते.

superhydrophobic डिश अँटिना ज्यावर पाण्याचे थेंब थांबत नाही, ह्यासाठी एक पर्याय ठरू शकतो. पण हा ह्या समस्येवरील तोडगा नाही. कारण अति पावसात हा पर्याय देखील विफल ठरतो. त्यामुळे ह्यामुळे उगाचच आपल्या सर्विस ऑपरेटरवर चिडचिड करू नका कारण ह्यात त्यांचा काहीही दोष नाही.

━━━━━✥⊱⊰༺☬༒☬༻⊱⊰✥━━━━━⊰


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম