भारताची अग्निशिखा डॉ. टेसी थॉमस


भारताची अग्निशिखा  डॉ. टेसी थॉमस

 भारतीय संशोधन आणि विकास संस्थेच्या (डी.आर.डी.ओ.) वैमानिक प्रणालीच्या महासंचालिका आणि ‘अग्नी-4 व 5’ क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या यशाच्या शिल्पकार डॉ. टेसी थॉमस या ज्येष्ठ शास्त्रज्ञ असुन त्यांना 'मिसाइल वुमन’ म्हणुनही ओळखले जाते.

भारताची अग्निशिखा  डॉ. टेसी थॉमस

टेसी थॉमस भारतीय संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या अग्नी-4 व 5 क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या संचालिका असून या पदावरील त्या पहिल्या महिला आहेत. भारतीय संरक्षण क्षेत्राला बळ देणारे संशोधन डॉ. टेसी थॉमस यांनी केले आहे.लांब पल्ल्याच्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या क्षेपणास्त्राचे संशोधन करुन त्यांनी देशाच्या संरक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे.
भारतीय लष्करात महत्त्वाचे समजले जाणारे लांब पल्ल्याच्या स्वदेशी तंत्रज्ञानाने परिपुर्ण असलेल्या . त्यांच्या मार्गदर्शनाखाली 3 हजार 500 किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. यानंतर त्यांनी ४ हजार, ५ हजार ते ८ हजार आणि ८ हजार ते १० हजार किलोमीटर पर्यन्तच्या पल्ला असलेल्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी झाली. देशाच्या संरक्षणामध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापरात टेसी थॉमस यांनी मोलाचे योगदान आहे. बहुचर्चित अग्नी -४’ क्षेपणास्त्राने ९०० किलोमीटरची उंची गाठली आणि नंतर ते बंगालच्या उपसागरातील ३००० किलोमीटर अंतरावरील नियोजित लक्ष्यावर अचूक आदळले. या यशात डॉ. थॉमस यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.
भारताच्या मिसाईल वुमन म्हणुन आोळख असलेल्या टेसी थॉमस यांचा जन्म एप्रिल १९६३ मध्ये केरळ मधील अलाप्पुझा येथे झाला. मदर टेरेसा यांच्या नावावरून त्यांचे टेसी हे नाव ठेवण्यात आले. त्यांच्या घरातील सर्व मदर टेरेसा यांना प्रेरणास्रोत मानतात. टेसी थॉमस यांना लहानपणापासूनच विमानांचे आणि क्षेपणास्त्रांचे आकर्षण होते.हैदराबाद येथील जेएनटीयू मधून त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली असुन ‘इग्नू’मधून त्यांनी एम.बी.ए. पूर्ण केले आहे. नंतर त्यांनी १९८५ मध्ये कालिकत विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील बी.टेक. तर पुण्यातील डिफेन्स इन्स्टिटयूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीमधून १९८६ मध्ये ‘लक्ष्याधारित क्षेपणास्त्र’ या विषयात अभियांत्रिकीची पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.
त्रिशुर अभियांत्रिकी महाविद्यालयामधून बी.टेकचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी क्षेपणास्त्रातील पुढील शिक्षणासाठी पुण्यात दाखल आल्या. याच दरम्यान आयएएसच्या परीक्षेची तयारीही टेसी यांनी सुरू केली.अविश्रांत अभ्यास करू त्या उत्तम गुणाने पास झाल्यावर डीआरडीओ’मध्ये त्यांनी मुलाखत दिली यामध्ये मुलाखतीत त्यांची निवड झाली. ही निवड सार्थ ठरवत यशस्वी कामगिरी केली. नंतर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी त्यांची ‘अग्नि’ या क्षेपणास्त्र प्रकल्पासाठी निवड केली. क्षेपणास्त्राचे लक्ष्य भेदण्यासाठी मार्गक्रमण व लक्ष्य कसे अचूक भेदता येईल, यावर डॉ. टेसी यांनी काम केले. गडगडाटी आवाज करत तीन हजार अंश तापमानात लक्ष्य भेदणार्‍या ‘रिएन्ट्री व्हेईकल सिस्टीम’ या प्रणालीचीही निर्मिती त्यांनी केली. त्यांच्या कामामुळे प्रभावित होऊन त्यांना डीआरडीओकडून त्यांना आणखी जबाबदारी देण्यात आली.
एम. टेक करत असताना त्यांची ओळख सरोज कुमार पटेल यांच्याशी झाली. सरोजकुमार या सहकारी मित्राबरोबर त्यांचे भावबंध जुळले आणि दोघांनी लग्न केले.
कलाम आणि टेसी यांच्या या कामगिरीमुळे भारत क्षेपणास्त्रांच्या बाबतीत स्वावलंबी बनला आहे.हे भारतासाठी निश्चितच अभिमानास्पद गोष्ट आहे.भारताच्या संरक्षण क्षेत्रातील त्यांच्या अमुल्य योगदाना बद्दल ‘लालबहादूर शास्त्री’ या राष्ट्रीय पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. ‘भारतीय विज्ञान काँग्रेस’ने आयोजित केलेल्या क्रार्यक्रमात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांना भारताचे ‘वैज्ञानिकरत्न’ म्हणून गौरव केला आहे. याशिवाय ‘कल्पना चावला पुरस्कार,’ ‘सुमन शर्मा पुरस्कार,’ ‘इंडिया टुडे वुमन ऑफ दी इअर’, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম