चित्रपटाच्या 'सेन्सॉर सर्टिफिकेट'मध्ये काय लिहिलेले असते ?
आपण चित्रपट पाहताना सुरूवातीला जी सर्टिफिकेटची (प्रमाणपत्र) इमेज दिसते ती क्षणभरच दिसते मग मुळ चित्रपट चालू होतो हे लहानपणापासून पाहत आलो आहे. चित्रपट निर्मात्यांच्या दृष्टिने हे सर्टिफिकेट सगळ्यात महत्त्वाचे असते.सर्टिफिकेटच्या वरच्या बाजूला प्रमाणपत्राची वैधता दिलेली असते. म्हणजे हा चित्रपट कोठे रिलीज केला जाऊ शकतो.हे लिहुन प्रमाणपत्रामध्ये सर्टिफिकेट नंबर, सेन्सॉर बोर्ड ऑफिसचे ठिकाण आणि प्रमाणपत्र कधी दिले गेले त्याचे वर्ष नोंदवलेले असते.डाव्या बाजूला या चित्रपटाचे कोणी परीक्षण केले त्यांची नावे दिलेले असते.त्याचबरोबर निर्मात्याच्या आणि अर्जदाराच्या नावाची नोंद नमुद असते.
प्रमाणपत्रावर काही वेळा त्रिकोणाचे चिन्ह असते याचा अर्थ त्या चित्रपटास कटस सुचविले आहेत असा होतो.
Tags
माहिती