टिटवी : मनुष्याने हिला हात लावताच मरते

 टिटवी : मनुष्याने हिला हात लावताच मरते

पक्षीशास्त्रीय दृष्टीने अवघा ३३ सेंटीमींटर आकाराचा हा पक्षी म्हणजे टिटवी होय.संस्कृतमध्ये टिट्टीभ म्हणून तर हिंदीमध्ये तितुरी किंवा तितीरी म्हणून परिचित आहे. रात्रीच्या नीरव शांततेची गूढता वाढविण्याचं सामर्थ्य टिटविच्या निसर्गदत्त आवाजांमध्ये असतं , ग्रामीण भागात या पक्षाबद्दल अजुनही अनामिक भिती बाळगली जाते, पूर्वी कोणाच्यातरी घरावरून ही टिटवी  टीटीव...टीटीव..टी…टी अशा उच्चरवात कंठशोष करीत उडत गेली की , अनेकांचा रात्रभर डोळ्याला डोळा लागत नसायचा रात्रभर त्या घरातील मंडळी अनामिक भिती बाळगत असत. कारण, टिटवीचा आक्रोश हा प्रियजनांच्या विरहाचा संदेश असल्याची पुर्वापार समजूत आहे.अर्थात ही अंधश्रद्धा आहे. गुरूदेव दत्तात्रेयांच्या एकूण २४ गुरूंपैकी १८ वी गुरू म्हणून टिटवी प्रविष्ठ झाली आहे. 

टिटवी : मनुष्याने हिला हात लावताच मरते
एकनाथांच्या भारूडांमध्ये आपल्याला टिटवीचे वर्णन आढळते ते असे. 

एका ग्रामावरी जाऊन |

एक नदीतीर पाहून |

तेथे टिटवी करी शयन |

दोन्ही पायात खडा धरून गा ||

टिटवी यमाची तराळीण | टिटाव टिटाव टिटाव ||

तीड तीड तीड | जाणगा ||...

- तत्कालीन सामाजिक रचनेनुसार ‘तराळ’ हा रात्रीच्या समयाला गस्त घालणारा आणि वेठबिगार जमा करणारा एक बलुतेदार असे वर्णन करून त्याचेच कार्य करणारी टिटवी ही तराळीण असा तो संदर्भ आहे.शिवाय शेवटी सर्व जण देह सोडून एकाच यममार्गाने जाणार आहोत. तेव्हा टिटवीचा इशारा वेळीच ओळखा अन् अंत्यसमयाला उपयुक्त ठरेल अशी भगवंताच्या नामाची शिदोरी आतापासूनच गोळा करायला सुरूवात करा ,असा तो मार्मिक संदेश नाथ महाराज टिटवीच्या भारूडातुन   देतात.तर एके ठिकाणी गदिमा म्हणतात, 

विठ्ठलाच्या पायी थरारली वीट , राऊळीची घंटा, निनादली ॥

सज्जनगडात टिटवी बोलली , समाधी हालली , समर्थांची ॥

नदीकाठच्या किंवा रानातल्या ओसाड जमीनीवर , निर्जन डोंगरमाथ्यावर आपल्या इवल्याशा पावलांनी खोल खड्डा खणून टिटवी या खड्ड्यात अंडी घालते. टिटवीचं जोडपं आपल्या घरट्यातील अंड्यांवर , त्यातनं डोकावणाऱ्या लालचुटूक पिल्लांवर अतोनात प्रेम करतं. आपल्या घरट्यावर झाडाच्या पानाच्या सावलीची दखलसुध्दा या पक्ष्याला अस्वस्थ करते.घरट्याजवळ एखादा साप ,मुंगूस , लांडगा ,कोल्हा , कुत्रा किंवा माणूस जरी फिरकला तरीही इवलीशी टिटवी आक्रोश करून आसमंत डोक्यावर घेते.

वातावरणात मुक्तसंचार करणार्‍या टिटवीला माणसाची सवय नसते.टिटवी संवेदनशील व भित्री असते. म्हणुन मानवी स्पर्श होताच त्याच्या हृदयाची क्रिया बंद पडते किंवा संपूर्ण हृदयच फाटून जाते. आणि क्षणातच तो पक्षी मरून पडतो.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম