भारतीय सैन्यामध्ये एक बकरा आहे हवालदार?

 भारतीय सैन्यामध्ये  एक बकरा आहे हवालदार?

भारतीय सैन्याच्या सेवेत असा एक बकरा आहे जो देशाच्या सेवेत आपले कार्य व निष्ठा बजावत आहे. सध्या हा बकरा हवालदार या पदावर असून त्याचे नाव सतवीर असे आहे.

भारतीय सैन्यामध्ये  एक बकरा आहे हवालदार?
कुत्रा हा माणसाचा सर्वात चांगला मित्र आहे आणि शतकानुशतके त्यांनी सैन्यासोबत सेवा केली आहे. तथापि, पारंपारिक सैन्याच्या सेटअपमधून बाहेर पडून, आधुनिक काळातील सैन्याने विविध प्राण्यांच्या कौशल्यांचा फायदा घेणे शिकले आहे.  या प्राण्यांमध्ये  खेचर,घोडे, बकरे यांचा समावेश आहे. पुर्वी कबुतर हा पक्षी सुध्दा संदेश देवाणघेवाण साठी सैन्यात असत. 

येथे आपण बकरा पाहणार आहोत. 


सतवीर नावाचा इतिहास

१९६३ मध्ये युनिटची एक लाँग रेंज पेट्रोल (LRP) आपला मार्ग चुकली होती.त्यांना जाण्याचा मार्ग सापडत नव्हता.सगळेच भांबावून गेले होते.यानंतर ते युनिट डोंगरावरील पांढऱ्या रंगाच्या शेळीच्या मदतीने युनिटमध्ये परत आले. यानंतर युनिटने पांढरा बकरा दत्तक घेतला. त्या डोंगरावरील पांढऱ्या बकऱ्याला सतवीर (SATVIR) असे नाव दिले.

हे नाव पण आद्याक्षरावरून देण्यात आले आहे. , एस – म्हणजे युनिट 7 कुमाऊं ,ए – बटालियनचे ब्रीदवाक्य: युद्धाचा सर्व मार्ग, टी- तत्कालीन कमांडिंग ऑफिसर कर्नल थंबू यांच्या नावाने, व्ही- 2 आयसी विश्वनाथनसाठी, आय- त्यावेळचे सर्वात वरिष्ठ कंपनी कमांडर ईश्वर सिंग दहिया यांचे नाव आणि शेवट आर – तत्कालीन सुभेदार मेजर रावत यांचे नाव या सर्वांपासून SATVIR हे नाव देण्यात आले आहे. 

विशेष नियुक्त अधिकाऱ्यांच्या पथकाने हे नाव  निवडले होते. १ सप्टेंबर १९६५ रोजी युनिटच्या तिसऱ्या स्थापना दिवशी औपचारिकपणे त्याचे नामकरण करण्यात आले होते. इतर सैनिकांप्रमाणे या बकरीलाही बढती देण्यात येते. १९६८ मध्ये बकऱ्याला नाईक या पदावर बढती मिळाली होती. १९७१ मध्ये हवालदार पदावर नियुक्ती करण्यात आली होती.बकरयाचे आयुर्मान ७ ते ८ वर्ष धरले तरी या युनिट मध्ये येणारा प्रत्येक बकरयाचे नाव सतवीर असेच असते. 


सतवीरचे प्रशिक्षण


सैन्यामध्ये प्रशिक्षण आवश्यक आहे.जवानाबरोबरच सतवीरला शारीरिक प्रशिक्षण (PT) परेडमध्ये सैनिकांसोबत धावून SATVIR त्याच्या दिवसाची सुरुवात करतो. आणि क्रीडा परेडमध्ये सहभाग घेऊन त्याची संध्याकाळ संपते. या परेडदरम्यान त्यांना त्यांचा गणवेश परिधान करण्यापासून सूट देण्यात आली आहे. तथापि, सर्व औपचारिक प्रसंगी हवालदार SATVIR त्याच्या औपचारिक पोशाखात दिसतात. युनिटला भेट देणाऱ्या व्हीआयपींना अभिवादन करतानाही तो पोशाख परिधान करतो. पूर्वी मॅग्निफिसेंट सेव्हन नावाच्या या बटालियनने आपल्या युनिटचे नाव अभिमानाने बदलून SATVIR बटालियन असे ठेवले आहे. 

हे बकरे हिमालयातील कुमाऊं टेकड्यांवरील भारत-तिबेट सीमेवरील उंच प्रदेशातून आणल्या जातात. कुमाऊँच्या डोंगरातून निवडलेल्या सर्व बकरयाना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर त्यांना सैन्यात भरती केले जाते. पदावरील सगळ्या सतवीरची निवृत्ती साधारणपणे वयाच्या दहाव्या वर्षी केली जाते. त्यांच्या निधनानंतर लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार केले जातात. तीन तोफांच्या सलामीनंतर त्यांना दफन करण्यात येते. डोंगरावरील पांढऱ्या रंगाची बकरी सतवीर ६० वर्षांपासून सैन्यात आहे. हवालदार पदावर असणारा सतवीर ६० वर्षाच्या कालावधीतील सहाव्या क्रमांकाची शेळी आहे.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম