मा. आम. दादासाहेब शिर्के यांच्यामुळे मिळते डॉ.आंबेडकर जयंतीची शासकीय सुट्टी
_______________(माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव) कोल्हापुरातील सिद्धार्थनगर येथे वास्तव्य असलेले दादासाहेब शिर्के यांचा जन्म १९०७ मध्ये झाला, तर २६ डिसेंबर १९८५ रोजी मृत्यू झाला. शिर्के हे १९५७ च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेड्यूल कास्ट फेडरेशन पक्षाकडून हातकणंगले मतदारसंघातून विजयी झाले होते. डॉ. आंबेडकर यांनीच त्यांना या राखीव मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.
. शिर्के यांनीच आंबेडकर जयंतीसाठी शासकीय स्तरावर सार्वजनिक सुट्टीचा पहिला ठराव विधानसभेत मांडला.
विधिमंडळात १९५८ ते १९६१ या काळात संघर्ष करून शिर्के यांनी शासकीय सुट्टीचा ठराव मंजूर करवून घेतला. विरोधी पक्षाचे सभासद या नात्याने मताधिक्य नसतानाही हा ठराव पास करून घेण्यात दादासाहेबांनी आपले संघटना चातुर्य आणि संसदपटूत्व पणाला लावले.
वयाच्या १४ व्या वर्षी दादासाहेब शिर्के आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली भेट सिद्धार्थनगरातील चिंचेच्या झाडाखाली निपाणीचे बी. एच. वराळे यांनी घडवून आणली. शिर्के यांच्या सिद्धार्थनगरातील घरी
डॉ. आंबेडकर मुक्कामी असायचे. आजही ही ऐतिहासिक वास्तू शिर्के परिवाराने जपली असून,
डॉ. आंबेडकर यांच्या अस्थी आणि त्यांच्या वापरातील काही वस्तूही जपून ठेवल्या आहेत.
दादासाहेब शिर्के यांनी आंबेडकर जयंतीचा शासकीय सुट्टीचा ठराव विधानसभेत मांडून तो मंजूर करून घेतला. त्यांच्या अथक पाठपुराव्यामुळेच सरकारने ‘१४ एप्रिल’ ही तारीख आंबेडकर जयंतीची शासकीय सुट्टी म्हणून जाहीर केली.
Tags
डॉ.आंबेडकर