मुरब्बी उद्योगपती - गौतम अदानी

मुरब्बी उद्योगपती - गौतम अदानी 

सध्याचा राजकीय माहौल पाहता राजकारणात गौतम अदानी यांचे नाव जास्त गाजत आहे.भाजप असो वा कॉंग्रेस यांच्या सोबत कोणीना कोणा उद्योगपती बरोबर संबंध जोडले जात असतात.अगदी टाटा- बिर्ला पासुन ते अंबानी, अदानी पर्यंत. नेहरू-इंदिरा गांधी काळात टाटा, बिर्ला, बजाज, हिंदुजा यांनी जे केले तेच सध्या अदानी करतायत.फक्त सत्ताधारी व उद्योगपती चेहरे वेगळे आहेत

मुरब्बी उद्योगपती - गौतम अदानी
तर हेच गौतम अदानी कोण आहेत त्यांनी एवढी मोठी झेप कशी घेतली ते पाहु. गुजरात मधील शांतीलाल अदानी यांच्या सात अपत्यांपैकी गौतम एक होते.  कापड व्यवसाय ठिकठाक चालत असला तरी मुलाचं स्वप्न त्याहून मोठं होतं. त्याला मदत करण्याचं बळ शांतीलाल यांच्यात नव्हतं. त्यांनी आपल्या वीस वर्षेाच्या  मुलाला आशीर्वाद, शंभर रुपये आणि मुंबईतल्या काही नातेवाईकांचे पत्ते दिले.आणि गौतम मुंबईत आले.सुरूवातीला नातेवाईक, मित्रांचे बोट धरून गौतम मुंबईत  झवेरी बाजारात फिरू लागले.सुरूवातीला 2-3 वर्षं हिरे वेचण्याचं काम करत असतानाच त्यांनी स्वत:ची हिरे ब्रोकरेज कंपनी थाटली. आणि विशेष म्हणजे पहिल्या तीन वर्षांतच त्यांची गणना या व्यापारातल्या लक्षाधीशांमध्ये व्हायला लागली. विशीतच अदानी 'मिलियनेअर' झाले.यामागे त्यांची जिद्द आणि मेहनत निश्चितच होती. मिठ्ठास वाणी व संयम अदानी कडे असल्याने कोणतेही डील करताना त्यांना कठीण गेले नाही. या दरम्यान २०१५ मध्ये त्यांना एक मोठी संधी चालून आली. त्यांच्या अदानी पॉवर कंपनीने उडुपी औष्णिक उर्जा प्रकल्प फक्त ६,३०० कोटी रुपयांना विकत घेतला त्या व्यवहाराच्या वाटाघाटी फक्त १०० तासांत संपवण्याचा रेकॉर्ड गौतम अदानींनी केला.अशा वाटाघाटी व असे निर्णय होण्यासाठी आणि ते पार पडण्यासाठी कितीतरी वर्षं लागू शकतात.ते त्यांनी आपल्या अंगभूत कलेने अल्पावधीतच पार पाडले. 

नंतरच्या वाटाघाटी त्यांना फार सुलभ गेल्या. अदानी एक्सपोर्ट्स आणि अदानी पोर्ट्स च्या माध्यमातून या क्षेत्रात उतरल्यावर  तत्कालीन रेल्वेमंत्री नितिश कुमार यांनी देशातली प्रमुख बंदरं रेल्वेमार्गाने जोडण्याचं ठरवले होते. अर्थसंकल्पात नितिश कुमार यांनी देशातल्या सहा बंदरांना एकमेकांशी जोडणाऱ्या रेल्वे मार्गाची घोषणा केली होती. हे अदानी यांनी केलेलं आणखी एक डील. ते ही अगदी कमी वेळात.

मुरब्बी उद्योगपती कसे असतात याचे हे उदाहरण.हे उद्योगपती लोक आपला व पर्यायाने देशाचा विकास साधत असतात हे दुर्लक्षुन चालत नसते. म्हणुन सत्ताधारी पक्ष(कोणताही असो) याकडे सोइस्कर कानाडोळा करत असतो आणि हे प्रत्येक देशात होत असते. 

मुंबईत हिरे व्यापारात त्यांचा जम बसत असतानाच त्यांचा मोठा भाऊ मनसुखलाल यांनी अहमदाबादमध्ये प्लास्टिक व्यवसाय सुरू केला. त्यांनी गौतम यांना मदतीसाठी बोलावलं.ते साल होतं १९८१.बाजापेठेचा अंदाज घेऊन त्यांनी हा उद्योग त्यांनी प्लास्टिक व्यवसायाला पॉलीमर आणि पीव्हीसी आयात करणाऱ्या कंपनीमध्ये बदलला.आणि सुरू झाली घौडदौड."अदानी एक्सपोर्ट्स" या  नावाने अदानी साम्राज्याच्या पहिल्या आणि होल्डिंग कंपनीचा श्रीगणेशा झाला. (याच कंपनीला आता अडाणी एंटरप्रायझेस असं म्हणतात)  नंतर १९९२ च्या सुमारास भारतात अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी मुक्त अर्थव्यवस्था आणली होती.त्याची फळे काही उद्योगपती चाखत होती.दरम्यान १९९५ मध्ये मुंद्रा बंदराची व्यवस्था सांभाळण्याचं खाजगी कंत्राट गुजरात सरकारने  काढलं.अदानीनी आपलं कौशल्य पणाला लावुन ते कत्रांट मिळवलं.हे कत्रांट मिळाल्यानंतर अदानी यांची कंपनी विस्तारली व १९९६ मध्ये "अदाणी पॉवर" ही कंपनी देशातली सगळ्यात मोठी खाजगी उर्जा निर्मिती करणारी कंपनी ठरली. त्यावेळी गुजरात मध्ये नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री होते.पण त्यांच्या वर भारतीय उद्योगपतींचा विश्वास नव्हता.त्याला गुजरात दंगलची किनार होती. यावेळीच मोदींच्या बरोबर अदानी यांचे संबंध दृढ झाले.नंतर मोदी दिल्लीत गेल्यावर ते आणखीन घट्ट झाले.

२०१८ मध्ये केंद्रसरकारने देशातील ६ आंतरराष्ट्रीय विमानतळांचं खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यासाठी निविदा काढल्या. पण, त्या काढताना पूर्वी असलेली अशा कामांचा पूर्वानुभव असण्याची अट यावेळी काढून टाकण्यात आली.जेव्हा कंत्राटाची घोषणा झाली तेव्हा अशा कामाचा कुठलाही अनुभव नसलेल्या अदानी उद्योग समुहाला कंत्राट मिळालं. जी वर दिलेली अट शिथिल करण्यात आली होती, ती अदानींना फायदा मिळावा यासाठीच शिथिल झाली असा आरोप मीडियामध्ये झाला होता.यावरून अदानी-मोदी संबंध कसे असतील हे लक्षात येते.

अदानींचे सामाजिक कार्य::

१९८८ मध्ये अदानी समूहाची स्थापना केली. देशातील १८ राज्यांतील २४०० गावांमध्ये अदानी फाऊंडेशनचे काम सुरु आहे.गुजरातमध्ये शिक्षण क्षेत्रात अदानी फाऊंडेशनचे मोलाचे योगदान आहे. सीएसार निधीतून या फाऊंडेशनचे कार्य चालते. गुजरातमध्ये साक्षरता वाढीसाठी या फाऊंडेशनने मोठे कार्य केले आहे. २०१९ मध्ये या फाऊंडेशनने १३० कोटी रुपये खर्च केले आहे.अदानी समूह या कार्यक्रमासाठी भरभरून निधी देत आहे.

गौतम अदानी यांची पत्नी डॉ.प्रिती अदानी  यांनी अदानी फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठे सामाजिक कार्य उभारलं आहे.अदानी फाऊंडेशनच्या माध्यमामतून अनेक सेवा कार्य सुरु आहेत. १९९६ मध्ये प्रिती अदानी यांनी फाऊंडेशची जबाबदारी खाद्यांवर घेतली. सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. गौतम अदानी, त्यांची पत्नी प्रिती आणि दोन मुलं करण आणि जीत असा हे कुटुंब आहे.



थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম