शूर्पणखामुळे 'रामायण' घडले.

शूर्पणखामुळे 'रामायण' घडले. 

 रामायणात काही घटना या अनाकलनीय घडलेल्या आहेत असे रामायणाचा अभ्यास केल्यावर जाणवते.रामायण कोणामुळे घडले? यावर सुध्दा भिन्न मतप्रवाह आहेत.याबद्दल कोण दशरथाला जबाबदार धरतो तर कोण कैकयीला, तर कोण खुद्द सीतेला (म्रूगाचा हट्ट) पण येथे शूर्पणखाला विसरले जाते. पाहुया याबद्दल. रावण संहितेनुसार शूर्पणखा ही रावणाची सावत्र बहीण होती.शूर्पणखा विश्रवाची मुलगी. म्हणजेच ब्रह्मदेवाच्या नातवाची मुलगी याचबरोबर राम, लक्ष्मण, सीता आणि रावण यांच्याबद्दल सर्वांना माहिती आहे.त्याबद्दल जास्त सांगत नाही. बरेचजण असे म्हणतात की जर शूर्पणखा नसती तर रामायण झाले नसते. कारण लक्ष्मणाने शूर्पणखाचे नाक कापल्यानंतरच इतके रामायण झाले.युद्ध सुरू झाले. रावण वध, सीता  शोध, राम हनुमान भेट यानंतरच्या गोष्टी आहेत. 

शूर्पणखामुळे 'रामायण' घडले.
शूर्पणखाच्या पतीबद्दल बद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे.शूर्पणखाच्या पतीचे नाव विद्युतजिह्वा असे होते आणि तो राजा कालकेयचा सेनापती होता. एकदा रावण वरुणदेवाच्या शोधात निघाला होता, तेव्हा तो आशम नावाच्या नगरात पोहोचला. तेथे कालकेय नावाचा राक्षस राहत होता.  कालकेयाशी झालेल्या युद्धात विद्युतजिहवा पण उतरला. त्यावेळी मोठ्या  धुमच्रक्रीत रावणाने विद्युतजिहवाचा वध केला.पतीच्या निधनानंतर शूर्पणखावर मोठे संकट आले ती विधवा असल्याने पतीचे राज्य सोडून तिने  आपले संपूर्ण आयुष्य लंका आणि दक्षिण भारतातील जंगलात घालवले.मध्ये ती काही दिवस तिच्या नातेवाईक खार आणि दुशान यांच्याकडेही राहिली.

रावण जेव्हा आपल्या लंकेकडे परतत होता, तेव्हा शूर्पणखाने त्याचा मार्ग अडवला आणि पृथ्वीवर पडली, तेव्हा रावणाने तिला आधार देऊन वर उचलले आणि तिचे सांत्वन केले आणि म्हणाला, "काय झाले बहिणी, तू अशी असहाय का पडली आहेस?"

तेव्हा शूर्पणखा डोळ्यात अश्रू आणत म्हणाली, 'हे रावण बंधो, तू बलवान आहेस, काल्केयच्या वधाबरोबरच माझ्या प्रिय पतीलाही तु  युद्धात ठार मारलेस. बहिणीचा पती आहे हे माहीत असताना तु मला जबरदस्तीने विधवा केलेस. 

रावण म्हणाला की, जेव्हा मी युद्धक्षेत्रात असतो तेव्हा मला स्वतःचे आणि इतरांचेही भान नसते.माझ्यासमोर फक्त शत्रु असतो. 

रावण आणि शूर्पणखा यांच्यात बराच वेळ वाद झाला, पण शेवटी रावणाने तिचे सांत्वन केले.युध्दातील नियम सांगुन तिची समजुत घातली आणि रावणाचे चुलत भाऊ असलेल्या खार आणि दुषण या दोन राक्षसांना अनेक सैन्यासह दंडकवनात राहायला पाठवले.

पण तिच्या मनातुन रावणद्वेष जात नव्हता.पतीच्या मृत्यूनंतर तिला तिचा भाऊ रावणाचा सूड घ्यायचा होता.बदला घ्यायचा होता. तिचा पती पण पराक्रमी आणि मायावी होता, तरी रावणाने त्याचा वध केल्याने तिला रावणाची शक्ती कळली होती. तिने प्रभू रामचंद्राचा पराक्रम ऐकला होता. तेव्हा तिने रामाचे आणि रावणाचे शत्रुत्व वाढावे म्हणून सीतेला लंकेची राणी करावे असा हट्ट रावणाकडे धरला होता. म्हणूनच तिने राम आणि रावण यांच्यात वैर निर्माण करण्याचे काम केले.यासाठी तिने जाणूनबुजून लक्ष्मणाची छेड काढली.यामुळे चिडुन लक्ष्मणाने तिचे नाक कापले. नंतर त्यामुळे रावणाने सीतेचे अपहरण केले आणि शेवटी रामाच्या हातून त्याचा मृत्यू झाला.

राम आणि रावणाच्या मृत्यूनंतर शूर्पणखा विभीषणासोबत लंकेत राहिली. पुढे काही वर्षांनी शूर्पणखा आणि तिची सावत्र बहीण कुंबिनी या लंकेच्या समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळून आल्या. 

तर असा तर्हेने शूर्पणखा ही रामायण घडायला कारण घडली.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম