फेसबुक निळ्या रंगाच का आहे ?
फेसबुक लिंक http://bit.ly/3v3JiDG
फेसबुक ही आपल्या दैनंदिन जीवनाची गरज बनली आहे. जेव्हा मार्क झुकरबर्गने फेसबुकचा अविष्कार केला तेव्हा त्याला देखील वाटले नव्हते की ही गोष्ट इतकी धुमाकूळ घालेल, असो पण तेव्हा त्याने धरलेला हट्ट आज त्याच्या आणि किंबहुना युजरच्या देखील चांगलाच कमी आला आहे. फेसबुकची स्थापना झाली तेव्हा मार्क झुकरबर्गने फेसबुकमध्ये निळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करण्याचा आग्रह केला होता. त्याचा तो आग्रह त्याने पुरा केलाच म्हणा!इतर एपही निळ्या रंगात
आज फेसबुकच्या ब्रँड लोगोपासून ते त्यांच्या इंटरफेस पर्यंत सगळीकडे जास्तीत जास्त आपल्याला निळा रंगच दिसतो. फक्त फेसबुकचं नाही तर ट्विटर, स्काईप यांनीही निळ्या रंगाचा वापर केलेला आढळून येतो. या मागचं एक कारण असं आहे की हा रंग डोळ्यांना जास्त त्रासदायक नाही आणि त्यामुळे युजर सहजपणे कोणत्याही त्रासाविना निळा रंग असलेल्या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतो.पण मार्क झुकरबर्गने आपल्या फेसबुकसाठी निळा रंग निवडला कारण त्यामागे फक्त हे वरील कारणचं नव्हतं, तर त्यामागे त्याचं एक वैयक्तिक कारण देखील होतं.मार्क झुकरबर्ग एका रशियन टेलिव्हिजन शो मध्ये सहभागी झाला होता, तेव्हा त्याला या निळ्या रंगा मागचं गुपित विचारण्यात आलं आणि त्याने देखील जास्त आढेवेढे न घेता ते गुपित जगासमोर उघड केलं.तो म्हणाला की,मी कलर ब्लाइंड आहे (अर्थात त्याला इतरांप्रमाणे सामान्यत: काही रंग पाहताना त्रास होतो.) आणि मला निळा रंग उत्तमरीत्या दिसतो. म्हणून फेसबुकमध्ये जास्तीत जास्त निळ्या रंगाचा वापर करायचा माझा हट्ट होता.मार्क झुकरबर्ग याला लाल आणि हिरवा रंग ओळखता येत नाही. आपल्या डोळ्यासाठी इतर कोणत्याही रंगापेक्षा निळा रंग सर्वोत्तम असल्याचे तो आवर्जून सांगतो.
तुम्ही फेसबुक लॉग इन करता त्यावेळी होमपेजवर युआरएल हे https://www.facebook.com असे असते. या युआरएलच्या पुढे /4 लावल्यास सरळ झुकरबर्गच्या वॉलवर पोहचता.
⚘ ~✆ 9890875498~
_________💤__________