संकेश्वर येथील नवसाला पावणारा निलगार गणपती


 संकेश्वर येथील नवसाला पावणारा निलगार गणपती

संकेश्वर (कर्नाटक) येथील हेद्दूरशेट्टी घराण्यात निलगार गणपती असुन त्याची किर्ती , महाराष्ट्र,कर्नाटक व गोवा या तीन राज्यात पसरलेली आहे.या गणपतीला ३२५ वर्षाचा इतिहास असुन `नवसाला पावणारा` अशी या गणपतीवर भक्तांची  श्रद्धा आहे. 

संकेश्वर येथील नवसाला पावणारा निलगार गणपती

त्यामुळे दरवर्षी उत्सव भरतो यावेळी  २५ लाखावर भाविक दर्शन घेतात. प्रत्येक वर्षी भाविकांच्या संख्येत लाखोनी भर पडत आहे. या उत्सवामुळे संकेश्वर शहराला महिनाभर यात्रेचे स्वरुप येते. गेल्या २५ वर्षात या उत्सवाची ख्याती सर्वदुर पसरली आहे.

तसे पाहता निलगार गणपतीची माहिती घेतली असता, हा गणपती हेद्दूरशेट्टी घराण्याचा घरगुत्ती गणपती आहे.मूर्तीचे छायाचित्र काढण्यास बंदी आहे. या घराण्याचे ईश्वराप्पा सिद्धाप्पा हेद्दूरशेट्टी यांच्या काळापासून हा गणपती प्रसिद्ध आहे. हेद्दूरशेट्टी घराण्यात पुर्वी कपड्यांना रंगकाम करणे व  सुतकताई  करण्याचा  व्यवसाय होता. सूत कामामध्ये निळा रंग देण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असायचे. त्यामुळे निळ्या रंगात काम करणाऱ्यांचा गणपती म्हणून निलगार गणपती असे नाव पडले.  म्हणुन  त्यांच्या गणपतीला `निलगार गणपती`म्हटले जायचे. सध्या हे घराणे तो व्यवसाय करत नाही पण नाव मात्र कायम राहिले आहे. 

संकेश्वर येथील नवसाला पावणारा निलगार गणपती
परंपरेप्रमाणे हेद्दूरशेट्टी कुटुंबीय सुतार यांना मानाचा विडा देऊन मूर्तीची बनविण्यास सांगतात. मूर्ती बनविण्याच्या कामाचा प्रारंभही मुहूर्त पाहून केला जातो.लाल रंगात रंगवलेली गणपतीची मूर्ती अतिशय आकर्षक असते. मूर्तीची उंची २७ इंच, लाल रंग व सजावट ठरलेली असते. त्यामध्ये कोणताही बदल केला जात नाही. मूर्तीकाम केलेल्यांना आहेर व मानधन दिले जाते.

गणपती तब्बल २१ दिवस प्रतिष्ठापीत असतो

गणेश चतुर्थी या मुख्य दिवशी  हेद्दूररशेट्टी कुटुंबीय गणपतीचा कडक उपवास करतात. ही मूर्ती सुतार यांच्या घरातून दुपारी वाजत-गाजत मिरवणुकीने आणली जाते. पहिल्या दिवशी घरात मंचावर ठेऊन शास्त्रोक्त पूजा केली जाते. दुसऱया दिवशी सार्वजनिक भक्तांसाठी नेहमीच्या ठिकाणी मूर्ती ठेवुन  भाविकांकडून दर्शन सुरु होते.  हा गणपती तब्बल २१ दिवस प्रतिष्ठापीत असतो.हा गणपती पाहण्यासाठी खूप दुरून दुरून भक्त अनंत चतुर्दशीला आपले आसपासचे गणपती गेल्यानंतर संकेश्र्वरला येतात.यावेळी  दररोज लाख-सव्वा लाखावर भाविक दर्शन घेतात. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांची झुंबड उडते. इतकी की अनंत चतुर्दशीनंतर निलगार गणपतीच्या दर्शनाला संकेश्वरात सुमारे २ किमी रांगा लागतात. संकष्टीनंतर येणाऱ्या पहिल्या गुरुवारी किवा सोमवारी या गणपतीचे हिरण्यकेशी नदीपात्रात श्री शंकराचार्य मठासमोर विधीवत विसर्जन केले जाते. सध्या या घराण्याचे म्हणजे हेद्दूरशेट्टी परिवारातील हणमंत शिवपुत्र व वीरभद्र हे तिघे बंधू  गणपतीच्या उत्सवाची  जबाबदारी पाहत आहेत.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম