आभा कार्ड असे काढा व डाऊनलोड करा

 भारत सरकारचे आभा (ABHA) म्हणजे आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट नंबर. हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे ज्यात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित माहिती साठवली जाणार आहे.म्हणजे आरोग्याची कुंडली म्हटले तरी चालेल. 


हे कार्ड दिसायला आधार कार्ड सारखे असुन यावर नाव व १४ आकडी नंबर असेल. या नंबरचा वापर करून डॉक्टर रूग्णाचा इतिहास समजु शकतात.जसे की यापुर्वी त्या व्यक्तीच्या कोणत्या आजारावर इलाज झाला? तो कधी व कोणत्या दवाखान्यात झाला? त्यावेळी कोणत्या टेस्ट करण्यात आल्या? कोणती औषधं देण्यात आली? रुग्णाला आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या आहेत? तो कोणत्या आरोग्यविषयक योजनेशी जोडला गेला आहे का? अशी सगळी माहिती या आभाकार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीनं साठवली जाणार आहे. 

आभाकार्ड मुळे  दवाखान्यात जाताना तुम्हाला आधीच्या डॉक्टरांची चिठ्ठी, गोळ्यांची कागदं सोबत न्यायची गरज  नाही. तुम्ही आभा नंबर सांगितला की डॉक्टर तुमचा पूर्वीचा आरोग्यविषयक डेटा पाहून तुमच्यावर इलाज करू शकतील.त्यामुळे  तुमच्याकडे जुन्या टेस्टचे रिपोर्ट नसले तरी पुन्हा सगळ्या टेस्ट करायची गरज पडणार नाही. 

-या आभा कार्डमध्ये रूग्णाचा ब्लड ग्रुप,त्याचा आजार, याची संपूर्ण माहिती असेल.

-या मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनविले जाणार आहे.

-या कार्ड मुळे ऑनलाइन उपचार, टेलिमेडिसीन, ई-फार्मसी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड या सुविधा मिळतील.

-त्याचबरोबर  वैद्यकीय अहवाल मेडिकल इन्शुरन्स कंपनीला शेअर करता येईल.

या कार्ड मुळे आॉनलाईन रेकॉर्ड सुरक्षित राहील. 

आभा कार्ड कसे काढावे

हे आभा हेल्थ कार्ड प्राथमिक दवाखाने,  आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र इथं जाऊन काढु शकता. किंवा  ऑनलाईन बनवू शकता.

आभा कार्ड ऑनलाईन कसे काढावे

गुगलवर जाऊन  https://ndhm.gov.in/ असं सर्च करायचं आहे.

यानंतर 'आयुष्मान भारत डिजिटल मिशन' योजनेची वेबसाईट ओपन होईल.

इथे Create ABHA Number या रकान्यात क्लिक करायचं आहे.

मग तुम्ही एकतर आधार कार्ड किंवा मग ड्रायव्हिंग लायसनचा वापर करून आभा हेल्थ कार्ड काढू शकता.

आधार कार्ड वापरून काढायचं असेल तर त्यासाठी तुमचं आधार मोबाईल क्रमांकाशी लिकं असणे गरजेचं आहे.  मग next या पर्यायावर क्लिक करायचं आहे.सुरुवातीला आधार नंबर टाकायचा आहे. मग दिलेली सूचना काळजीपूर्वक वाचायची आहे.

सहमत असाल तर रकान्यात टिक करायचं आहे. खाली दिलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि मग next वर क्लिक करायचं आहे.यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल. तो टाकून next वर क्लिक करायचं आहे.

मग पुढे स्क्रीनवर तुम्हाला आधार कार्डवरील तुमचं नाव, लिंग, फोटो, जन्मतारिख, पत्ता तिथं दिसून येईल. Aadhaar Authentication Successful झाल्याची सूचना तिथं येईल. त्यानंतर next वर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. तिथं तुम्हाला आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि मग next वर क्लिक करायचं आहे.

यावेळी तुम्ही तुमचा ई-मेल आभा क्रमांकाशी जोडू शकता.जर जोडायचा नसेल तर इथल्या skip for now या पर्यायावर क्लिक करायच आहे. 

आता स्क्रीनवर तुमचा आभा नंबर तयार झाल्याची सूचना स्क्रीनवर दिसेल. त्याखाली आभा नंबर नमूद केलेला असेल. आता इथल्या Link ABHA Address या रकान्यात क्लिक करायचं आहे.

तुम्ही याआधी आभा कार्ड तयार केले आहे का, असा प्रश्न तिथं विचारला जाईल. तिथल्या no वर टिक करून sign up for ABHA Address रकान्यात क्लिक करायचं आहे.

इथं सुरूवातीला तुम्हाला तुमचे Profile Details दाखवले जातील. ते नीट काळजीपूर्वक वाचून तुम्हाला ABHA Address तयार करायचा आहे.

खालच्या रकान्यात तुम्ही तुमचं नाव, जन्मतारीख यापैकी जे लक्षात राहण्यासाठी सोपं वाटेल ते टाकून आभा address तयार करू शकता. हे टाकून झालं की create and link या रकान्यात क्लिक करायचं आहे.

तुमचा आभा नंबर आभा address बरोबर लिंक झाल्याचा मेसेज स्क्रीनवर येईल. आता BACK चं बटन दाबायचं आहे.

आभा कार्ड असे  डाऊनलोड करा

आभा कार्ड डाऊनलोड करण्यासाठी healthid.abdm.gov.in असं सर्च करा. इथे लॉग-इन करायचं आहे.

मग आभा किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही लॉग-इन करू शकता. आभा नंबर, जन्म वर्ष आणि तिथं दिलेलं गणित बरोबर सोडवून Continue वर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर आधारशी लिंक असलेल्या तुमच्या मोबाईलवर ओटीपी पाठवून ही माहिती Validate करायची आहे. कंटिन्यू वर क्लिक. ओटीपी टाकून Continue वर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमचं आभा कार्ड दिसेल. इथल्या Download या पर्यायावर क्लिक करा आणि ते डाऊनलोड करा.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম