शबनम बॅग

 शबनम बॅग

विसरत चाललेली शबनम बॅग आठवते का? पुर्वी साहित्यिक, डावे पक्षवाले, समाजवादी, यांच्या खांद्यावर रूळणारी बॅग आता दिसेनाशी झाली आहे. शबनम या शब्दाचा अर्थ चकाकणारा, मोत्यासारखा दवबिंदू असा आहे. 

शबनम बॅग
१९४९ मध्ये दिलीपकुमार आणि कामिनी कौशल यांच्‍या 'शबनम' चित्रपटात निर्वासिताची भूमिका केलेल्या दिलीपकुमारच्या गळ्यात लटकणारी ही बॅग दिलिपच्या चाहत्यात खुपच लोकप्रिय झाली.चित्रपटाच्या नावामुळे ही बॅग 'शबनम बॅग' म्हणुन आोळखु लागली.  वापरायला सुटसुटीत, टिकाऊ पणा यामुळे ही बॅग म्हणुन खुप लोकप्रिय झाली.खांद्यावर लटकावली, की  झाले काम .त्यामध्ये डायरी, पेन, एक-दोन दिवसांचे कपडे, लुंगी, दाढीचे सामान चारदोन पुस्तके,तिच्यात मावायचे. चळवळी करणारे, तुरुंगात-मोर्चात जाणारे कार्यकर्ते ती वापरायचे. शेवटी शेवटी, बॅगेवरूनच कार्यकर्त्याची ओळख व्हायची.ही बॅग अडकवुन कोणतरी निघाला की समजायचे हा कार्यकर्ता आहे.एवढे घट्ट नाते या बॅगेशी निर्माण झाले. नंतर नंतर काही पत्रकार ही बॅग गळ्यात अडकवून फिरू लागले. पहिल्यांदा साधी बटण असणारी बॅग नंतर यामध्ये बदल होत याला चेन आली.मग रंग, त्यावर डिझाईन असा बदल होत जाऊन आतील कप्पे वाढले.अगोदर सुती असणारी ही बॅग मग नायलॉन धागा, पॉलिस्टर धाग्यामध्ये बनली जाऊ लागली. मध्यमवर्गाने पण ही शबनम बॅग आपलिशी केली.काळ बदलला लोंकाची आवड बदलली आणी आधुनिक युगात ही बॅग कालबाह्य होत चालली. आताच्या सॅकच्या जमान्यात शबनम बॅग हरवली आहे.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম