स्नेक वाइन- ही दारू पिण्याची हिंमत करणार का तुम्ही?

 स्नेक वाइन
ही दारू पिण्याची हिंमत करणार का तुम्ही?

सोशल मीडियावर काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही.काही माहिती नसलेल्या गोष्टी सुध्दा व्हायरल होतात आणि आपण थक्क होऊन जातो.अशीच एक जगावेगळी माहिती आम्ही घेऊन आलो आहोत. 

स्नेक वाइन-ही दारू पिण्याची हिंमत करणार का तुम्ही?
इन्स्ट्राग्राम या सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडीओ  आलेला आहे. या व्हिडीओमध्ये काही व्यक्ती सापापासून बनवलेली वाइन पित आहेत. इन्स्ट्राग्रामवर  व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वाइन शॉपच्या एका दुकानात विविध चिनीमातीच्या भांड्यांत स्नेक वाइन भरलेली आहे. ही वाइन पिण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. व्हिडीओत काही काचेच्या बॉटल्समध्येही साप आणि वाइन दिसत आहेत.चीन, जपान आणि व्हिएतनाम या देशात ही वाईन आवडीने प्यायली जाते.व ही लोंकाची पसंदीची दारू आहे.

व्हिडीओत दिलेल्या माहितीत असे सांगितले आहे की, जिवंत साप एका काचेच्या बाटलीमध्ये  ठेवला जातो. साप यात ठेवल्यावर त्यात साधी वाइन टाकली जाते. सापाला या वाइनमध्ये ३ ते ५ दिवस बंद ठेवलं जातं. सापाला भूक लागल्यावर तो ही वाइन पितो आणि उलटी करतो. त्याच्या उलटीमुळे सापाच्या शरीरातील सर्व वाईट गोष्टी बाहेर पडतात. त्यानंतर जिवंत साप पुन्हा बाहेर काढला जातो. त्याला दुसऱ्या एका काचेच्या बॉटलमध्ये वाइनसह  ठेवले जाते.नंतर साप ही वाइन पिउन बॉटलमध्ये मरून जातो. वाइनमध्ये अल्कोहोल असल्याने सापाचं विष देखील संपून जातं. जिवंत साप भरून ठेवलेली वाइन तब्बल ३ ते ५ वर्षे तशीच भरून ठेवली जाते. या वाइनमुळे केस गळतीसह अन्य समस्या दूर होतात असा समज तेथे रूढ आहे.


=======================

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম