हिंदु भजन व नौशाद

 हिंदु भजन व नौशाद

चित्रपट सृष्टीचा इतिहास पाहिला तर  असे दिसते की जेव्हा भारतात चित्रपटांची निर्मिती सुरू झाली तेव्हा त्यात धर्माचा शिरकाव झालेला नव्हता.

हिंदु भजन व नौशाद

चित्रपटांना केवळ कलात्मक सृजनाचे माध्यम समजले जात असल्यामुळे सर्वच जाती-धर्मातील लोक या निर्मितीमध्ये आपले योगदान देत होते. नायक-नायिकेपैकी एक जण मुस्लिम आणि दुसरा हिंदु अशा प्रेमकथेवर चित्रपट तयार करणे, ही तेव्हा सर्वसाधारण बाब होती.कोणालाही ही बाब खटकत नव्हती.मुस्लिम कलाकार दिलीपकुमार (खरे नाव युसुफखान) व मधुबाला अनेक हिंदू युवकयुवतीचे आवडते हिरो होते.दोन्ही समाजाचे लोक एकमेकांसोबत सलोख्याने वागत होते. एक महत्त्वाची बाब म्हणजे हिंदुत्व कधीही दुराग्रही, आक्रमक नव्हते.व मुस्लिम समाजही कट्टरता दाखवत नव्हता. आम्रपाली चित्रपटाचे कथानक तर बौद्ध धर्माशी निगडीत होते. 

अशीच एक आठवण संगितकार नौशाद यांच्या बद्दल आहे. 

चित्रपट होता 'बैजु बावरा'.या चित्रपटात एक हिंदू भजन सामाविष्ट करायचे होते.गाण्याचे बोल होते. "मन तरपत हरि दरशन को आज".हे गाणे  शब्दरचना केली होती प्रसिद्ध शायर शकिल बदायुनी यांनी.नौशाद यांनी ते गाणे बसविल्यानंतर ते त्यांना महम्मद रफी यांच्याकडून गावुन घ्यायचे होते.नौशाद, शकील व रफी तिघेही मुस्लिम. 

गाणे (भजन)तर हिंदू पण तिघांनाही येथे जातीचा वास आला नाही.पण हिंदू देवाला (कृष्णाला)आठवताना या तिघांच्याही भावना एका हिंदूइतक्याच उत्कट होत्या.हे गाणे 'मालकंस' रागावर बांधण्याचे ठरले.

गाण्याचे  रेकॉर्ड व नविन ड्रेस

गाण्याची तालीम झाल्या. हे गाणे रेकॉर्ड करण्याचे ठरले. रेकॉर्ड करण्याच्या आदल्या दिवशी नौशादजीनी त्यांच्या सर्व वाद्यवृंदाला सुचना केली की, उद्या सर्वानी येताना स्नान करून चांगले कपडे परिधान करून या, आपल्याला एक कृष्ण भजन रेकॉर्ड करायचे आहे. दुसऱ्या दिवशी सर्व मंडळी स्नान करून नविन कपडे परिधान करून रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये आले. आणि त्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी रेकॉर्डिंग पूर्ण करण्यात आले. 

गीतकार, गायक व संगीतकार तिघेही मुस्लिम पण भगवान श्रीकृष्ण बद्दल भक्ती प्रेम आदर  हिंदूइतक्याच उत्कट होत्या. 

या गाण्यात भारतभूषण हा हिरो असुन तो आपल्या गुरूला भेटण्यासाठी व्याकूळ होऊन पूर्ण भक्तिमय झालेला आहे.व शेवटच्या तारसप्तकातला हरिओम कानावर पडताच थकलेले गुरु आपल्या शिष्याला भेटायला आतुर झालेले पाहायला मिळतात असा चित्रपटात प्रसंग आहे.यामध्ये गायक मोहमद रफीने "हरीआोम" हा आर्त स्वर आळवताना कमाल केली आहे. त्या तिघांकडे खोटा धर्मांधपणा नव्हता , अतिव श्रद्धेने त्यांनी ह्या गीताची जबाबदारी पार पाडली.



थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম