बौद्ध धर्म व दिवाळी
भारतात दिवाळी सण आश्विन महिन्याच्या अमावस्येला म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये मोठ्या उल्हासात साजरा करतात.दिवाळीचे ऐतिहासिक महत्वास लोक आजही जाणतात.
नेपाळमधील बौद्ध दिवाळी
भारताचा शेजारी नेपाळमध्ये बौद्ध धर्माचे पालन करणाऱ्या लोकांसाठी दिवाळीचा सण खूप महत्त्वाचा आहे. ते हिंदू धर्माप्रमाणे पाच दिवस साजरा करतात ज्याला तिहार सण म्हणून ओळखले जाते. या पाच दिवसांत ते अनुक्रमे कावळा, कुत्रा, गाय, बैल यांची पूजा करतात आणि शेवटचा दिवस भाऊ टिका म्हणून साजरा केला जातो.
श्रीलंकेतील बौद्ध दिवाळी
श्रीलंका येथे आज ही बौद्ध मतानुसार दीपावली साजरी केली जाते. राजा तिष्यने याच कार्तिक अमावस्याच्या दिवसात बौद्ध धर्म दिक्षा घेतली होती आणि श्रिलंकेत आनंदोत्सव साजरा केला होता. त्या प्रित्यर्थ अशोकाला त्याने अलंकारीक भेटवस्तू सुद्धा पाठविल्या होत्या.
बुद्ध काळात हा सन प्रज्ञावली म्हणुन साजरा करायचे. ही प्रथा राजा सम्राट अशोकानी तशीच पाडली. या सनाची सुरवात अशोकाने इ. स. पुर्व २५७ ला केली होती.
चतुरासीति सहस्सानि; अरामे कारयामह |
एकेकधम्मक्खन्धस्स; एकेकाराम पूजयं ||
(दिपवंश पान. ११०)
गौतम बुद्धाने ८४००० वचने प्रस्तुत केली आहेत म्हणुन सम्राट अशोकाने ८४००० हजार बौद्ध स्तूप बांधले असे दिपवंश म्हणतो हेच औचित्य लक्षात घेउन अशोकाने कार्तिक अमावस्येला जागोजागी दिपमाला आणि पुष्पमाला अलंकृत केल्या. रस्त्यावर दिवे लाऊन सजविण्यात आले. ८४००० हजार स्तुपाप्रमाणे अशोकाने ८४००० दिप प्रज्वलीत केलेत.हा पर्व सतत सात दिवस चालला होता. भिक्कू आणि उपासकाना दान स्वरुपात धन देन्यात आले. म्हणुन तो दिवस दीपावलीचा धनोत्रय दिवस म्हणून साजरा केला गेला. कारण अशोकाने आपला संपूर्ण खजिना धम्मासाठी दान केला होता. (अधिक माहितीसाठी पहा महावंश पान न. ४९)
दिवाळीच्या दिवशी सर्व बौद्ध धर्मातील लोक देवी लक्ष्मीची पूजा करतात. यासोबतच बौद्ध मंदिरे आणि घरे दिव्यांनी सजवून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. हिंदू धर्मात दिवाळी हा सण जसा साजरा केला जातो, तसाच बौद्ध धर्मीयही साजरा करतात.