चारचौघात कसली लाज आता पादा बिनधास्त

चारचौघात कसली लाज आता पादा बिनधास्त


एक व्यक्ती दिवसभरात किमान १४ वेळा गॅस सोडते, ज्याला आपण मराठीत‘पादणे’ असे म्हणतो. तुम्ही जेव्हा पादता तेव्हा तुम्हाला त्याची लाज वाटू शकते पण मुळात यात लाज वाटून घेण्यासारखे काही नाही कारण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि प्रत्येक माणूस त्यातून जातो.महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही कारणास्तव तुम्ही जर पादण्याची क्रिया थांबवण्याचा प्रयत्न केल्यास अपचनाचा आणि पोट फुगण्याचा धोका वाढू शकतो.पोटात गॅस होणे ही समस्या अनेकांना असते. याचे मुख्य कारण म्हणजे अवेळी जेवण करणे, जेवताना चावून न खाणे, भूक लागलेली नसताना जेवणे इ.

चारचौघात कसली लाज आता पादा बिनधास्त

पण सार्वजनिक ठिकाणी  पादणे लाजीरवाणे असु शकते. ही क्रिया रोखली जाऊन सभ्यपणाचा आव आणला जातो. खरंतर पादणं थांबवायला नको. पण हे लक्षात घ्यायला हवं की हा गॅस काही वेळानंतर बाहेर काढावाच लागतो. कारण शरीराची तशी इच्छा असते. गॅस सोडणे ही नक्कीच मोठी गोष्ट नसली तरी, काहीवेळा ते तुम्हाला विचित्र परिस्थितीत टाकू शकते. 

पादताना आवाजाबरोबर दुर्गधही येतो यासाठी जीन्स पॅण्ट तयार करणारया कंपनीने एक विशेष पॅण्ट बाजारात आणली आहे. 

श्रेडीज या अमेरिकन ब्रॅन्डनं पुरूष व महिलासाठी नविन जीन्स तयार केली आहे. या जीन्स मुळे पादल्यावर निघणारा दुर्गंध बाहेर येत नाही.ती गंध शोषुन घेते.त्यामुळे घाण वास येत नाही.(थोडक्यात काय तर 'वास फिल्टर केला जातो') 

पॅण्ट निर्माती श्रेडीज कंपनी म्हणते की, त्यांचे 'फ्लॅट्युलेन्स फिल्टरिंग कपडे' "वाढीव संरक्षण आणि सामाजिक प्रवेशासाठी अधिक मोकळेपणा देतात.

तर हे उत्पादन वास कसा फिल्टर करते ? 

कंपनी म्हणते की त्यांच्या "कपड्यांमध्ये एक सक्रिय कार्बन बॅक पॅनेल आहे जे सर्व गंध शोषून घेते. त्याच्या अत्यंत सच्छिद्र स्वरूपामुळे, गंध वाष्प कपड्यात अडकतात आणि तटस्थ होतात,"या क्रियेमुळे पॅण्ट बाहेर वास जाताना तो साधारण स्वरूपात जातो. 

“श्रेडीज फ्लॅट्युलेन्स फिल्टरिंग जीन्समध्ये कार्बन अस्तर असते ज्यामुळे दुर्गंधी दूर होते. कार्बन अस्तर वास फिल्टर करून बाहेर सोडत असल्याने श्रेडिज फ्लॅट्युलेन्स फिल्टरिंग पॅण्ट घातल्यावर ते त्रीव वासाला रोखते. यामुळे वास फिल्टर झाल्याने त्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो.” असे कंपनीचे म्हणणे आहे. 

या कंपनीची पॅण्ट खरेदी करायची असल्यास खालील लिंकवर क्लिक करून या वेबसाइटला भेट दया. 

पुरुषासाठी👇

https://parg.co/Ukzv


स्त्रियासाठी खरेदी👇

https://parg.co/Ukz9


____________________________________


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম