व्हॉटसअपवर नोकरीची माहिती मिळवा या नंबरवरून
आजकाल नोकरी शोधण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. लोक विविध करिअर गाईडन्स वेबसाइट्स, अॅप्स आणि ग्रुप्सद्वारे स्वतःसाठी सर्वोत्तम नोकरी शोधत असतात.
यासाठी सायन्स अँड टेक्नोलॉजी डिमार्टमेंटच्या टेक्नोलॉजी इनफॉर्मेशन फॉरकास्ट अँड इव्हॉल्युशन काउंसिल (TIFAC) ने श्रम शक्ती मंच (SAKSHAM) नावाचे एक पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून त्या भागातील मजुरांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांशी (MSME) जोडण्याचे काम व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून केले जाईल.
यानंतर, लोकांना त्यांच्या क्षेत्रातील नोकरी आणि संधींबद्दलची माहिती मिळेल.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी, 7208635370 या व्हॉट्सअॅप नंबर ‘Hi’ असे लिहून पाठवावे लागेल. त्यानंतर, त्यांच्या कामाच्या अनुभवाची आणि कौशल्याची माहिती त्या व्यक्तीकडून चॅटबॉटद्वारे घेतली जाईल. मिळालेल्या माहितीच्या आधारे, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सिस्टीम युझरला त्याच्या सभोवतालच्या उपलब्ध नोकऱ्यांबद्दल माहिती देते.सध्या केवळ इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्येच उपलब्ध आहेत. ते इतर भाषांमध्ये विस्तारित करण्याचे काम चालू आहे
सरकारच्या या पुढाकाराने व्हॉट्सअॅपवर केवळ ‘Hi’ पाठविल्यास त्या व्यक्तीला त्याच्या कौशल्यानुसार घरबसल्या नोकरीबद्दलची माहिती मिळेल
---------------------------------------------------
Tags
माहिती