मराठीतील हेमामालिनी - रंजना

मराठीतील हेमामालिनी रंजना 


अभिनेत्री रंजना ही प्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांची कन्या. 23 जुलै रंजना देशमुख उर्फ रंजनाचा जन्मदिन, अतिशय सुंदर, देखनी, गोरी, ऊंच बांधा, गोल चेहरा, खानदानी सौंदर्य , आणि गालवर असणारा मोहक असा तीळ, आणि या सौंदर्या बरोबर, जबरदस्त अश्या अभिनयाची जोड़ अशी ही मर्दानी अभिनेत्री होती. रंजना म्हणजे मराठी सिनेसृष्टिल पडलेल एक देखने स्वप्न होत. 
 आज जे पस्तीस-चाळीस वर्षाचे आहेत त्यांना रंजना व तिचे चित्रपट नक्कीच आठवत राहतील. 
मराठी चित्रपट सृष्टिचा ७०,८० चा काल हा म्हणजे सोनेरी काल होता, खुप कल्पकता, विद्वान, जागरूक, असलेले लेखक,दिग्दर्शक, आणि कलाकार, आणि संगीतकार होते,  त्या कलाकार मध्ये हीरो कोणी ही असो पन हिरॅाइन रंजना असायचीच.  कारण नृत्य, मुद्राअभिनय, देहबोली, अश्या अनेक असलेल्या गुणाच्या जोरावर तिने त्या वेळी मराठी चित्रपट सृष्टिवर अधिराज्य गाजवले,अशा या गोड अभिनेत्रीचां जन्म गोवर्धन देशमुख व वत्सला देशमुख यांच्या पोटी 23 जुलै १९५५ साली मुंबई येथे झाला, आई वत्सला देशमुख त्या काली मराठी चित्रपटातील एक उत्तम अभिनेत्री, आणि वडील गोवर्धन देशमुख हे गुजराती रंगभूमि वरील  बाल गंधर्व म्हणून प्रसिद्ध होते, आणि हिन्दीतिल सुप्रसिद्ध अभिनेत्रि संध्या ही  रंजनाची सख्खी मावशी, म्हणजेच तिची मावशी ही प्रख्यात अभिनेता, दिग्दर्शक व्ही शांताराम यांची पत्नी चित्रपती व्ही.शांताराम हे तिचे काका होत. 
मराठीतील हेमामालिनी - रंजनारंजनाचां जन्म आणि शिक्षण परेल मुंबई येथे झाले . घरामधे वातावरण  अभिनय, नृत्य, कथा, पटकथा, दिग्दर्शन, रंगभूमि असे असल्यामुळे तिच्या ही मनात अभिनय ची उर्मी निर्माण झाली, घरातून अभिनयचे बाल कडू, मिळाले होते पन आपली ओळख स्वत:त निर्माण करायची या एकमेव कारणामुळे तिने इतर फ़िल्म मधे छोटे मोठे रोल केले, पन तिचा दमदार अभिनय पाहुनच शांताराम यानी तिला संध्या हेरोइन असलेल्या "चंदनाची चोळी माझ्या अंग अग जाळी" या चित्रपटात  छोटासा रोल वसंत शिंदे बरोबर  दिला. तिचा तो लहान रोल सुद्धा भाव खाऊन गेला, आणि शांताराम यानी १९७५  मधे लगेच पुढच्या फ़िल्म ,झुंज मधे रविन्द्र महाजनी यांची हेरोइन म्हणून मुख्य रोल दिला, त्या फ़िल्म मधे एवढे मोठे कलाकार असून ही रंजना ने आपली अभिनयाची छाप पाडली,  विशेष म्हणजे त्या  चित्रपटामध्ये तिच्या आई ने वत्सला देशमुख यानीच तिच्या आई ची भूमिका साकारली होती, या झुंज मधील एक आदर्श शिक्षिका तिने चांगली च रंगवली आणि तिची मराठी फिल्म सृष्टीने दखल घेतली त्यां नंतर मात्र तिने मागे वळून पहिले नाही, नंतर एकापेक्षा एक चित्रपट तिने केले. रविंद्र महाजनी बरोबर तिची चांगलीच जोडी जमली. 

मराठीतील धर्मेन्द्र-हेमामालिनी 

रविंद्र महाजनी व रंजना या जोडीला त्या काळात मराठीतील धर्मेन्द्र-हेमामालिनी म्हणत असत. असला नवरा नको ग बाई, मुंबईचा फौजदार, एक डाव भुताचा, जख्मी वाघिन, भुजंग, केला इशारा जाता जाता, गुपचुप गुपचुप, गोंधळात गोंधळ, बिन कामाचा नवरा, खिचड़ी, सुशीला, चानी, भालू, बहुरूपी, सासु वर चढ़ जावई, सावित्री, लक्ष्मी, लक्ष्मीची पावले, इथे मराठी च्या नगरी, सगे सोयरे, बायको असावी अशी, देवघर, अरे संसार संसार, हल्दी कुंकु, दैवत, मर्दानी, कश्यला उद्याची बात, हीच काय चुकल, आली लहर केला क़हर, कुलस्वामीनि अंबाबाई, हे दान कुंकवाचे, ग्यानबाचि मेख, दुनिया करी सलाम, तमासगीर, पाटलीन,हे चित्रपट तिने आपल्या कारकिर्दीत खुप लोकप्रिय झाले. 
रविन्द्र महाजनी, अशोक सराफ, कुलदीप पवार, राजा गोसावी, वसंत शिंदे, निळु फुले, श्रीराम लागू, सुहास खांडके, नाना पाटेकर, यांचेबरोबर तिने अभिनय केला.वैयक्तिक जीवनात तिची खरी जोड़ी जमली ति अशोक सराफ बरोबर, अशोक सराफ बरोबर तिने गोंधळात गोंधळ, सासु वरचढ जावई हे विनोदी चित्रपट केले. 
एखादी गोष्ट जर आपल्याला येत नसेल तर त्यासाठी कितीही मेहनत करण्याची तिची तयारी असायची. एखादी गोष्ट करताना जर ती डावी- उजवी झाली तर तिला आवडायचं नाही. ही गोष्ट मला जमत नाही म्हणजे काय असा सतत प्रश्न ती विचारायची. काहीही झालं तरी मी ती गोष्ट करणारच असा दुर्दम्य आशावाद तिचा असायचा. तिच्या याच स्वभावामुळे तिने आयुष्यात अनेक नवनवीन गोष्टी केल्या.या काळात अशोक सराफ आणि रंजना यानी खुप एकत्र चित्रपट केले ,ते एकमेकाच्या खुप जवळ आले आणि त्या दोघाच्ंयात प्रेमाचा हळुवार गंध कधी फूलला ते दोघाना ही समजले नाही. पण नियतीला ते मान्य नव्हते. 
रंजना १९८७ मध्ये झुंजार या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बंगलोरला जात होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यांचे दोन्ही पाय लुळे पडले. त्यांचा डावा हातही निकामी झाला. हा अपघात घडला, त्यावेळी मराठी इंडस्ट्रीतील काही कलाकार देखील त्यांच्यासोबत गाडीत होते. पण त्यांना काहीही झाले नाही. हा अपघात घडला त्यावेळी रंजना या केवळ ३२ वर्षांच्या होत्या. रंजना या अपघातानंतर अनेक वर्षं व्हीलचेअरवरच होत्या.या पडत्या काळात अशोक सराफने आधार दयायला हवा होता तसा दिला नाही. 
अपघातानंतर त्या अभिनयक्षेत्रा पासून दूरच राहिल्या. पण त्यांच्या मृत्यूच्या काही वर्षं आधी त्यांनी फक्त एकदाच या नाटकात काम केले होते. त्यांनी त्यांच्या आयुष्याची शेवटची १३ वर्षं ही एकाकी अवस्थेत व्हीलचेअरवर काढली. ३ मार्च २००० मध्ये परेल मुंबई येथील त्यांच्या घरी वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांचे हृदय विकाराने निधन झाले.
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম