महाराष्ट्रातील ही १२ घराणी सत्तेचे राजकारण ठरवतात
फेसबुक लिंक http://bit.ly/3lE60xZ
महाराष्ट्रात अशी काही राजकीय घराणी आहेत की तीच राजकीय सत्तेची चावी आपल्या हातात ठेवून सत्ता कोणाची हे ठरवत असतात.मग यांचा पक्ष कोणताही असो त्याचा फारसा फरत पडत नाही.पवार, ठाकरेंपासून चव्हाण, पाटीलपर्यंत... या कुटुंबांच्या अवतीभाेवतीच महाराष्ट्राची सत्ता फिरत असते.अनेक दशकांपासून यातील काही कुटुंबांचे किती तरी जागांवर वचस्व आहे. यावरून त्यांचा दबदबा व मानाचा अंदाज लावता येऊ शकताे. जसे- बारामती... ही जागा ४० वर्षांपासून पवार कुटुंबाकडेच आहे.हे घराणे महाराष्ट्रातील राजकारणातील प्रतिष्ठित घराणे आहे.महाराष्ट्रात सत्ता कोणाची हे ठरवायची हुकमत या पवार घराण्यात आहे.
🔹बारामतीचे पवार घराणे (४ पिढ्या)
शारदाबाई पवार :१९३६मध्ये पुणे लोकलबोर्डाच्या सदस्या.पुत्र: शरद पवार : ३८ व्या वर्षी शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. चारदा मुख्यमंत्री. स्वत:चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. यूपीएत मंत्री हाेते.
नातू : अजित पवार :शरद पवारांचे पुतणे अजित पवार हे उपमुख्यमंत्री हाेते. बारामतीतून आमदार.
नात : सुप्रिया सुळे:२००६ मध्ये राज्यसभा सदस्य, तर २००९ व २०१४ मध्ये बारामतीतून खासदार बनल्या.
पणतू : रोहित-पार्थ : शरद पवारांचे नातू राजकारणात सक्रिय. या वेळी निवडणूक लढवणार.शिवसेनेचे जसे मुंबईत आहे तसेच या कुटुंबाचे बारामतीत वर्चस्व आहे.
🔹 मुंबईचे ठाकरे घराणे (३ पिढ्या)
बाळासाहेब ठाकरे :१९ जून १९६६ राेजी शिवसेनेची स्थापना.पुत्र:उद्धव ठाकरे २०१९ साली अनपेक्षित रित्या महाराष्ट्ाचे मुख्यमंत्री झाले.
नातू : आदित्य ठाकरे:शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष. शिवसेनेत क्रमांक दाेनचे पद.सध्या पर्यावरण मंत्री. ठाकरे कुटुंबाचे घर 'मातोश्री' चा आदेशच मुंबईत अंतिम मानला जाताे. त्यांच्या मंजुरीविना या शहरात काेणताही अधिकारी राहू शकत नाही इतका दरारा.
पुतण्या : राज ठाकरे
:राेखठाेक व करारी स्वभाव. शिवसेनेत मतभेदानंतर स्वत:चा पक्ष मनसेची स्थापना.
🔹गोपीनाथ मुंडे घराणे (२ पिढ्या)
गोपीनाथ मुंडे: भाजपचे दिग्गज दिवंगत नेते. महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. केंद्रात मंत्री झाले. मोठी मुलगी पंकजा महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री होत्या. दुसरी मुलगी प्रीतम बीडच्या खासदार आहेत.पुतण्या धनंजय मुंडे अगोदर भाजप मध्ये सक्रीय होते नंतर मतभेदांमुळे राष्ट्रवादीत गेले.विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत.या घराण्याचे बीड जिल्हावर वर्चस्व आहे.
🔹एकनाथ खडसे घराणे (२ पिढ्या)
एकनाथ खडसे: भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री. भाजपमध्ये घुसमट होऊ लागल्याने एकनाथ खडसे राष्ट्रवादी पक्ष जवळ केला.सध्या महाराष्ट्र मंत्री.खडसेंची पत्नी मंदा जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा, मुलगी रोहिणी जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष. खडसेंची सून रक्षा खडसे रावेरमधून लोकसभेच्या विद्यमान खासदार आहेत.🔹शंकरराव चव्हाण घराणे (२ पिढ्या)
शंकरराव चव्हाण: काँग्रेसतर्फे दोनदा मुख्यमंत्री. आधी १९७५, नंतर १९८६ मध्ये. केंद्रात अर्थ आणि गृहमंत्री होते. मुलगा अशोक चव्हाणही मुख्यमंत्री राहिले आहेत. अशोक यांची पत्नी अमिता आमदार राहिल्या आहेत. नांदेड जिल्हा वर चव्हाण कुटुंबाचे राजकीय वर्चस्व आहे.🔹 शिवाजीराव पाटील निलंगेकर (३ पिढ्या)
शिवाजीराव निलंगेकर १९८५-८६ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. काँग्रेसचे दिग्गज नेते. त्यांचा मुलगा दिलीप आमदार होते. सून रूपाताई खासदार होत्या. नातू संभाजी राज्यातील भाजप सरकारमध्ये मंत्री होते.🔹वसंतदादा पाटील घराणे (3 पिढ्या)
सांगलीचे वसंतदादा १९७७ ते ७८ मुख्यमंत्री होते. १९८३ ला पुन्हा सीएम होते , वसंतदादाच्या पत्नी शालिनीताई कॅबिनेट मंत्री होत्या. १९८० मध्ये खासदार झाल्या. मुलगा प्रकाश २००९ च्या आधी सांगलीचे खासदार होते.पुतण्या मदन पाटील खासदार व मंत्री होते.दादांचे नातू प्रतीक २००९ मध्ये सांगलीचे खासदार होते.एकेकाळी या घराण्याचे सांगली जिल्हा वर वर्चस्व होते.🔹छगन भुजबळ कुटुंब (२ पिढ्या)
छगन चंद्रकांत भुजबळ: बाळासाहेब ठाकरेंमुळे प्रभावित होऊन शिवसेनेत दाखल झाले. १९८५ मध्ये मुंबईचे महापौर होते. कट्टर हाडाचा शिवसैनिक म्हणुन ख्याती होती.मतभेदामुळे १९९१ मध्ये कॉंग्रेस प्रवेश केला. नंतर राष्ट्रवादीत गेले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. मुलगा पंकज आमदार राहिले. पुतण्या समीर २००९ मध्ये खासदार होते.सध्या भुजबळ मंत्री आहेत.🔹 शंकरराव मोहिते पाटील (३ पिढ्या)
साखर सम्राट म्हणुन ख्याती असलेले अकलुजचे शंकरराव पाटील १९५२ ते १९७२ पर्यंत सक्रिय. ते ४ वेळा आमदार होते. मुलगा विजयसिंह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते होते मतभेदामुळे ते भाजप मध्ये गेले.राज्याचे ते उपमुख्यमंत्रीही होते. त्यांचे भाऊ प्रताप भाजप खासदार होते. विजयसिंहांचा मुलगा रणजीत हे राज्यसभा खासदार होते.सोलापुर जिल्हा वर मोहीते पाटील घराण्याची हुकमत आहे.त्यांचा पक्ष कोणता हे महत्त्वाचे ठरत नाही🔹विखे पाटील घराणे (३ पिढ्या)
बाळासाहेब विखे पाटील: बाळासाहेब विखे पाटील काॅन्ग्रेस मधुन सात वेळा अहमदनगर उत्तरमधून जिंकले.शिवसेनेत जाऊन केंद्रात मंत्री झाले. मुलगा राधाकृष्ण महाराष्ट्रात काही काळ शिवसेनेत होते.परत कॉंग्रेस मध्ये येऊन विरोधी पक्षनेते होते आता ते भाजप मध्ये आहेत. राधाकृष्ण यांची पत्नी शालिनी अहमदनगरच्या जि. प. अध्यक्ष होत्या. मुलगा सुजय भाजप मधुन खासदार आहेत. या घराण्याचे पुर्ण नगर जिल्हा वर वर्चस्व आहे.🔹पंतगराव कदम घराणे (२ पिढ्या)
मुळचे सांगली जिल्ह्यातील शिक्षण सम्राट पतंगराव महाराष्ट्रात मंत्री होते. मुलगा विश्वजीत युकाँ अध्यक्ष व मंत्री आहेत.तर भाऊ मोहनराव कदम आमदार आहेत.
🔹 विलासराव देशमुख घराणे (२ पिढ्या )
विलासराव मुख्यमंत्री होते.लातुर जिल्हा वर एकतर्फी वर्चस्व आहे. मुलगा अमित देशमुख आमदार.व मंत्री आहेत.
वरील घराणी पाहिली की लक्षात येईल की या घराण्याच्या भोवती महाराष्ट्रातील सत्ता फिरत असते.ही प्रस्थापित राजकीय घराणी आज एका पक्षात तर उदया दुसरयाच पक्षात असतात तरीही जनमानसावर त्यांची पकड मजबूत आहे.काही दादा, आण्णा, मामा, तात्या, साहेब, भाई या टोपणनावाने ओळखले जातात.यांच्या शिवाय महाराष्ट्रातील राजकारणाचे पान हलु शकत नाही अशी परिस्थिती आहे.
________________________________
🥀