सर माणकेशा

फिल्ड मार्शल सॅम माणेकशा 



ब्रिटीशांच्या राजवटीतल्या भारतीय लष्करात एक गोरागोमटा-देखणा पारशी अधिकारी होता. स्वभावाने हूड असलेल्या या अधिकाऱ्याला मोटरसायकलचे प्रचंड वेड होते. त्याने १९४७ च्या काळात जेम्स मोटरसायकल १६०० रुपयांना विकत घेतली. मात्र या मोटरसायकलवर त्याच्या एका कनिष्ठ अधिकाऱ्याचा डोळा होता. बहुतेक वेळेस तोच ही मोटरसायकल चालवत असे.

भारत-पाकिस्तान अशी फाळणी निश्चित झाली आणि मेजर हुद्यावर असलेला तो कनिष्ठ अधिकारी पाकिस्तानात जाणार हे ठरले. फाळणीच्या जेमतेम दोन दिवस आधी तो मेजर या अधिकाऱ्याला म्हणाला; "सर तुम्हाला भारतात सगळे काही मिळेल; मला पाकिस्तानात काहीही मिळणार नाही, त्यामुळे तुमची बाईक मला विका ही विनंती!"
अधिकाऱ्यानेदेखील मोठ्या मनाने आपली लाडकी मोटरसायकल १००० रुपयात विकायचे मान्य केले!

आता माझ्याजवळ पैसे नाहीत, मी पाकिस्तानात गेलो की लगेच पाठवून देतो, असे सांगून मेजर गाडी घेऊन गेला. शब्दाला जागला तर तो पाकिस्तानी कसला? अर्थात, हे एक हजार रुपये कधीच मिळाले नाहीत. 

पुढे नंतर १९७१ च्या युद्धात हे अधिकारी भारताचे नेतृत्व करत होते; तर तो मेजर पाकिस्तानचे. युद्ध संपल्यावर बांगलादेशाची निर्मिती झाली. त्यावेळी या अधिकाऱ्याने सांगितले; "पाकिस्तानच्या लष्कराला त्यांचा भूतकाळ खूप महागात पडला! मी तर माझ्या मोटरसायकलचे फक्त १००० रुपये मागितले होते, ते न मिळाल्याने  मी त्यांच्याकडून अर्धा पाकिस्तानच घेतला आणि माझ्या बाईकची किंमत वसूल केली!"

पैसे बुडवणारा मेजर होता याह्याखान.......
आणि तो शूर अधिकारी म्हणजे अन्य कोणी नसून;
"जर एखादा माणूस मृत्यूला घाबरत नाही असे म्हणाला; तर एक तर तो खोटं तरी बोलतोय किंवा तो गुरखा आहे!" असे म्हणणारे फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशा अर्थात भारताचे लाडके सॅम बहादूर!

फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांचा आज (२७ जून २००८) स्मृतिदिन!

सर माणकेशा,Field Marshal Sam Maneksha
त्यांच्या स्मरणदिनी त्यांच्या स्मृतींना सादर वंदन......!

===========================================================

Field Marshal Sam Maneksha


He was a handsome Parsi officer in the Indian Army during the British rule. This officer with a hood by nature had a huge craze for motorcycles. He bought a James motorcycle in 1947 for Rs 1,600. However, one of his junior officers had his eye on this motorcycle. Most of the time he was riding this motorcycle.

Such an India-Pakistan partition was decided and it was decided that the junior officer in the post of Major would go to Pakistan. Just two days before the partition, he said to the Major; "Sir you will get everything in India; I will not get anything in Pakistan, so please sell your bike to me!"
Even the officer generously agreed to sell his darling motorcycle for Rs.1000!

"I don't have any money now. I will send it as soon as I go to Pakistan," he said. If the word wakes up, who is that Pakistani? Of course, it never got a thousand bucks.

Later in the 1971 war, these officers were leading India; So he belongs to Major Pakistan. Bangladesh was formed when the war ended. At the time, the officer said; "His past cost the Pakistani army dearly! I had only asked for Rs 1,000 for my motorcycle, but since I didn't get it, I took half of it from them and recovered the price of my bike!"
Yahya Khan was the major who drowned money .......
And that brave officer is no one else;
"If a man says he is not afraid of death; then either he is lying or he is a Gurkha!" Field Marshal Sam Hormesji Framji Jamshedji Maneksha, the darling of India, Sam Bahadur!
Field Marshal Sam Manekshaw's Memorial Day Today (June 27, 2008)!
Salutations to his memory on his Memorial Day ......!
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম