⭕ रक्तासारख्या लालभडक पाण्याचा धबधबा
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
________________________
न्यूयॉर्क , जगात अनेक ठिकाणी निसर्गाचा विचित्र आविष्कार पाहायला मिळत असतो. अंटार्क्टिका म्हणजेच दक्षिण ध्रुवावरही असाच एक नैसर्गिक चमत्कार आहे. या ठिकाणी रक्तासारख्या गडद लाल रंगाच्या पाण्याचा धबधबा आहे. अंटार्क्टिकाच्या मॅक-मर्डो खोर्यातील टॉयलेर ग्लेशियरमध्ये हा धबधबा आहे. त्याच्या लाल रंगामुळे त्याला ‘ब्लड वॉटरफॉल’ असेच नाव पडले आहे. हा वैशिष्ट्यपूर्ण धबधबा असूनही तो पाहण्यासाठी कुणी पर्यटक तिथे जात नाही. याचे कारण म्हणजे त्याठिकाणी काही भुताटकी असल्याचा (गैर) समज आहे. हे भूतच लोकांना मारते व त्यांच्या रक्तामुळे धबधब्याचा रंगलाल आहे, असे मानले जाते. टॉयलर ग्लेशियरचा शोध 1911 मध्ये अमेरिकन संशोधक ग्रिफिथ टॉयलर यांनी लावला होता. त्यांचेच नाव या ग्लेशियरला देण्यात आले आहे. तेथील हा धबधबापाच मजली इमारतीइतका उंच आहे. त्याच्या पाण्यात सतरा प्रकारचे सूक्ष्म जीव आढळतात. पाण्यातील आयर्न ऑक्साईड हवेच्या संपर्कात येताच ते लाल रंगाचे होत असल्याने या पाण्याला लाल रंग मिळतो.♍======================================================================================================================
A waterfall of blood-red water
___________________________
mahiti sevaGroup Pethwadgaon
________________________
In New York, many places in the world are witnessing strange discoveries of nature. There is a similar natural miracle in Antarctica, the South Pole. This place has a waterfall of dark red water like blood. The waterfall is located in the Tyler Glacier in the McMurdo Valley of Antarctica. Due to its red color, it is nicknamed 'Blood Waterfall'. Despite this characteristic waterfall, no tourist goes there to see it. This is because there is a (non) perception that there is something ghostly. It is believed that demons kill people and that their blood is the color of the waterfall. The Tyler Glacier was discovered in 1911 by American researcher Griffith Tyler. The glacier is named after him. The waterfall is as tall as a multi-storey building. Seventeen types of micro-organisms are found in its water. The iron oxide in the water turns red as soon as it comes in contact with air, so it gets red.
A waterfall of blood-red water,
Tags
माहिती