कोल्हापूर: कोल्हापूरच्या खांडके यांनी असा व्हॉल्व शोधला आहे की २५ % पेट्रोलची बचत होते.
-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍
----------------------------------------
❍ दिनांक - ३०.०६.२०२०. ❍
----------------------------------------
दिवसेंदिवस पेट्रोल,डिझेलच्या किंमती वाढत आहेत.याचा सरळ संबंध महागाईशी आहे.कुठलेच सरकार यावर गांभीर्याने पाहत नसले तरी सामान्य नागरिक मात्र वाढत्या महागाईने मेटाकुटीला आला आहे.
रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर (excise duty), डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात.
वाढत्या पेट्रोल दराच्या पार्श्वभुमीवर कोल्हापूरच्या एका व्यक्तीने असा मेकॅनिकल व्हॉल्व तयार करण्यात यश देखील मिळवले आहे ज्याने गाडीत पेट्रोलची २५% टक्के बचत होते.कपड्यांचा व्यवसाय करणारे अरविंद खांडके जेव्हा जेव्हा त्यांच्या कामासाठी कोल्हापूरहुन आसपासच्या गावात त्यांच्या मोटरसायकलवरून जायचे, तेव्हा त्यांना एकच चिंता सतावत असे. ती म्हणजे गाडीसाठी लागणारे पेट्रोल कसे बचत करता येईल,त्याकरता काय करावे लागेल? त्यांनी विचार केला की पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करणे आपल्या हातात नाही पण आपण इंजिनमध्ये काही बदल केले तर पेट्रोलचा प्रश्न आपण आपल्यापुरता तरी नक्कीच सोडवू शकतो.अरविंद खांडके हे दहावी उत्तीर्ण आहेत आणि त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. त्यांनी स्वतःच्या गाडीच्या इंजिनमध्ये बदल करण्यासाठी काम सुरु केले.त्यांनी आपल्या मोटरसायकलवरून वरच प्रयोग चालु केला.जुजबी तांत्रिक ज्ञान असलेने त्यांनी अभ्यास चालु केला.मिस्त्री लोंकाशी बोलुन,पुस्तके वाचून आपणास हवा तसा पार्ट बनवुन घेतला.सुरूवातीला त्यांचा प्रयोग यशस्वी झाला नाही.पण त्यांनी धीर न सोडता आपला प्रयोग चालुच ठेवला.पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये इंजिनला कार्बोरेटर जोडलेले असते.कार्बोरेटर हा गाडीचा एक महत्वाचा एक पार्ट आहे. त्यांनी लेथ मशिनवर आपणास हवा तसा व्हॉल्व प्रत्यक्ष उभे राहुन बनवुन घेतला व ह्या कार्बोरेटरला बसवला. पण काहीतरी चुकले. परत त्यांनी नायलॉन व पॉलीप्रोपिलीन वापरून नवीन व्हॉल्व तयार केला. हा व्हॉल्व १ एचपी ते १.२५ एचपी इंजिनसाठी चालू शकणार होता. त्यांचा हा शोध सार्थकी लागला.नंतर परत छोटे छोटे बदल करत या व्हॉल्वमध्ये बदल केले व या मिश्रणात पाणी सुद्धा मिसळले जाईल आणि त्यामुळे पेट्रोलची ३० टक्के बचत होईल असे केले.पाणी गरम होऊन त्याचे रूपांतर वाफेत होऊन ती वाफ शक्तीचा स्रोत /इंधन म्हणून वापरले जाईल आणि त्याने इंजिनची क्षमता वाढण्यास मदत होईल.असे केल्याने मोटरसायकलच्या पेट्रोल बचतीत फरक पडल्याचे दिसुन आले.जेव्हा गाडीच्या इंजिनमध्ये पेट्रोलचे दहन होते तेव्हा वेगळ्या टाकीत असलेल्या पाण्याची वाफ होऊन इंजिनचें ऍव्हरेज वाढण्यास मदत होते.
अश्या हायब्रीड इंधनामुळे पेट्रोल सप्लायच्या टक्केवारीत घट होते आणि त्यामुळे गाडीत कार्बन कमी साठते व इंजिनचे आयुष्य वाढते ह्यामुळे इंजिन ऑईलचे सुद्धा आयुष्य वाढून परिणामी गाडी चांगली चालते व गाडीचेही आयुष्य वाढते.
खांडके ह्यांनी सांगितले की त्यांनी त्यांच्या गाडीत हा व्हॉल्व बसवून घेतल्यापासून खांडकेंना आता दर ५००० किमीचे रनिंग झाल्यानंतर इंजिन ऑइल बदलावे लागते.आधी हेच त्यांना २००० किमी झाल्यानंतर इंजिन ऑइल बदलून घ्यावे लागत असे.
त्यांना त्यांच्या व्यापारासाठी कायमच गाडीने सगळीकडे प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांना तर हा व्हॉल्व बसवून घेतल्यापासून खूप जास्त फायदा झाला आहे जे त्यांनी सांगितलेल्या आकड्यांतूनच दिसून येते.
१९९९ साली कोल्हापूरच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ह्याची चाचणी घेण्यात आली. ३५० सीसीच्या एनफिल्ड गाडीत जर हा व्हॉल्व बसवण्यात आला आणि कार्बन मोनोऑक्साइड आणि हायड्रो कार्बन उत्सर्जन किती होते हे तपासण्यात आले.
व्हॉल्व बसवला असल्यास १२० rpm ला CO रिडक्शनचे प्रमाण ८.३ टक्के होते तर २००० rpm ला हे प्रमाण ८२ टक्के इतके होते.
जेव्हा गाडीचा वेग वाढतो तेव्हा प्रक्षुब्धता (टर्ब्युलन्स) देखील वाढते आणि व्हॉल्व असेल तर इंधनाचे दहन अधिक प्रभावी होते आणि इंधनाचे नुकसान (गळती) गती कमीतकमी होते जी व्हॉल्व नसेल तर खूप जास्त होते. “
खांडके ह्यांनी त्यांच्या ह्या दोन्ही यंत्रांचे पेटन्ट घेतले आहे. पहिले पेटन्ट त्यांनी १९९९ साली मिळवले आणि दुसरे २०१८ साली मिळवले. जेव्हा त्यांना विचारले की ह्या व्हॉल्वची व्यावसायिक विक्री करण्याबाबत त्यांचे काय मत आहे तेव्हा त्यांनी नम्रपणे सांगितले की,
“मी एक सामान्य व्यावसायिक आहे आणि हा व्हॉल्व मोठ्या प्रमाणावर तयार करण्यासाठी माझी इतकी मोठी आर्थिक तयारी नाही. मला गाड्यांच्या निर्मितीची आणि त्या तंत्रज्ञानाची आवड आहे तसेच कमी पेट्रोलवर चालणारी गाडी ही माझी गरज होती म्हणून मी हा प्रयोग केला.
जुजबी ज्ञान असताना सुध्दा अविरत कष्ट करून खांडके यांनी शोधलेल्या या नविन व्हॉल्वला मान्यता मिळेल अशी आशा करायला हरकत नाही.
👉तुम्हाला ह्या पार्टबद्दल जर खांडके ह्यांच्याशी बोलण्याची इच्छा असेल तर तुम्ही arvinde6@gmail.com ह्या इ मेल ऍड्रेसवर त्यांच्याशी संपर्क साधू शकता.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9890875498 ✺
❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
Tags
BLOG