डॉ.आंबेडकर व स्वा. सावरकर भेट

 स्वासावरकर आणि डॉ. आंबेडकर 
डॉ आंबेडकर व स्वा. सावरकर हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते.दोघांचेही विचार वेगवेगळे असले, मतभेद असले तरी मनभेद नव्हते.दोंघाच्याही निर्वाणानंतर राजकारणी लोकांनी त्यांच्याविषयी निष्कारण गैरसमज निर्माण केले आहेत. 
 इंग्लडला ‘बॅरिस्टर’ होण्यासाठी दोघेही गेले. दोघेही उतीर्ण झाले. क्रांतिकार्याची शिक्षा म्हणून सावरकरांनी बॅरिस्टरी नाकारली आणि भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न जगाच्या वेशीवर टांगून सावरकर अंदमानामध्ये १९२१ पर्यंत कष्ट भोगत राहिले, कोलू ओढीत पिचले. इकडे विद्येच्या सागरामध्ये अथांगपणे पोहत राहिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हजारो ग्रंथ वाचित, चिंतन करीत, मनन करीत राहिले. त्यांच्या विद्ववतेचा सन्मान म्हणून १९२७ साली मुंबईचे राज्यपाल सर लॉरेन्स यांनी बाबासाहेबांना मुंबई विधीमंडळावर नियुक्त सभासद म्हणून नेमले. फार थोड्या लोकांना हे माहिती आहे की, बाबासाहेबांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना पूर्ण बंधमुक्त करून सोडवावे, अशी विनंती याच कालखंडात केली होती.
१९२४ मध्ये ‘कलम ४०१’ ‘इंडियन क्रिमिनल प्रोसिजर कोड’च्या अन्वये सरकारने सावरकारांना सशर्त बंधमुक्त करुन रत्नागिरीतली स्थानबद्धता आणि राजकारणात भाग घ्यावयाच्या नाही, या दोन अटी पाच वर्षांकरिता घातलेल्या होत्या. प्रत्यक्षात पूर्णपणे बंधमुक्त होण्यासाठी सावरकरांना आणखी १३ वर्षे बंधनात राहावे लागले, पण बाबासाहेबांनी त्यांच्यामार्फत १९२७ सालीच सरकारचे लक्ष वेधून घेतले होते. 
सावरकरांचं चरित्र 'सावरकर अँड हिज टाईम्स'मध्ये धनंजय कीर लिहितात की, "त्यावेळी सावरकर म्हणाले होते की, अस्पृश्यतेचा केवळ निषेध करून भागणार नाही तर धर्माचा आदेश म्हणून ही प्रथा मुळापासून उखडून टाकण्याची वेळ आली आहे. यात केवळ नीति किंवा औचित्याचा प्रश्न नाहीये, तर न्याय आणि मानवतेच्या सेवेचे मुद्दे देखील संबंधित आहेत."
स्वा. सावरकर, डॉ. आंबेडकर भेट कधी झालीच नाही असा एक अपसमज मराठी चरित्रकारांत, राजकारण्यांत, संशोधकांत, विचारवंतात अकारण पसरलेला आहे.
 पण तसे नाही. १९३९ ते १९४४ पर्यंत हे दोघे महान पुरुष अनेक वेळा एकमेकांसमोर आले होते. त्यांच्यात चर्चा, विचारविनिमय होत होता. परस्परांविषयी त्यांना आस्था, सदिच्छा होती, कितीतरी गोष्टींत त्यांचे मतैक्य होते. इतकेच नव्हे तर डॉक्टरांनी त्यांचा Thought on Pakistan हा ग्रंथ प्रसिद्ध होण्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांशी त्याबद्दल चर्चासुद्धा केली होती. एका इतिहासावर नवा प्रकाश...
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही हिंदुस्थानच्या समाजकारण आणि राजकारणातली दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वे. दलितांच्या हिताचा विचार आणि आचार हे बाबासाहेबांचे जीवन उद्दिष्ट, तर हिंदूंना विज्ञाननिष्ठ बनवून त्यांचे जातीविरहित संघटन बनवून हिंदूंचा जन्मभर कणखरपणे आवाज उठविण्याचे कार्य सावरकरांनी केले.
‘बहिष्कृत भारत’च्या पहिल्या अंकांच्या शीर्षस्थानी आंबेडकरांनी ज्ञानेश्वरांची ओवी योजिलेली होती.
 
आता कोदंड घेऊन हाती। आरुढ पां इथे रथी।
देई आलिंगन वीरवृत्ती। समाधाने।
जगी कीर्ती रुढवी। स्वधर्माचा मानू वाढवी।
इया भारा पासोनि सोडवी। मेदिनी हे।
आता पार्था निः शंकु होई। या संग्रामा चित्त देई।
एथ हे वाचूनि काही। बोलो नये।
मुंबईच्या दादर विभागात अनेक वर्षे निवास करूनही यांची भेट कधीच झाली नाही असा एक अपसमज गेली कित्येक वर्षे पसरलेला आहे. डॉ. य. दि. फडके. डॉ. धनंजय कीर तसेच अनेक आंबेडकरी विचारवंत त्याच समजुतीत होते.
सावरकर सदनाला नाही म्हटले तरी नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. लोहिया, मानवेंद्र रॉय, बाबू पुरुषोत्तमदास टंडन, माजी राज्यपाल श्रीप्रकाश, केंद्रीय मंत्री स. का. पाटील, बाबू जगजीवनराम यांसारखी राष्ट्रीय पातळीवरची मंडळी, लता मंगेशकर, आशा भोसले, सुधीर फडके, भालजी पेंढारकर, पृथ्वीराज कपूर, शांता आपटे यांच्यासारखी चित्रपटसृष्टीशी निगडित असलेली मंडळी भेट देऊन गेलेली होती. तिथे बाबासाहेबांसारखा खंदा विचारवंत, प्रज्ञाशाली नेता येऊन गेलाच नसेल ही गोष्ट खरी वाटण्यासारखी बिलकूल नाही.
डॉ.आंबेडकर व स्वा. सावरकर भेट

दुसर्या बाजूने याच सावरकरांचा धाकटा भाऊ डॉ. नारायणराव सावरकर हा डॉक्टर साहेबांच्या खास वर्तुळातला. डॉ. मुंजे, साहित्यसम्राट केळकर, शंकरराव दाते, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, श्री. म. माटे, आचार्य अत्रे, आचार्य दोंदे, रामभाऊ तटणीस ही थोर मंडळीसुद्धा बाबासाहेब आणि सावरकर दोघांच्याही परिचयातली.
मग हा प्रकार काय होता? अपसमज! चुकीची धारणा.
या विषयाच्या खोलात गेल्यावर एक नाहीतर कमीत कमी नऊ-दहा प्रसंगाची साक्ष इतिहास देत आहे की, बाबासाहेब आणि सावरकर एकमेकांच्या समोर असत, बोलत असत, चर्चा करीत असत. हे दोघेही महापुरुष परस्परांविषयी आपुलकी, सदिच्छा बाळगून होते, आदर बाळगून होते, इतकेच नव्हे तर बर्याच विषयांत त्यांच्यात मतैक्य होते.
सावरकरांना स्थानबद्धतेमुळे  रत्नागिरी सोडणे शक्य नसले तरी महाडचा सत्याग्रह असो किंवा काळाराम मंदीराचा असो सावरकरांनी आणि सावरकर अनुयायांनी आंबेडकरांना त्या सर्व लढ्यात खुल्यादिलाने साथ दिलेली दिसते. स्वातंत्र्यवीरांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर आपल्या अनुयायांबरोबर त्या लढ्यात होते. डॉ. सावरकर काळाराम मंदीराच्या सत्याग्रहात कसे होते यावर आंबेडकरांचे चरित्रकार चांगदेव खैरमोडे यांनी चांगला प्रकाश टाकला आहे. देवदर्शनाचा हक्क पूर्वास्पृश्यांना मिळावा म्हणून सावरकर जागरुक होते. 
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉक्टर बाबासाहेब यांच्या ऐतिहासिक भेटीगाठी संदर्भातली ही खालील निरीक्षणे -
१) २८ जानेवारी १९३९ रोजी दादरच्या हिंदू कॉलनीत ‘विविध वृत्त’चे संपादक रामभाऊ तटणीस यांच्या मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी बॅ. जमनादास मेहता यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा झाली. सावरकर आणि आंबेडकर दोघांनीही पाठिंब्याची भाषणे केली.
२) ५ मे १९३९ रोजी भारत मंत्र्याचे नियोजित सल्लागार, मध्य प्रांताचे माजी राज्यपाल डॉ. राघवेंद्र राव यांच्या सन्मानार्थ हिंदू सभेने एक उपहार दिला. त्याप्रसंगी सावरकर, आंबेडकर दोघेही उपस्थित होते.
३) १३ जानेवारी १९४० रोजी सावरकर सदनात त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आचार्य दोंदे आणि दलितांचे नेते डॉ. आंंबेडकर आले होते, तेव्हा चर्चा झाली.
४) १८ एप्रिल १९४०. कॉंग्रेसेतर पक्षांची सभा सर चुनीलाल मेहतांनी बोलावली होते. दोघेही उपस्थित होते.
५) १४ मार्च १९४० ताजमहाल हॉटेलमधल्या बैठकीस सर जगदीश प्रसाद, सर र. पु. परांजपे, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, लोकनायक आणे, डॉ. मुंजे, सावरकर, आंबेडकर दोघेही उपस्थित होते.
६) २६ जुलै १९४१ पुण्याच्या गोखले हॉलमध्ये सर्वपक्षीय परिषद भरली होती. सर तेजबहादूर सप्रू, डॉ. राधाकृष्णन, र. पु. परांजपे, बॅ. जयकर, सर विश्वेश्वरैया, डॉ. आंबेडकर, बॅ. सावरकर दोघेही उपस्थित होते.
७) ११ एप्रिल १९४३ दिल्लीचे हिंदू महासभा भवन - व्हाइसरॉयच्या कौन्सिलचे सभासद डॉ. आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची एक तास बैठक झाली.
८) २८ फेब्रुवारी १९४१ रोजी मद्रासच्या ‘हिंदू’मध्ये सावरकरांची मुलाखत प्रसिद्ध झाली होती. त्यात त्यांनी डॉ. आंबेडकरांनी ‘पाकिस्तान’वर जे पुस्तक प्रसिद्ध केले होते त्याची प्रसिद्धी होण्यापूर्वी माझ्याशी चर्चा केली होती असे सांगितले. आंबेडकरांचे म्हणणे परिस्थितीचे सत्यकथन आहे, पाकिस्तानचा पाठपुरावा नाही असे उद्गारही सावरकरांनी काढले होते.
९) ५ फेब्रुवारी १९४० रोजी पारशी समाजाची एक बैठक मलबार हिलवर बोलाविली गेली होती. या बैठकीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर दोघेही उपस्थित होते. दोघांनी भाषणे केली. सावरकर म्हणाले, ‘‘कोणत्याही राष्ट्रीय कारभारात आणि राष्ट्रकार्यात अल्पसंख्य गटाला योग्य तो वाटा देण्यास हिंदू महासभा सदैव तयार राहील. मुसलमानांना प्रसन्न ठेवण्याच्या प्रयत्नात कॉंग्रेसने मात्र मुसलमानांना डोक्यावर बसविले आहे. बाबासाहेब म्हणाले, ‘‘जीना म्हणतात की कॉंग्रेसने मुसलमानांवर अन्याय केला. त्यांनी जर १०० आरोप केले असतील तर त्यातले फार तर पाच आरोप जीना सिद्ध करू शकतील. अस्पृश्यांचा पवित्रा फार तर कॉंग्रेसविरोधी म्हणता येईल, पण तो हिंदूविरोधी नाही.’’ प्रसंग लक्षात घेतले तर एक गोष्ट सिद्ध होते की, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. आंबेडकर यांच्या भेटी होत होत्या, प्रत्यक्ष संवाद होता. परस्परांविषयी आस्था, आदर, सदिच्छा भाव होता.

>=>=>=>=>=>=>=>=>=>=>=>=>=>
Savarkar and Ambedkar

Swa. Savarkar, Dr. A misconception that Ambedkar never met has spread among Marathi biographers, politicians, researchers and thinkers.

 But that is not the case. From 1939 to 1944, these two great men met many times. There was discussion and exchange between them. They had faith, goodwill towards each other, they had consensus on many things. Not only that, the doctor had also discussed his book Thought on Pakistan with Swatantryaveer Savarkar before it was published. A new light on a history ...
Swatantryaveer Savarkar and Dr. Babasaheb Ambedkar are two great personalities in the sociology and politics of India. Babasaheb's life goal was to think and act in the interest of the Dalits, while Savarkar worked to raise the voice of Hindus throughout his life by making Hindus scientific and his non-caste organization.
A misconception has been circulating for the last several years that they have never met even after living in the Dadar division of Mumbai for many years. Dr. य. On Phadke. Dr. Dhananjay Kir and many Ambedkarite thinkers were of the same opinion.
Although Savarkar said no to the House, Netaji Subhash Chandra Bose, Dr. Lohia, Manvendra Roy, Babu Purushottamdas Tandon, former Governor Sriprakash, Union Minister S. Of Patil, Babu Jagjivan Ram, Lata Mangeshkar, Asha Bhosale, Sudhir Phadke, Bhalji Pendharkar, Prithviraj Kapoor, Shanta Apte and many others. The fact that a thoughtful, intelligent leader like Babasaheb did not come and go there does not seem to be true at all.
________________________
Information Service Group Pethwadgaon
___________________________
On the other hand, Savarkar's younger brother Dr. Narayanrao Savarkar belongs to the special circle of doctors. Dr. Munje, Sahitya Samrat Kelkar, Shankarrao Date, Dr. Shyamaprasad Mukherjee, Shri. M. Mate, Acharya Atre, Acharya Donde, Rambhau Tatnis are also known to both Babasaheb and Savarkar.
So what was this type? Misunderstanding! Misconception.
Going into the depths of this subject, history is giving evidence of at least nine or ten incidents where Babasaheb and Savarkar used to be in front of each other, talking and discussing. Both of these great men were affectionate, good-natured, respectful of each other, not only that, but they had a consensus on many issues.
The following observations regarding the historical meeting between Swatantryaveer Savarkar and Dr. Babasaheb -
1) On January 28, 1939, in the Hindu Colony of Dadar, Rambhau Tatnis, the editor of 'Vividh Vritt', was elected to the Mumbai Municipal Corporation. A meeting was held under the chairmanship of Jamnadas Mehta. Both Savarkar and Ambedkar spoke in support.
2) On May 5, 1939, the planned advisor to the Minister of India, former Governor of Madhya Pradesh, Dr. The Hindu Sabha gave a gift in honor of Raghavendra Rao. Both Savarkar and Ambedkar were present on the occasion.
3) On 13th January 1940, Acharya Donde and Dalit leader Dr. When Ambedkar came, there was a discussion.
4) April 18, 1940. The meeting of non-Congress parties was convened by Sir Chunilal Mehta. Both were present.
5) March 14, 1940 at the meeting at the Taj Mahal Hotel, Sir Jagdish Prasad, Sir R. P. Paranjape, Dr. Shyamaprasad Mukherjee, Lok Nayak Aane, Dr. Munje, Savarkar, Ambedkar were both present.
6) An all party conference was held on 26th July 1941 at Gokhale Hall, Pune. Sir Tej Bahadur Sapru, Dr. Radhakrishnan, and. P. Paranjape, Ba. Jayakar, Sir Visvesvaraya, Dr. Ambedkar, B.A. Savarkar was both present.
7) April 11, 1943 Delhi's Hindu Mahasabha Bhavan - Member of the Viceroy's Council Dr. Ambedkar and Swatantryaveer Savarkar had an hour-long meeting.
8) Savarkar's interview was published in 'Hindu' of Madras on 28th February 1941. In it, he met Dr. He said that he had discussed the book on 'Pakistan' with Ambedkar before it was published. Ambedkar's statement is a statement of fact, Savarkar had also said that Pakistan is not being pursued.
9) On February 5, 1940, a meeting of the Parsi community was called on Malabar Hill. Both Dr. Babasaheb Ambedkar and Swatantryaveer Savarkar were present at this meeting. The two made speeches. Savarkar said, "The Hindu Mahasabha will always be ready to give its due share to the minority group in any national affairs and national work. However, in an effort to keep the Muslims happy, the Congress has put the Muslims on their heads. Babasaheb said, "Jinnah says that Congress has done injustice to Muslims. If they have made 100 allegations, then at least five of them can be proved alive. The sanctity of the untouchables can be said to be very anti-Congress, but it is not anti-Hindu. " Ambedkar's meetings were taking place, there was a direct dialogue. There was faith, respect, goodwill towards each other.


> => => => => => => => => => => => => =>
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম