🔹गावानां खुर्द आणि बुद्रुक का म्हणतात🔹
_________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
________________________
खुर्द आणि बुद्रुक :- महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी खुर्द आणि बुद्रुक असे शब्द गावांच्या नावापुढे दिसतात.
निवे खुर्द किंवा निवे बुद्रुक, तसेच आंबेगाव खुर्द आणि आंबेगाव बुद्रुक किंवा वडगाव खुर्द आणि वडगाव बुद्रुक अशी दोन दोन गावे शेजारीशेजारी वसलेली दिसतात. तर हा खुर्द आणि बुद्रुक काय प्रकार आहे ? मला पडलेला हा प्रश्न एकदा ऐतिहासिक लिखाण वाचताना सुटला. त्यात असे लिहिले होते – – – –
पूर्वी मुसलमानी अंमल होता तेव्हा उर्दूमिश्रित किंवा फारसी मिश्रित भाषा बोलली किंवा लिहिली जात असे. मोगल किंवा आदिलशाही कुतुबशाही, निजामशाही इत्यादी कालखंडामध्ये मुस्लीम अंमलात खुर्द आणि बुद्रुक हे शब्द वापरले जात. एखाद्या रस्त्यामुळे एका गावाचे दोन भाग पडत असले तर ते दोन भाग समसमान कधीच नसत. एक भाग छोटा तर दुसरा मोठा असे. त्यातील मोठा भाग असलेल्या गावाला बुजुर्ग आणि छोटा भाग असलेल्या गावाला खुर्द असे म्हणत. बुजुर्ग म्हणजे मोठा आणि खुर्द म्हणजे चिल्लर किंवा छोटा अशा अर्थाने त्या गावाच्या दोन्ही भागांना खुर्द किंवा बुद्रुक असे संबोधले जाई. या ‘बुजुर्ग’चा अपभ्रंश होऊन बुद्रुक हा शब्द तयार झाला आणि ‘खुर्द’चा अपभ्रंश न होता तो तसाच राहिला.♍
======================================================================================================
Why are the villages called Khurd and Budruk🔹
___________________________
mahiti seva Group Pethwadgaon
________________________
Khurd and Budruk: - In many places in Maharashtra, the words Khurd and Budruk appear next to the names of villages.
Nive Khurd or Nive Budruk, as well as two villages namely Ambegaon Khurd and Ambegaon Budruk or Wadgaon Khurd and Wadgaon Budruk are seen side by side. So what kind of Khurd and Budruk is this? This question came to me once while reading a historical text. It said - - - -
In the past, when Muslims were in power, Urdu or Persian mixed languages were spoken or written. The words Khurd and Budruk were used in Muslim times during the Mughal or Adilshahi Qutbshahi, Nizamshahi etc. If a road divides a village into two parts, they will never be the same. One part was small and the other was big. The village with a large part of it was called Buzurg and the village with a small part was called Khurd. Buzurg means big and Khurd means chiller or small, so both parts of the village were called Khurd or Budruk. The word Budruk was formed after the corruption of 'Buzurg' and it remained the same without the corruption of 'Khurd'.
Tags
माहिती