🔹सरस्वती नदी आजही आहे🔹

सरस्वती नदी आजही आहे!

सरस्वती एक काल्पनिक नदी होती असा इंग्रजांचा समज होता. त्यामुळे तिचा, तिच्या उपनद्यांचा हंगामी नाला म्हणून उल्लेख करण्यात आला.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=208006239597307&id=100011637976439
पण या परिसरातल्या उत्खननाच्या जागा बघितल्यावर सरस्वती नदी एक मिथक होती असं कोणीही म्हणू शकणार नाही.♍
'प्रोजेक्ट मेघदूत'चा गट गेले काही दिवस सरस्वती नदीच्या उगमाच्या आणि उगमाबरोबरच तिच्याकडे असलेल्या अनेक गुपितांचा शोध घेत सरस्वतीच्या खोऱ्यात प्रवास करत होता. आदिबद्री, कुरु क्षेत्र आणि नंतर पिओहा या मार्गानंतर 'प्रोजेक्ट मेघदूत'चा प्रवास पुढे सुरू झाला. या पुढच्या मार्गावर त्यांनी काही पुरातत्त्व स्थळांना (archaeological sites) भेटी दिल्या.
सरस्वती नदीच्या खोऱ्यामधल्या काही पुरातत्त्वशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या काही स्थळांना भेटी दिल्या. सरस्वती नदी ही एखादी नदी नव्हती. सरस्वतीला एकूण सात छोटय़ामोठय़ा नद्या जोडल्या गेल्या होत्या. ही सर्व पुरातत्त्वीय स्थळे या सात नद्यांच्या क्षेत्रात सापडतात. या सात नद्यांची मिळून सरस्वती ही माता आहे असा त्यांचाऋग्वेदात उल्लेखही आहे. या सात नद्यांचा महाभारतातही उल्लेख सापडतो. त्यातल्या काही प्रमुख उपनद्यांची नावं गंभीरा, दृषद्वती आणि आज जी नदी अस्तित्वात आहे ती म्हणजे घग्गर अशा तीन महत्त्वाच्या उपनद्या आहेत♍२००३ नंतर इथलं उत्खनन थांबलं. त्यानंतर गेली अनेक र्वष यावर काही नवीन ज्ञान उपलब्ध झालं नाही. पण आता परत या ठिकाणी उत्खनन करण्याची परवानगी पुण्यातल्या डेक्कन कॉलेजचे सह-संचालक वसंत शिंदे यांना मिळाली आहे. या वर्षीपासून या स्थळावर त्याचं संशोधन सुरू होईल.
ही राखीगढी ३०० हेक्टरमध्ये पसरली आहे. ही जागा मोहंजोदडोपेक्षाही मोठी आहे. एवढंच नव्हे तर अनेक शास्त्रज्ञांच्या मते ही जागा सिंधू संस्कृतीपेक्षाही प्राचीन असणार आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या पुराव्यांनुसार इथे मिळालेले अवशेष हडप्पा किंवा मोहंजोदडोवर मिळालेल्या अवशेषांपेक्षा प्राचीन आहेत.♍कुणाल गावामध्ये सरस्वतीचा पुरावा!
बानवलीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हा गट कुणाल या गावी पोचला. कुणाल हे राजा अशोकाच्या मुलाचं नाव. त्याच्या नावांनी ही जागा नंतर प्रसिद्ध झाली असं म्हणतात.♍या सगळ्या उत्खननाच्या जागा बघितल्यावर सरस्वती नदी हे एक मिथ्य होती असं कोणीही म्हणू शकणार नाही. या सर्व मार्गावर लोकांना १२००पेक्षा अधिक उत्खनन क्षेत्रे सापडली आहेत आणि ही सर्व सरस्वती किंवा तिच्या उपनद्यांच्या काठावर वसलेली आहेत. यांचा काळ चार हजार ते पाच हजार वर्षांपूर्वीच्या आणि हा असा काळ होता जेव्हा या भागातला मान्सून हा चांगला होता. नंतर मान्सून कमी झाला, नदीची पात्रं कोरडी पडली आणि आज ही सगळी प्राचीन संस्कृती जमिनीखाली दडली गेली आहे

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম