🔹पेनच्या टोपनाला छिद्र का असते? 🔹

 तुम्हाला माहिती आहे?  🖊  पेनाच्या टोपणाला छिद्र का असतं ते?  


  http://bit.ly/3iCFST8
.      
  🖊 पेनकडे फारच कमी लोकांनी बारकाईने पाहिलं असेल. ज्यांनी पाहिलं असेल त्यांना पेन कॅपच्या टोकाला लहानसं छिद्र नक्कीच आढळलं असेल. आणि त्याच वेळी मनात प्रश्न उद्भवला असेल असं का बरं?
जर आजवर तुमची या गोष्टीकडे कधी नजर गेली नसेल तर आता लगेच नजर टाकून बघा. तुम्हाला पेन कॅपच्या टोकाला छिद्र दिसेल चला तर आज या मागचं कारण जाणून घेऊ!
बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की पेनच्या निबची शाई वाळावी यासाठी पेन कॅपच्या टोकाला छिद्र दिलेलं असतं. पण हा पूर्णत: गैरसमज आहे. पेन कॅपच्या टोकाला या कारणासाठी छिद्र दिलेलं नाही.खरंतर पेन कॅपच्या टोकाला छिद्र असंण ही आजवरची सर्वात हुशार शक्कल म्हटली गेली पाहिजे. ज्यांनी बॉल पेनची निर्मिती केली त्या बिक क्रिस्टल कंपनीच्या डोक्यातून पेन कॅपच्या टोकाला छिद्र ठेवण्याची नामी युक्ती बाहेर आली.
अनेकांना – विशेषत: लहान मुलांना – पेन कॅप तोंडात घालण्याची सवय असते. जर कॅप चुकून तोंडात गेली आणि अडकली तर त्यामुळे श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होऊन जीव देखील जाऊ शकतो आणि पेन कॅपच्या टोकाला छिद्र नसल्यास त्यातून हवा जाण्याचा मार्ग देखील बंद होऊ शकतो.हाच विचार करून पेन कॅपच्या टोकाला मुद्दाम छिद्र ठेवलं आहे.
म्हणजे समजा कोणीही चुकून जरी पेनची कॅप गिळाली तर पेन कॅपच्या टोकाला छिद्र असल्यामुळे त्यातून हवा पास होईल आणि त्याला श्वासोच्छवास घेण्यात जास्त अडथळा होणार नाही. त्याच्या जीवाला असलेला धोका देखील भरपूर प्रमाणात कमी होऊ शकतो. म्हणून पेन कॅपच्या टोकाला छिद्र असतं.
____________________________तुम्हाला माहिती आहे?  🖊  पेनाच्या टोपणाला छिद्र का असतं


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম