🔹कोल्हापुर नाणी🔹

*⭕ कोल्हापुर : नाण्याचा इतिहास ⭕*
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
________________________
कोल्हापूर परिसरात जुन्या रूपया पैकी हुकेरि,नीलकंठी,पन्हाळी अणि शंभू हे चार प्रकार चालत होते.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=197485570649374&id=100011637976439
१०० हुकेरिचे ८६ कंपनी रुपये,१०० शंभू पिरखाणीचे ८७ असा विनिमय होत
असे,जुन्या हुकेरिचे वजन १७१.०७५ ग्रेन्स असे.
नीलकंठी रूपया १६९.६२७ ग्रेन्सचा,पन्हाळी १६९.०९२,तर शंभू पिरखानी १७५.०३० ग्रेन्सचा होता.
कोल्हापूर सरकारची राजधानी पूर्वी पन्हाळगड़ होती,तेथे पन्हाळीनाणी पडण्याची टांकसाळ होती.
१७८८ मधे पन्हाळ्याहून राजधानी कोल्हापूरला आल्यानंतरही कोल्हापूर टांकसाळ कधीकधी पन्हाळी रुपये पडित.
१८३८ साली कोल्हापूर टांकसाळ बंद झाली व् कंपनीच्या नाण्या शिवाय दूसरे नाणे चलेनासे झाले..

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম