बाहुबली साम्राज्य

महिष्मती साम्राज्य आणि बाहुबली चित्रपट
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 
_________________________
काल्पनिक कथा आणि इतिहास
 प्रसिद्द चित्रपट ‘बाहुबली’ हा एका राज्याच्या आणि त्यावर राज्य करणाऱ्या राजवंशियांच्या गोष्टीवर बनवला आहे.तसे पाहता हा चित्रपट जरी काल्पनिक असला,तरी त्यातील काही गोष्टी ह्या मूलतः खऱ्या आहेत.
चित्रपटामधे दाखवलेले ‘महिष्मती साम्राज्य’ हे खरोखर अस्तित्वात असल्याचे पुरावे आपल्याला आढळून येतात.अगदी महाभारत काळापासून..
‘अवंती’ साम्राज्यात मोडणारे महिष्मती संस्थान नंतरच्या काळात ‘अनूप’ साम्राज्याची राजधानी झाली.यादव काळात या शहराची उन्नती झाली.रामायण काळात रावनाने सुद्धा महिष्मतीवर आक्रमण केल्याची नोंद आहे.पांडवांनी जेव्हा महिष्मती वर आक्रमण केले,तेव्हा निळ राजाने त्यांचा प्रतिकार केला.हाच राजा कुरुक्षेत्रमधे एका सैन्याचा तुकडीचा सेनापती होता (महाभारत 5 वा अध्याय,19 श्लोक). मौर्य काळात एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून महिष्मती प्रसिद्द होते.
6व्या आणि 7 व्या शतकात ‘कलचुरी’ घराणे महिष्मतीवर राज्य करत होते.याच कलचुरी राजांच्या काळात मुंबईजवळील प्रसिद्द elephanta लेण्या आणि वेरूळ येथील 21 क्रमांकाची लेणी यांची उभारणी झाली.
आजच्या मध्यप्रदेश मधे नर्मदातिरी वसलेल्या या नगराची आजची निश्चित जागा कुनालाच माहीती नाही.’मंडला’, ‘मंधाता’ आणि होळकरांचे ‘ महेश्वर’ या तीन शहरांपैकी एखादे शहर हे पूर्वी महिष्मती संस्थान असण्याची शक्यता अभ्यासक वर्तवतात.

महिष्मती साम्राज्य आणि बाहुबली चित्रपट
दिग्दर्शक S.S.Rajamouli यांनी बाहुबली या चित्रपटाची theme महिष्मती साम्राज्याला अनुसरुन केली होती.लहानपनापासून पौराणिक कथा आणि इतिहासात रमणार्या राजामौली यांनी त्यांच्या कल्पनेतून उभारलेला महिष्मती साम्राज्याचा काल्पनिक सेट त्या नगराची भव्यताच उलगडतो….
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম