कलियुगाची समाप्ती केव्हा

 कलियुगाची समाप्ती केव्हा ?
_____________________
माहिती सेवा ग्रूप  पेठवड़गाव 
______________________
कलियुग कधी सुरू झालं ते जसं पुराणकार निश्चितपणे सांगतात, तसंच ते संपणार कधी हेही सांगितलं जातं.
कलियुगाची समाप्ती केव्हा ?


 पण मुळात या सगळ्याची आकडेमोड कशी केली गेली आहे? तिच्यामध्ये पाठभेद कसे झाले आहेत? 
🔹कलियुगाचा प्रारंभ कालावधी
सगळ्यात पहिला मुद्दा असा असू शकतो की कलियुग नेमकं सुरू कधी झालं? आणि ते कसं ठरवलं गेलं? तर कलियुग सुरू होण्याचा कालावधी सर्वच तज्ज्ञांच्या अभ्यासांती इसवी सनपूर्व ३१०२ असा मानण्यात आला आहे. बायबलमध्ये इसवी सनपूर्व ३१०० मध्ये नवीन जगाची निर्मिती झाली आहे, असे म्हटले आहे आणि आपल्याकडेही त्याच वेळी कलियुग सुरू झाले आहे असे पुरातत्त्ववेत्ते, जीवशास्त्रज्ञ, गणितज्ञ, पुराणज्योतिषकार यांनी मान्य केल्याचे दिसून येते. या सर्वाच्या मते इसवी सनपूर्व ३१०२ मध्ये कलियुगाची सुरुवात झालेली आहे.
मुळात आपल्या कालगणनेत चार युगे समजण्यात येतात. ती म्हणजे कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. सर्वत्र उपलब्ध असलेल्या अवाढव्य लाखो वर्षांची वाढवून ठेवलेली युगांची वष्रे जी आज प्रचलित आहेत :
♍सत्ययुग किंवा कृतयुग = १७,२८,००० वष्रे
♍त्रेतायुग = १२,९६,००० वष्रे
♍द्वापरयुग = ८,६४,००० वष्रे
♍कलियुग = ४,३२,००० वष्रे
एकूण = ४३,२०,००० वष्रे.िहदीमधील एक शब्द आहे. 
  
 ‘कल’. कल उच्चारल्यावर काल की उद्या असा आपल्याला लागलीच अर्थबोध होत नाही, परंतु पूर्ण वाक्य कानावर आल्यावर त्यातून काळाचा बोध होत असतो. तसे महाभारत आणि इतर ग्रंथांत अशा एका एका दिवसांसाठीसुद्धा युग म्हटले आहे. 
 पुराणनिरीक्षणकार त्र्यंबक गुरुनाथ काळे यांनी त्यांच्या ग्रंथात एका-एका दिवसांची, एका-एका वर्षांची युगे पूर्वी मानली जात असत, याची उदाहरणे दिलेली आहेत.इ.स. ४९० ते ५८५ या काळात जन्मलेल्या प्रख्यात गणितज्ञ वराहमिहिर याच्या आधी किंवा त्या सुमारास ही १२ हजार वर्षांची चतुर्युगाची संख्या ठरून गेली होती आणि त्यानुसार कलियुगाची एक हजार २०० वष्रे आहेत, हेही निश्चित झाले होते. परंतु याच काळात दिव्य वर्ष संकल्पना रुजू होती. एक दिव्य वर्ष = ३६० वष्रे. तेव्हा पुराणज्योतिषकारांनी चारही युगांना दिव्य वर्षांनी म्हणजे ३६० वर्षांने गुणून ही मनुष्याची वष्रे देवांची बनविली आणि चार युगांची वर्षसंख्या पुढीलप्रमाणे ठरविली :
कृतयुग – ४ हजार ८०० वष्रे x ३६० = १७,२८,००० वष्रे
त्रेतायुग – ३ हजार ६०० वष्रे x ३६० = १२,९६,००० वष्रे
द्वापरयुग – २ हजार ४०० वष्रे x ३६० = ८,६४,००० वष्रे आणि
कलियुग – १ हजार २०० वष्रे x ३६० = ४,३२,००० वष्रे.
आणि या चार युगांची बेरीज आली ४३,२०,००० वष्रे जी आजच्या काळात प्रचलित आहे.♍कलियुगाचा एकूण कालावधी
कलियुगाची सुरुवात हजारो विविध अभ्यासकांच्या संशोधनाअंती इसवी सनपूर्वी ३१०२ अशी मानली गेलेली आहे. जीवशास्त्रज्ञ, भूस्तरशास्त्रज्ञ, ज्योतिषी, पंचांगकत्रे आणि अन्य विशेषज्ञ यांच्या अथक अभ्यासाच्या समन्वयातून ही तारीख अगदी निश्चित मानली गेली आहे. पंचांगातही कलियुग सुरू झाल्याची तारीख इसवी सनपूर्व १८ एप्रिल ३१०२ अशी दिलेली आहे. आणि श्रीदत्तावधूत (सन १९९८ ते सन ३००० वर्षांपर्यंतचे जागतिक भविष्यकार- ‘अगम्यवाणी’ आणि इतर १४ सिद्धग्रंथकत्रे) यांनी त्यांच्या सिद्धग्रंथात कलियुगाची समाप्ती बहुधा सन ६६६६ अशी सांगितली आहे.
या दोन सनांचा आधार घेत कलियुगाचा कालावधी काढताना इसवी सनापूर्वीची कलियुगाची ३१०२ वष्रे + इसवी सनानंतरची ६६६६ वष्रे यांची बेरीज ९७६८ वष्रे येते. याचा अर्थ कलियुगाची एकूण ९७६८ वष्रे आहेत.कलियुग सुरू होण्याचे वर्ष इसवी सनपूर्वी ३१०२ असे आहे, तर कलियुग समाप्तीचे वर्ष इसवी सनानंतर ६६६६ असे आहे. (दर ३,११,०४० वर्षांनी येणारा मोठा प्रलय हा इ.स. ३३०३ या वर्षी सुरू होत आहे, त्या वर्षांपासून संपूर्ण पृथ्वीवर हिमयुग सुरू होणार आहे, असे प्रलय गणितज्ञांचे गणित आहे.) तरीही कलियुगाच्या ९७६८ वर्षांपकी इसवी सन ३३०३ वर्षांनी होणारा प्रलय पार करीत आणखी ३३६३ वष्रे कलियुग सुरू राहील, कारण कलियुगाची समाप्ती तितक्याच अधिकच्या वर्षांनी म्हणजे ३३०३ + ३३६३ = ६६६६ इसवी सनात होणार आहे, असे तज्ज्ञांचे भाकीत आहे.♍
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম