🔹हलाल मटण -म्हणजे काय? मुस्लिम हलाल मटण का खातात? 🔹


‘हलाल’ चिकन किंवा हलाल मटण म्हणजे काय? 

मुस्लिम बांधव हलाल मांस का खातात? 


दि. २१ जुलै २०२०
    देवाला नैवेद्य दाखवणे, ओटी भरणे ह्या देवाला कृतज्ञता दाखवण्याच्या भावनेतून आलेल्या रिती आहेत. ज्या आपण पूर्वापार चालत आलेल्या धरणेला अनुसरून भक्तिभावाने करीत असतो.
इस्लाम मध्ये हलाल ह्या शब्दाचा अर्थ फार व्यापक आहे. मात्र आपण ही व्याख्या जरा सोप्या भाषेत समजून घेऊ. तर मंडळी, हलाल म्हणजे नेमका काय प्रकार आहे ते बघूया.
❗हलाल म्हणजे ते जेवण जे कुराणमध्ये सांगितल्या प्रमाणे इस्लामिक कायद्याचे पालन करते. ह्यामध्ये जनावरे किंवा कोंबड्या अशा प्राण्याचा देवासाठी बळी दिला जातो.
http://bit.ly/3BCbL70

मात्र बळी देताना त्यांची थेट हत्या न करता, प्राण्यांच्या मानेची विशिष्ट धमनी कापली जाते. ह्या प्रकारात प्राणी कापण्या आधी तब्येतीने ठणठणीत असणे त्याला कुठलाही आजार नसणे हे जास्त महत्वाचे मानले जाते.
हलाल मांस देवाला वाहने आणि खाणे हा मुस्लिम धर्माच्या श्रद्धेचा एक महत्वाचा अपरीहार्य असा भाग आहे. हिंदू धर्मात जसा देवाला अन्नाचा मिठाईचा नैवेद्य दाखवतात त्याचाच हा एक प्रकार आहे.आपण वाचताना माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट, हा विधी करताना प्राण्याला मारण्या आधी देवाचा आशीर्वाद मिळू देत, अशा अर्थाने बिस्मिल्लाह म्हंटले जाते. मुस्लिम समाजात कुठलेही शुभकार्य करण्या आधी “बिस्मिल्लाह” म्हणायचा प्रघात आहे.
*❗मोठ्या कत्तल ख्यान्यांमध्ये कट्टलीची सुरुवात करताना “बिस्मिल्लाही-अल्लाहु अकबर” असे म्हणून प्राणी कापायला सुरुवात केली जाते.*
मांसासाठी प्राण्याला कापण्याच्या ह्या विधिला मुस्लिम धर्मात जबिहा असे म्हंटले जाते. हलाल करताना प्राण्याच्या मानेची जी नस कापली जाते तिला करोटीड आर्टरी असे म्हणतात.
प्राण्याला कापताना ही नस एका विशिष्ट प्रकारे आणि तीक्ष्ण हत्याराने कापली जाते. विशिष्ट ठिकाणी कापल्याने फारच कमी वेळात प्राण्याच्या शरीरातील सगळे रक्त वाहून जाते.
हे रक्त वाहून जात असताना मुस्लिम लोक हे मांस अल्लाह ला समर्पित केल्याच्या आशयाचा एका पाठाचे वाचन करतात. ज्याला तस्मिया किंवा शाहदा असे म्हणतात.
❗मुस्लिम आहार नियमांनुसार डुकराचे मांस व रक्त, पक्षी आणि सरपटणरे प्राणी हे खाण्यासाठी निषिद्ध म्हणजेच हराम मानले जातात. मुस्लिम कायद्यानुसार एकावेळी एकच प्राणी हलाल केला जातो.
हा प्रकार दुसर्‍या कुठल्याही पशूच्या नजरेसमोर घडणार नाही अशी दक्षता घ्यावी लागते. एका प्राण्याच्या मृत्युचा साक्षीदार दुसरा प्राणी असता कामा नये अशी मान्यता आहे.
इस्लाम धर्म हे देखील सांगतो की, आपण आपल्या आयुष्यात प्राण्यांशी कसे वागावे, त्यांना विनाकारण त्रास होईल असे वागू नये. प्राण्यांना व्यवस्थित अन्न पाणी द्यावे, मोकळा वारा आणि निवारा देखील द्यावा असा उपदेश मुस्लिम धर्मात केला गेलेला आहे.
मात्र ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर, प्राण्याला हलाल करताना त्याला वेदना होत नसतील का? असा प्रश्न उभा राहतो.
बर्‍याच प्राणिमित्र संघटनांच्या मते ही प्रथा अत्यंत क्रूर आहे, अशा विशिष्ट धार्मिक पद्धतीने कापल्यामुळे प्राण्याला विनाकारण जास्त त्रास होतो आणि त्यामुळे हा अमानवीय प्रकार ताबडतोब थांबवण्यात यावा अशी मागणी केली जाते आहे.
शेवटचा श्वास घेताना त्यांना पराकोटीचा संघर्ष करावा लागतो आणि दरम्यान त्यांच्या मानेतून सतत रक्त वाहत असते.
ह्या विधी साठी इतरही पर्याय उपलब्ध आहेत जसे की प्राण्यांना विजेचा सौम्य झटका देणे, बधिर करणे किंवा बोल्ट बंदुकीने गोळी घालणे मात्र विधिवत हत्यार न चालवले गेल्याने त्याला हराम मानले जाते. आणि असे मांस खाणे हराम मानले जाते.
हलालचे मांस भक्षण करणे अतिशय पुण्याचे मानले जाते. हा मुस्लिम धर्माच्या अनुयायांसाठी एकप्रकारे अल्लाहचा प्रसादच आहे. त्यासाठी मुस्लिम समाजाकडून मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो.
❗आंतर्राष्ट्रीय बाजारपेठेत हलाल मांसाची मोठ्या प्रमाणावर खरेदी आणि विक्री केली जाते. अक्षरशः लाखोंची उलाढाल केली जाते.
इन मराठी वरून साभार
________________________
*WᕼᗩTᔕAᑭᑭ  9890875498* ☜♡☞
_*‼ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  ‼*_
__________________________

मुस्लिम बांधव हलाल मांस का खातात?

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম