मोहोळचा किल्ला

मोहोळचा किल्ला 

http://bit.ly/3fmbGdM
मोहोळ हे माढ्याच्या आग्नेयेस सुमारे २० मैलांवर पुणे-सोलापूर रस्त्यावर आहे, हे गाव फार जुने आहे. येथे एक जुना भुईकोट किल्ला आहे. येथे मराठ्यांच्या अमदानीत मोहोळ सुभ्याची कचेरी असे. मोहोळच्या भुईकोटाच्या तटबंदी सुस्थितीत असून त्यात जागोजागी देवड्या केलेल्या आहेत. मुख्यद्वार हे वाड्याच्या दरवाज्याप्रमाणे बांधलेले असून चांगल्या स्थितीत आहे.याखेरीज येथील देशमुखांनी सुमारे २०० वर्षांपूर्वीं बांधलेले दोन पडके वाडे देखील मोहोळ येथे आहेत.मोहोळ मध्ये भानेश्वर व नीलकंठेश्वर अथवा चंद्रमौळी यांची दोन देवालये असून ती हेमाडपंताने बांधली असे म्हणतात.     
मोहोळ परगाणा त्याकाळी मंगळवेढा च्या किल्लेदार मुहंमद आकील यांच्या कक्षेत हे परगाणा होता.औरंगजेब बादशहाने मोहोळ परगाणा भास्करराव हरकारा यास तनखा य ( पगार ) जहागीर म्हणून 4 आगॅस्ट 1703 रोजी दिला होता.
तसेच बसस्थानकाच्या मागे भास्कर हरकारा याची समाधी आहे तो अौंरगजेबच्या  सेवेत होता. २५ जानेवारी १७०४ रोजी तो मरण पावला. अौंरगजोबाने त्याची समाधी इस्लामी  पध्दतीने  बांधली.
भास्करराव हरकारा कोण ?
भास्करराव हरकारा गायकवाड घराण्यातील असावा .शिवाय छत्रपती च्या राणीसाहेब " सकवारबाई" गायकवाडच्या घराण्यातील होत्या . या दोघांचे जवळचे अथवा दूर चे नाते संबंध असावेत . कारण सकवारबाई इस्लामपुरीच्या तळावर छत्रपती संभाजी महाराजांचा पुत्र शाहू महाराजांच्या सोबत होत्या .

मोहोळचा किल्ला
मोहोळचा किल्ला
भास्करराव हरकारा समाधी 

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম