असे वाढवा दुचाकीचे मायलेज
फेसबुक लिंक http://bit.ly/2X7BqEJ
सध्या पेट्रोलचे दर सामान्य लोकांना परवडत नाहीत तरीही मोटरसायकल ही गरजेची असल्याने आवश्यक बाब बनली आहे. प्रत्येक घरटी एकतरी मोटरसायकल असतेच.प्रत्त्येकाला ही वाहने कशी चालवायची, कशी सांभाळायची याची माहिती असतेच असे नाही. काहीजण फक्त पेट्रोल भरतात आणि चालवायला सुरुवात करतात.
दुचाकीचे संपूर्ण माहिती नसल्याने त्यात काय बिघाड झालाय हे कळत नाही, त्यासाठी काय करावे ते कळत नाही, अनोळखी मेकॅनिक ह्याचा फायदा घेतात आणि फसवतात, कामाचे अव्वाच्यासव्वा पैसे उकळतात. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचे दर वाढतच चालले आहेत.सगळ्याच गोष्टींची बचत करावी लागते तसेच पेट्रोलचीही बचत करणे दुचाकी चालवणाऱ्यांना करावी लागते. पण जर ती पेट्रोलची बचत कशी करावी हेच माहिती नसेल तर खर्चाचे प्रमाण वाढतच जाते.
🏍 ऑइल सुद्धा ठराविक दर्जाचे वापरलेले असते तेच ऑइल आपण ऑइल बदली करताना वापरावे. त्यामुळे इंजिन चांगले कार्य करते
🏍 दुचाकीचे महत्वाचे काम करतो तो म्हणजे कार्बोरेटोर. ह्यावर धूळ जमा होणार नाही ह्याची काळजी घेणे जरुरीचे असते. वेळच्यावेळी त्याची साफसफाई ठेवली पाहिजे आणि इंजिन ट्युनिंग करून घेतले पाहिजे.
🏍 एअर फिल्टर साफ असलं पाहिजे त्यामुळे इंजिन कधीही थकणार नाही, जसे आपल्या शरीराचे नाक असते त्याप्रमाणे हे कार्य करत असते.
🏍 क्लच प्लेट अलाईनमेंट ही चांगल्या मेकॅनिक कडून करून घ्यावी, म्हणजे रस्त्यात दुचाकी कधीच दगा देणार नाही.सतत गिअर बदलल्या मुळे क्लच खराब होतात. म्हणून सारखे आणि जोराने गिअर बदलले जाणार नाहीत ह्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजेच चांगल्या रस्त्यावरून दुचाकी चालवावी.
🏍 जोरात एक्सिलरेटर वाढावण्याने पेट्रोल जास्त जळते, त्यामुळे एक्सिलरेटर हळू हळू वाढवावा. जोरात वाढवून एकदम कमी करून ब्रेक दाबणे टाळावे. ह्याने पेट्रोलची खूप बचत होईल. सतत एक्सलरेटर कमी जास्त करण्याने पेट्रोल जास्त जळते.
🏍 शक्यतो कमी ट्रॅफिक असलेला रास्ता निवडावा ज्यामुळे जास्तीत जास्त वेळ एकाच वेगाने वाहन चालेल आणि सगळ्यात जास्त इंधनाची बचत होईल.
🏍 महत्वाचे म्हणजे सतत टायर मधील हवेचे प्रेशर चेक करावे, कंपनीने ठरवून दिलेले हवेचे प्रेशर राहील ह्याची काळजी घ्यावी, टायरमधली हवा कमी असेल तर एव्हरेज वर परिणाम होतो.आणि दुचाकी थकल्यासारखी चालेल आणि इंधन जास्त लागेल.
🏍 धुळीच्या रस्त्यावरून सतत वाहन चालणार असेल तर मोटरसायकल ची चेन धुळीमुळे जाम होते आणि गती मंदावते. त्यासाठी चेन साफ ठेऊन त्यावर ऑइल सोडले तर निश्चितच मोटरसायकल स्मूथ चालेल आणि इंधन वाचेल.
🏍 वाहन पार्क करताना सावलीत पार्क करणे जरुरीचे असते, विशेषतः रेल्वे स्टेशन जवळच्या पार्किंगमध्ये सावली नसते ,६/७ तास जर वाहन उन्हात राहिले तर पेट्रोलची वाफ होते आणि रोज थोडी थोडी वाफ झाली तर महिन्याच्या शेवटी पेट्रोल जास्त लागले असे दिसेल
अशा पद्धतीने आपण जर आपल्या दुचाकीचे काळजी घेतली तर निश्चितच सगळीकडून बचत होईल
सध्या पेट्रोलचे दर सामान्य लोकांना परवडत नाहीत तरीही मोटरसायकल ही गरजेची असल्याने आवश्यक बाब बनली आहे. प्रत्येक घरटी एकतरी मोटरसायकल असतेच.प्रत्त्येकाला ही वाहने कशी चालवायची, कशी सांभाळायची याची माहिती असतेच असे नाही. काहीजण फक्त पेट्रोल भरतात आणि चालवायला सुरुवात करतात.
दुचाकीचे संपूर्ण माहिती नसल्याने त्यात काय बिघाड झालाय हे कळत नाही, त्यासाठी काय करावे ते कळत नाही, अनोळखी मेकॅनिक ह्याचा फायदा घेतात आणि फसवतात, कामाचे अव्वाच्यासव्वा पैसे उकळतात. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचे दर वाढतच चालले आहेत.सगळ्याच गोष्टींची बचत करावी लागते तसेच पेट्रोलचीही बचत करणे दुचाकी चालवणाऱ्यांना करावी लागते. पण जर ती पेट्रोलची बचत कशी करावी हेच माहिती नसेल तर खर्चाचे प्रमाण वाढतच जाते.
🔷पेट्रोल बचतीकरिता या टिप्स वापरा 🔷
🏍 ज्या मेकची दुचाकी आपण घेतो त्या कंपनीने अनेक प्रकारच्या टेस्ट घेऊन नंतरच ती दुचाकी किंवा ते मॉडेल बाजारात आणलेले असते. त्या टेस्ट करताना त्यांनी ठराविक दर्जाचे पेट्रोल वापरलेले असते त्याच दर्जाचे पेट्रोल आपण नेहमी वापरावे.🏍 ऑइल सुद्धा ठराविक दर्जाचे वापरलेले असते तेच ऑइल आपण ऑइल बदली करताना वापरावे. त्यामुळे इंजिन चांगले कार्य करते

Tags
मोटरसायकल