आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे व पत्ता बदल 🔹

आधार कार्डला असा करा मोबाईल नंबर लिंक ⭕

आधार कार्डमध्ये आता मोबाईल नंबर आणि पत्ता अपडेट करणे आता सोपे झाले आहे. फक्त तुम्हाला यूआयडीएआयवर जाऊन काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीच्या सुविधा सुरू केल्या आहेत. याच्या माध्यमातून लोक आपल्या ई-आधारकार्डची माहिती अपडेट करून चुका सुधारू शकतात. आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी जर तुम्हाला अपडेट करायचा असेल तर UIDAI च्या  https://uidai.gov.in/my-aadhaar/update-aadhaar.htmlया वेबसाईटवर जाऊन तुम्ही अपडेट करू शकता.

आधार कार्डवर मोबाईल नंबर करा असा अपडेट
१) सगळ्यात आधी UIDAI च्या वेबसाईटवर जावे लागेल २) तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर कॅप्चा टाका आणि लॉगइन करा.
३) यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल.  ४) आता या ओटीपीला स्क्रीनवर राईट हँड बॉक्स मध्ये टाका आणि क्लिकवर सबमिट करा. 
५) आता तुम्हाला आधार सर्व्हिसमध्ये जाऊन अपडेट आधार आणि न्यू एनरोलमेंटवर जावे लागेल. ६) येथून अपडेट आधारावर जा आता येथून नाव, आधारनंबर, रेसिडेंट टाईप आणि तुम्ही काय अपडेट करू शकता हे दिसेल. 
७) यात सर्व डिटेल्स भरा आणि what do you want to update सेक्शनवर जाऊन मोबाईल नंबरवर जा यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक छोटासा फॉर्म येईल हा भरून त्यानंतर ‘Send OTP’ वर क्लिक करा.
८) आता ओटीपी टाकल्यानंतर Save and Proceed’वर जाऊन क्लिक करा. 
९) आता डिटेल्स क्रॉसचेक केल्यानंतर सबमिट करा.
*👉आधारकार्डवर असा करा पत्ता अपडेट*
१)जर तुम्हाला आधारकार्डवर पत्ता अपडेट करायचा असेल तर सगळ्यात आधी UIDAI च्या वेबसाईटवर जावे लागेल २)यानंतर तुम्हाला Update your Address Online” हा ऑप्शन निवडावा लागेल.  ३)जर तुमच्याकडे व्हॅलिड पत्त्याचे प्रमाणपत्र आहे अर्थात व्हॅलिड अॅड्रेस प्रूफ असेल तर तुम्हाला “Proceed to Update Address” ऑप्शनवर जावे लागेल. 
४)आता तुमच्या स्क्रीनवर नवी विंडो ओपन होईल. नव्या विंडोमध्ये आपला १२ डिजीट आधार नंबर टाकका आणि “Send OTP” अथवा “Enter a OTP” वर क्लिक करा. 
५) UIDAIच्या डेटाबेसमध्ये रजिस्टर्ड तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. 
६) आपल्या आधार अकाऊंटमध्ये लॉग इन केल्यांतर हा ओटीपी टाका ७) आता येथे  “Update Address by Address Proof” ऑप्शन अथवा “Update Address vis Secret Code”  हा ऑप्शन निवडा. 
८) प्रूफ ऑफ अॅड्रेस मध्ये तुमचा अपडेटेड पत्ता टाका आणि “Preview” बटनावर क्लिक करा
९)  जर तुम्हाला पत्ता अपडेट करायचा आहे तर “Modify” वर क्लिक करा आणि डिक्लेरेशन वर टिक करून  “Submit” वर क्लिक करा १०) पत्त्याची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करा आणि  “Submit” बटनावर क्लिक करा
११) तुमचा आधार अप़ेट रिक्वेस्ट स्वीकारली जाईल आणि १४ डिजीट चा URN  जनरेट केला जाईल. 
१२) आधार पत्ता अपडेटचे स्टेटस जाणण्यासाठी तुम्ही अपडेट रिक्वेस्ट नंबरचा वापर करू शकता.
पॅनकार्डला आधार कार्डशी लिंक करण्याची अखेरची तारीख ३१ मार्च २०२० होती. मात्र ही मर्यादा वाढवून ३० जून करण्यात आली. आता ही आणखी वाढवून ३१ मार्च २०२१ करण्यात आली आहे.तरी सर्वानी याचा लाभ घ्यावा.



 
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম