या गावातील लोक देवाला नाही तर राक्षसाला पुजतात

या गावातील लोक देवाला नाही तर राक्षसाला पुजतात 

 येथे हनुमानाचे नावही घेतले जात नाही, असं एक महाराष्ट्रातलं गाव 

मंदिरं ही आपल्या हिंदू संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. आपण आपल्या आराध्य देवांची पूजा करण्यासाठी या मंदिरात जात असतो.निसर्गाची व निसर्गातील पंचमहाभूतांची, ह्या ना त्या निमित्ताने सर्व सजीवांची आपण पूजा करून कृतज्ञता व्यक्त करत असतो. प्रत्येक गावात एक मारूतीचे मंदिर असते.पण यागावात मारूतीचे नाही तर राक्षसाचे मंदिर आहे.
मंदिरात आपण नेहेमी देवांच्या मुर्त्या बघितल्या असतील.पण महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी  तालुक्यात  पाथर्डीपासून 23 किलोमीटर पूर्वेला श्री श्रेत्र भगवान गडाच्या पायथ्याशी डोंगराच्या कुशीत नांदुर गाव वसले आहे.  या गावात दैत्य निंब या राक्षसाची पुजा केली जाते. या गावाला "नांदुर निंबा दैत्य" या नावाने पण अोळखले जाते.
या बद्दल अशी कथा सांगितले क्षी जाते की, प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधात नाशिक येथून केदारेश्वराकडे वाल्मिक ऋषींच्या भेटीसाठी जात असताना गावातील जंगलात त्यांचा मुक्काम झाला. या जंगलात त्यावेळी 'निंबादैत्य' राक्षसाचे वास्तव्य होते. या राक्षसाने त्यावेळी प्रभू रामचंद्राची मनोभावे पूजा केली आणि त्यांचा भक्त झाला. तेव्हा प्रभू रामचंद्राने त्याला वर दिला की, या गावात तुझे वास्तव्य राहील आणि गावकरी तुला कुलदैवत मानून तुझी पुजा करतील. तसेच गावात हनुमानाचे मंदिर नसेल. तेव्हापासून या ठिकाणी या दैत्याची गावकरी मनोभावे पूजा करतात.
या गावात फिरून पाहिले असता सगळीकडे निंबादैत्याचा प्रभाव दिसतो. आपण जसे, अमुक अमुक देव प्रसन्न असे लिहितो तसे या गावात   || श्री निंब दैत्य प्रसन्न || असे लिहिलेले दिसते. अगदी वाहनावर देखिल हा उल्लेख केला जातो. या गावात मारूती कंपनिची गाडी कोण खरेदी करत नाही. कारण या गाडीच्या कंपनिचे नाव "मारूती" आहे.कोणत्याही वाहनात मारूती, हनुमानाचा फोटो लावला जात नाही.
येथे मारूती, हनुमान हे नाव म्हटले जात नाही. कधी गावात कोणाकडे  मारूती किंवा हनुमान नावाचा पाहुणा जरी आला तरी त्या नावाने बोलावत नाहीत. यावेळी तात्पुरते त्या पाहुण्याला दुसरे नाव ठेवले जाते.आता या श्रध्दा म्हणा किंवा अंधश्रध्दा म्हणा पण पिढयानपिढया हे चालु आहे. आपआपल्या श्रद्धास्थानात जाऊन प्रार्थना करणं हा प्रत्येकासाठी आनंदाचा भाग असतो.
या गावातील सासरी जाणारी माहेरवासिन मात्र आपल्या सासरी तिकडिल प्रमाणे मारूतीला पुजु शकते. पण माहेरी आलेनंतर फक्त दैत्य निंबाची पुजा करावी लागते.
गावच्या नदी किनारी  निंब दैत्याचे दुमजली मंदिर असुन मंदिराचे बांधकाम प्राचीन काळातील अाहे. सर्व बांधकाम दगडाने केलेले आहे. हे मंदिर हेमाडपंथी असून मंदिरासमोर पाचशे वर्षापूर्वीचे जुने वडाचे झाड आहे.गुढीपाडव्याला निंबादैत्याच्या यात्रेला गावातील प्रत्येक जण हजर राहतो.

या गावात देवाची नव्हे तर राक्षसाची पुजा करतात


या गावात देवाची नव्हे तर राक्षसाची पुजा करतात
मंदिरातील काही फोटो 

या गावात देवाची नव्हे तर राक्षसाची पुजा करतात

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম