अचाट शोध: प्राण्यांची हत्या नं करता मांसाहार

प्राण्यांची हत्या नं करता मांसाहार – भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचा अचाट शोध 


    अनेक शाकाहाऱ्यांच्या “मांसाहार नं करण्यामागे” प्रमुख कारण असतं – प्राण्यांची केली जाणारी कत्तल आणि त्यांच्यावर केले जाणारे अत्याचार.
एका भारतीय वंशाच्या अमेरिका स्थित शास्त्रज्ञाने ही अडचण सोडवली आहे – टेस्ट ट्यूब मीट – बनवून ! त्यामुळे काही वर्षातच मांसाहार करण्यासाठी कुठलीही हिंसा करण्याची गरज उरणार नाही.
टेस्ट ट्यूब मधे बनवलेला “मीट बॉल”    
____________________________
उमा वलेती नावाच्या, विजयवाडा (आंध्रप्रदेश) इथे वाढलेल्या “cardiologist turned entrepreneur and a food producer” नी ही किमया साधली आहे.
त्यांनी Memphis नावाची कंपनी स्थापन केली आहे. त्या मार्फत, ते पुढील ३ वर्षात कृत्रिम मांस निर्मिती मोठ्या प्रमाणावर सुरु करणार आहेत.
कृत्रिम मांस निर्मिती कशी होते?
प्राण्यांमधील वाढ होण्याची क्षमता असणाऱ्या पेशींना काढून त्यांना ऑक्सिजन, साखर, minerals असे वाढीस आवश्यक ते सर्व घटक पुरवून कृत्रिम मांस बनवलं जातं. ह्या संपूर्ण प्रक्रियेत प्राण्यांना कुठलीही हानी पोहोचवली जात नाही. फक्त गर्भाशयात असलेल्या प्राण्यांच्या रक्तामधून bovine serum काढलं जातं, ज्याचा उपयोग पेशींची कृत्रिम वाढ होण्याची प्रक्रिया सुरु करण्यासाठी होतो.
शोधाचे आणखीही फायदे !
ह्या शोधामुळे केवळ हिंसा टाळली जाणार आहे असं नाही. ह्याचे पर्यावरणावर सुद्धा सकारात्मक परिणाम होणार आहेत.
सामान्य मांस तयार करण्याच्या प्रक्रियेत जेवढे पर्यावरणास घातक वायू – greenhouse gases – तयार होतात त्यापेक्षा ९०% कमी प्रमाणात कृत्रिम मांस तयार करण्याच्या प्रक्रियेमधून होतात.
शिवाय, मांस निर्मितीसाठी प्राण्यांना वाढवण्यात, पोसण्यात २३ कॅलरीज लागतात. ह्या कृत्रिम प्रक्रियेमधे केवळ ३ कॅलरीज लागतात.
ह्या कारणांमुळे सामान्य मांस निर्मितीत पर्यावरणावर पडणारा प्रचंड ताण ह्या कृत्रिम पद्धतीद्वारे कमी होणार आहे.
लवकरच पृथ्वीवरील खाद्य संस्कृती बदलणार आहे !



प्राण्यांची हत्या नं करता मांसाहार
___________________
 Carnivory without killing animals - A relentless discovery by a scientist of Indian descent 

  The main reason for many vegetarians not to "eat meat" is the slaughter of animals and the atrocities committed on them .
A US-based scientist of Indian descent has solved this problem - by making test tube meat!  Therefore, in a few years, there will be no need for any violence to eat meat.
"Meat Ball" made in a test tube 
 
  Uma Valeti, a cardiologist turned entrepreneur and a food producer who grew up in Vijayawada (Andhra Pradesh) has done this alchemy.
 He has founded a company called Memphis.  Through that, they will start mass production of artificial meat in the next 3 years. You are reading the post of Information Service Group Pethwadgaon,
 How is artificial meat made? 
 Artificial meat is made by removing cells that have the ability to grow in animals and providing them with all the elements needed for growth such as oxygen, sugar, minerals.  No harm is done to the animals in this whole process.  Only bovine serum is extracted from the blood of animals in the womb, which is used to initiate the process of artificial growth of cells.
 * More benefits of search! *
 This discovery is not the only way to prevent violence.  It will also have a positive impact on the environment.
 Artificial meat produces 90% less greenhouse gases than normal meat.
 In addition, it takes 23 calories to raise and feed animals to produce meat.  This artificial process consumes only 3 calories.
 Due to these reasons, the huge environmental stress in normal meat production will be reduced through this artificial method.
  Soon the food culture on earth will change! 
 
  
°

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম