विरगळ म्हणजे काय?
राज्याच्या व समाजाच्या हितार्थ कधी साहसी तर कधी युध्दात प्राण गमावलेल्यांना वीर म्हंटले जाते.
अश्या साहसी शूरवीरांची आठवण आपल्या पुढील पिढीला याची माहिती मिळावी यासाठी त्या समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तींकडून अथवा कुटुंबीयांकडून आदरपूर्वक व सन्मानपूर्वक उभ्या केलेल्या त्या शिल्परचनेला समाजातील व्यक्तींच्या समोर दिसणे महत्वाचे आहे.
युध्दात राजाज्ञाची कर्तव्य निष्ठेने पार पडणारी व्यक्ती म्हणजे वीर आणि गळ म्हणजे कानडी शब्दसमूहला दगड बोलतात. संपूर्ण भारतात निरनिराळ्या प्रदेशात अश्या स्मारकांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.
केरळात या शिल्परचनेला “तर्रा”, कर्नाटकात “कल्लू”, उत्तर भारतात “वीरब्रम्ह” तर इंग्रजी भाषेत “Hero Stone” बोलले जाते. त्याचं शिल्परचनेवर पटकन काहींना न समजणारी दगडावर शूरवीर व काही युध्दचित्र व त्यातंच सर्वांत वरच्या बाजूस शिवपिंड काही ठिकाणी कलश व सूर्य,चंद्र कोरलेले आपल्याला बघावयांस मिळते याचं शिल्परचनेला “वीरगळ” म्हणतात.
अतिप्राचीन काळात मध्य आशिया, भारताच्या पूर्व दक्षिण व मध्य भारतात आपणांस बघावयांस मिळते. भारतात वीरगळींचा इतिहास इ.स. २ रे व १८ व्या शतकापर्यंत गणला जातो. या काळखंडात अनेकानेक वीरगळ महाराष्ट्रात निर्माण झाले पण त्यांच्यावर लेख नसल्यामुळे ते आजपर्यंत मूक अवस्थेत अनभिज्ञ राहिले.
मध्ययुगीन काळखंडात व्यापारासोबत सत्तावर्चस्व व राज्याच्या परीघ सीमा वाढविण्यासाठी भारतात सातत्याने युद्धं, आक्रमणे झाली. त्यात अनेक ज्ञात, अज्ञात शूरवीर, सरदार व सैनिकांनी देशाच्या व राज्याच्या संरक्षण हितार्थ धारातीर्थी पडले.
देशाभिमान व स्वधर्माच्या या कार्यासाठी धरणीमातेला प्राणाचा अन् रक्ताचा अभिषेक घातला. त्यावेळेस लढाई करून किवां राज्य आक्रमकांच्या (शत्रूंच्या) ताब्यात जाणार असे लक्षात आले कि, शत्रूकडून स्त्रीवर्गाची होणारी “इभ्रत” लुटू नये.
शारीरिक विटंबना होऊ नये म्हणून त्या शूरवीरांच्या धर्मपत्नी प्रथम या स्त्रियां धगधगत्या अग्निज्वालेत एका मागून एक प्रवेश करीत व स्वतःच्या देहाची राखरांगोळी करून घेत. यालाच “सतीप्रथा” असे संबोधले जाऊ लागले. पतिच्या मृत्यू नंतर स्त्री हि जळत्या चितेवर आत्मदाह करून पतिधर्माचे पालन करायचे. अशी अनिष्ठ प्रथा पुढे हिंदू धर्मात रूढ झाली. मध्ययुगीन काळखंडात पुढील सतीचे भागात वर्गीकरण झाले.
सहगमन - सह स्वतः आणि गमन जाणे. युद्धात किवां काही कारणास्तव मृत्यु झालेल्या पतीच्या देहा बरोबर जळत्या अग्निचितेवर स्वतः देह अर्पण करणे.♍माहिती सेवा गृप पेठवड़गाव अनुमरण - जेव्हा पतीचा मृत्यू होतो.पण दुसऱ्या कुठल्यातरी ठिकाणी त्यावेळेस पतीधर्म जागवून पतीच्या पादुकांबरोबर पतीच्या मृत्यूनंतर पतिच्या देहा बरोबर जळत्या अग्नि चितेवर स्वतः देह अर्पण करणे.
तसा विचार केला तर वैदिक संस्कृतीत सती जाणे हे काही सक्तीचे नव्हते. पण आपण नीट विचार केला तरी सुद्धा सतीशिळा व सतीप्रथा दिसून येते. राज्य स्थापनेसाठी पण त्यानंतर प्रामुख्याने स्त्रियांवर होणारे अपहरण, व्याभिचार वाईट विचारांची व्याप्ती वाढली जायची. सतीप्रथा हि काही वैदिक संकृतीशी निगडीत नव्हती. पतीमृत्यू नंतर मिळणारा वाव हा स्त्रियांसाठी अतिशय क्रूर असायचा.♍अश्या सती गेलेल्या स्त्रियांचे चित्र व त्यांच्या काही शौर्यगाथा दगडीशिळांवर कायमचे स्थानबद्ध होऊ लागले. त्यांचे हे कार्य सुद्धा भावी पिढीला कळण्यासाठी “सतीशिळा” बनवू जाऊ लागल्या.भारतात आपल्याला अनेक निरनिरळ्या समाजातील वीरगळीं दिसतात. त्यापैकी काही वीरगळी आपल्याला शिवमंदिर व काही शेतात वीरगळ अस्थावस्त पडलेल्या पहावयास मिळतात.♍
Tags
माहिती