गुगल' बनलं आधुनिक 'चित्रगुप्त'

'गुगल' बनलं आधुनिक 'चित्रगुप्त' 

```

.        📯 दि.  ३० जूलै २०२० 📯

फेसबुक लिंक https://bit.ly/2Gab4tg
  .         सध्या डिजिटल युग सुरू झाले आहे. घरबसल्या आपण देशाविदेशातून विविध प्रकारच्या खरेदी करू शकतो. आपल्या मित्र मैत्रिणींशीही डिजिटल मीडियाच्या माध्यमातून गप्पा मारतो. स्मार्ट फोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आपल्या जीवनाची अनेक सिक्रेट, आवडी निवडी जी आपल्या कुटुंबाला किंवा मित्रांना माहीत नसतात, ती आपण या फोनच्या माध्यमातून जतन करत असतो.  मग ते चॅट असो, खरेदी असो किंवा पॉर्न फिल्म पाहणे असो... मात्र या सगळ्यांची गुगलवर नोंद होत असते आणि त्या ठिकाणी चक्क आपल्या चारित्र्याचा, आवडीनिवडींचा एक रिपोर्ट तयार होत असतो.
त्यामुळे गुगलला आधुनिक चित्रगुप्त म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आपण या जाळ्यात इंटरनेटच्या निगराणीमध्ये कैद होत आहोत.,आपले मित्र कोण, शत्रू कोण, आपली जन्मतारीख काय, आपण कुठे काम करतो, किती वाजता घरी जातो, कशाने प्रवास करतो ,काय खातो ,काय पितो , किती वाजता झोपतो,  किती वाजता उठतो. तसंच आपले फोटो ,व्हिडीओ, सुखदुःखाच्या गोष्टी, आपले विचार व्यक्त करणा-या पोस्ट... मग त्या डाव्या विचारसरणीच्या असो वा उजव्या, तसेच आपले छंद, आपण कोणत्या मुव्ही पाहतो, कोणती पुस्तकं वाचतो... या सर्व आपल्या वैयक्तिक बाबी असल्या, तरीही  हा सर्व डेटा गुगलकडे सेव्ह होत असतो. धक्कादायक बाब म्हणजे या डेटाचा आता बाजार सुरू झाला आहे. तुमची वैयक्तिक माहिती विकली जाऊ लागली आहे.


गुगल' बनलं आधुनिक 'चित्रगुप्त' !

तुमचा ई-मेल आयडी ,तुमचं फेसबुक अकाऊंट ,तुमचा व्हाट्सअॅप नंबर,तुमची जन्म तारीख या सर्वांवर सदैव जाहिरातींचा मारा सुरू असतो. आता फक्त जाहिराती सुरू आहेत. भविष्यात लग्नासाठी मुलाचा किंवा मुलीचे कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे अक्षरशः कर्मपत्रिका  गुगलवर मिळाली तर नवल वाटू देऊ नका.कारण तुम्ही जन्मल्यावर जशी जन्मपत्रिका तुमच्या कुटुंबाजवळ असते तशी तुमची कर्मपत्रिका आता गुगलकडे आहे, हे विसरून चालणार नाही.
त्यामुळे कमी पैशात मिळणारा डेटा कसा वापरायचा हे स्मार्टफोन वापरणाऱ्यांनी स्मार्टपणे समजून घेतले पाहिजे
.
____________________________

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম