३० आॉगष्ट "ईमेल" चा वाढदिवस

 

३० आॉगष्ट "ईमेल" चा वाढदिवस



 आणि हा शोध भारतीयाने लावला 



फेसबुक लिंक https://bit.ly/3lrzsH3
आज-काल ई-मेल पत्ता किंवा खातं असणं हा आपल्या बायोडेटाचा अविभाज्य भाग झालाय. त्याशिवाय तुम्हाला फेसबुकवर अकाऊंट सुरू करता येत नाही की गूगलचा बहुचर्चित अँड्राईड फोनही वापरण्यापूर्वी तुमच्याकडे जीमेल असणं गरजेचं आहे. या ईमेलचा शोध कसा आणि कुणी लावला याविषयी आपल्याला काही देणं-घेणं नसतं. पण आपल्यासाठी अभिमानाची बाब अशी की ईमेलचा शोध एका भारतीयाने लावलाय. त्याहीपेक्षा मुंबईकरांसाठी कॉलर ताठ करण्याचं कारण म्हणजे या भारतीयाचा जन्म मुंबईत झाला.


३० आॉगष्ट "ईमेल" चा वाढदिवस

तसंही हल्लीच्या तरूणाईचं बऱ्यापैकी कम्युनिकेशन व्हॉट्स अप किंवा एसएमएसवर होत असलं तरी ई-मेलची गरज संपलेली नाही, किंवा भविष्यातही संपेल असं वाटत नाही. 
आज प्रत्येकजण आपापल्या सोईप्रमाणे आणि आवडीप्रमाणे वेगवेगळ्या सोईप्रमाणे ईमेल वापरतो. म्हणजे कुणाचा पत्ता जीमेलचा असतो तर कुणाचा याहूमेलचा.. तर कुणाचा आऊटलूक किंवा हॉटमेल... ईमेल सेवा पुरवणाऱ्या बहुतेक कंपन्या अमेरिकी असल्या तरी सर्वात आधी ईमेलचा शोध एका भारतीयाने लावलाय, याचा आपल्याला नक्कीच अभिमान असायला हवा.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,नागरिकत्व आणि शिक्षणाने अमेरिकी असलेल्या पण भारतीय वंशाच्या व्ही ए शिवा अय्यादुराई या मुलाने वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी ईमेल या प्रोग्रामची निर्मिती केली. त्यावेळी त्यांने आपल्या शोधाचा कॉपीराईटही घेतला होता. त्यावेळी कॉम्प्युटर सॉफ्टवेअरसाठी पेटंटची व्यवस्थाच आस्तित्वात नसल्याने फक्त कॉपीराईट हक्कांची नोंदणी करावी लागे.
1978 मध्ये व्ही ए शिव अय्यादुराई याने बनवलेल्या कॉमप्युटर प्रोग्रामला 'ईमेल' असं नाव दिलं आणि संपर्क यंत्रणेतील एका क्रांतीचं बीजारोपण झालं.
व्ही ए शिवा अय्यादुराई याने 1978 मध्ये जरी ईमेलचा प्रोग्राम तयार केला असला तरी ईमेलचा प्रवर्तक किंवा जन्मदाता म्हणून त्याला त्याचं श्रेय मिळण्यासाठी आणखी चार वर्षांचा अवधी जावा लागला. 30 ऑगस्ट 1982 रोजी अमेरिकी प्रशासनाने शिवा अय्यादुराई यानेच ईमेलचा शोध लावल्याचं जाहीर केलं. कारण 30 ऑगस्ट 1982 रोजी म्हणजे आजपासून 32 वर्षांपूर्वी त्याच्या नावावर ईमेलचं संशोधन अधिकृत रित्या जमा झालं म्हणून आज ईमेलचा वाढदिवस जगभरात साजरा होतोय.
थोडक्यात काय तर ईमेल सारख्या क्रांतिकारी संपर्क व्यवस्थेची सुरूवात ही काही बिग बजेट प्रकल्पातून झालेली नाही. किंवा पेन्टागॉन, मिलिट्री, अर्पानेट, एमआयटी यांच्यासारख्या संशोधनाची गंगोत्री समजल्या जाणाऱ्या ठिकाणी लाखो-कोट्यवधी रूपये खर्चूनही झालेली नाही. त्याउलट ई-मेल सारख्या संपर्क व्यवस्थेचा प्रोग्राम हा अतिशय जटील आणि खर्चिक बाब अशीच या संशोधनाची गंगोत्री असलेल्या संस्थाचं मत होतं.
मुंबईत जन्मलेल्या शिवा अय्यादुराई यांच्या कुटुंबाने ते फक्त सात वर्षाचे असताना मुंबईतून अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि एक भारतीय एक मुंबईकर अमेरिकी झाला.. 2 डिसेंबर 1963 रोजी मुंबईत जन्मलेले व्ही ए अय्यादुराई आज पन्नास वर्षांचे आहेत.
वयाच्या चौदाव्या वर्षी अय्यादुराई यांनी न्यूयॉर्क विद्यापीठातील कोरान्ट इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सच्या समर स्पेशल अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्यांना कॉम्प्युटर प्रोग्रामिंग शिकायचं होतं, म्हणून त्यांनी या इ्न्स्टिट्यूटची निवड केली. त्यानंतर त्यांनी न्यू जर्सीच्या लिविंगस्टन हायस्कूलमधून ग्रॅज्युएशन केलं. पदवीचं शिक्षण करत असतानाच अय्यादुराई यांनी न्यू जर्सीच्या यूनिवर्सिटी ऑफ मेडिसीन आणि डेन्टीस्ट्रीमध्येही काही काळ संशोधन केलं. ते तिथे रिसर्च फेलो होते.
याच न्यू जर्सीच्या यूनिवर्सिटी ऑफ मेडिसीन आणि डेन्टीस्ट्रीमध्ये असताना शिवा अय्यादुराई यांच्या चिकाटी आणि कॉम्युटर शास्त्र शिकण्याच्या वेडाने प्रभावित होऊन कॉम्प्युटर लॅबोरेटरी नेटवर्कचे संचालक डॉ. लेस्ली मिशेलसन यांनी तत्कालीन कागदी पत्रव्यवहाराला पर्यायी असा कॉम्प्युटर प्रोग्राम बनवण्याचं आव्हान दिलं.
त्यानुसार त्यांनी आंतर कार्यालयीन पत्रव्यवहाराचा बारकाईने अभ्यास केला. त्यातील आवकृजावक यंत्रणेचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर इनबॉक्स, आऊटबॉक्स, ड्राफ्ट, कार्बन कॉपी, फोल्डर, अॅड्रेस बुक, अटॅचमेंटसाठी वापरायच्या पेपरक्लिप्स याचा इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीममध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी तब्बल 50 हजार लाईन्सचा प्रोग्राम कोड तयार केला. हा प्रोग्राम कोड म्हणजेच आज आपण लीलया वापरत असलेला ईमेल.♍
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম