भारतातील खजिने : हे इंग्रजानाही लुटता आले नाही
दिनांक २१ आॅगस्ट २०२०
भारतात पुर्वी काठीला सोने बांधून लोक फिरायचे तर घराघरातुन सोन्यचा
धुर निघायचा असे म्हटले जाते. ही अतिशयोक्ती नाही हे सोन्यची नाणी पाहिल्यावर पटते. त्याकाळी एवढी सम्रुध्दी होती की सामान्य माणूस सुध्दा सोन्याचांदिच्या ताटात जेवत असे. प्राचन भारतात सोन्यलाकवडिची किंमत होती.त्याकाळी सोन्यचा वापर आयुर्वेदिक आौषधात पण सढळ हाताने होत होता.पैलवान लोक पण अक्षरशः सोने खात असत.वैभवशाली भारताबद्दल ऐकूनच अनेक परदेशी लोकांनी भारतात येऊन कधी तलवारीच्या तर कधी बंदुकीच्या जोरावर आपले खजिने लुटले.
भारतातला खजिना चोरून आपापल्या देशात श्रीमंती आणि प्रतिष्ठा मिळवली. परंतु आजही भारतात असे अनेक खजिने आहेत जे ब्रिटिशांनाही लुटता आले नाहीत.
त्याकाळचे अनेक राजे, संस्थानिक किंवा शासक आपले खजिने वाचवण्यासाठी त्याबद्दलची माहिती गुप्त ठेवत असत किंवा त्यांच्याबद्दल दंतकथा पसरवत असत. पाहूया त्यापैकी काही गुप्त खजिने आणि दंतकथांबद्दल…
💠 बिंबीसारचा खजिना
इ.स.पूर्व पाचव्या शतकातील मगधचा राजा (बिहार) बिंबिसार याला मौर्य साम्राज्याचा जनक मानले जाते. अशी दंतकथा प्रसिद्ध आहे की बिहारच्या राजगीर येथे बिंबिसाराचा खजिना लपविण्यात आला होता. एकाच दगडात कोरलेल्या सोनभांडार गुहांमध्ये पुरातन लिपीमध्ये लिहलेले शब्द अद्याप कुणाला वाचता आले नाहीत. असे मानले जाते की त्या लिपीतच खजिन्याशी संबंधित नकाशाचे रहस्य लपले आहेत. ब्रिटिशांनी खजिना शोधण्यासाठी तोफा लावल्या परंतु त्यांनाही खजिना सापडला नाही.
💠श्री मोक्काम्बिका मंदिर खजिना :
कर्नाटकच्या पश्चिम घाटात कोलूर येथे श्री मोक्काम्बिका मंदिर आहे. इथल्या पुजाऱ्यांच्या सांगण्यांनुसार मंदिरात सापाचे खास चिन्ह बनवलेले आहे. प्राचीन काळापासून नागदेवता लपवलेल्या खजिन्याचे रक्षण करतात असे भारतात मानले जाते. या मंदिराच्या तळघरात प्रचंड संपत्ती असल्याचे बोलले जाते. त्यांच्या रक्षणासाठीच सापाचे चिन्ह तिथे कोरण्यात आले आहे. मात्र या संपत्तीचा शोध किंवा किती संपत्ती आहे याचा कुणालाही अंदाज लागला नाही.
💠 मीर उस्मान अलीचा खजिना :
हैद्राबादचा शेवटचा निजाम मीर उस्मान अली त्याकाळातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता. १९३७ मध्ये प्रतिष्ठित अशा टाईम मॅगझीनमध्ये त्यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती सांगितले होते. आपल्या शासनकाळात त्याने भरपूर प्रमाणात संपत्ती गोळा केली होती. अशी दंतकथा प्रसिद्ध आहे की, किंग पॅलेसच्या तळघरात त्याने आपली सगळी संपत्ती लपवली होती. त्यात महागडे हिरे, दागिने, रत्ने समाविष्ट होती. मीर उस्मान अलीच्या मृत्युसोबतच त्याच्या खजिन्याचे रहस्य गडप झाले.
__________________________