तिथे’ आहेत तब्बल 1 कोटी शिवलिंग

 ‘तिथे’ आहेत तब्बल 1 कोटी शिवलिंग 

http://bit.ly/3ykPdp6
       🕉 बंगळुरू : एकच परमतत्त्व अनेक नाम-रूपांनी नटलेले आहे, अशी वेदांची शिकवण आहे. (एकम् सत विप्रा बहुधा वदन्ति, एको देवो सर्व भुतेषु गुढः). त्यामुळे याच एकमेवाद्वितीय परमतत्त्वाची आपल्या देशात अनेक देवी-देवतांच्या रूपात उपासना होत असते. श्रावण महिन्यात विशेषतः शिवोपासनेला अधिक महत्त्व आहे. आपल्या देशात आसेतुहिमाचल सर्वत्र भगवान शिवशंकराची अनेक मंदिरे आढळतात. प्रत्येक स्थळाचे काही तरी वेगळे वैशिष्ट्यही असते. कर्नाटकात एक ठिकाण असे आहे जिथे दोन-तीन नव्हे तर तब्बल एक कोटी शिवलिंग पाहायला मिळतात.
कर्नाटकच्या कोलार येथील कोटीलिंगेश्वर मंदिरात हे शिवलिंग आहेत. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, अहल्येचे पती गौतम ऋषींच्या शापानंतर इंद्राने शापमुक्तीसाठी इथे शिवलिंगाची स्थापना केली होती, असे सांगितले जाते. इंद्राने येथील शिवलिंगाचा दहा लाख नद्यांच्या पाण्याने अभिषेक केल्याचीही कथा सांगितली जाते. येथील सर्वात मोठ्या शिवलिंगाची उंची 108 फूट आहे. मंदिराच्या चारही बाजूंनी छोटी-मोठी 1 कोटी शिवलिंगे आहेत. अनेक लोक आपल्या प्रार्थनेला फळ आल्यावर याठिकाणी नवे शिवलिंग स्थापित करीत असल्याने तिथे इतके शिवलिंग दिसतात. दुर्गा माता, गणेश आणि कार्तिकेय यांच्याही प्रतिमा याठिकाणी आहेत.
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

तिथे’ आहेत तब्बल 1 कोटी शिवलिंग

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম