केस गळतात तर हे उपाय करा

केस गळतात तर हे उपाय करा

बदलत्या वातावरणाचा केसांवर विपरित परिणाम होत असतो. बाजारात मिळणार्या केमिकलयुक्त शॅम्पू, हेअर ऑइल, हेअर क्रिमच्या अतीवापरामुळे केस गळती वाढते. अकाली टक्कल पडण्याची वेळ पुरूषांसह महिलांवरही आल्याची उदाहरणे आहेत. केस गळती थांबवण्यासाठी म्हणूनच काही उपाय योजले पाहिजेत. त्याच्या काही टिप्स अशा.....
फेसबुक लिंक https://bit.ly/3gAX1JJ
♍ रोज बदामाच्या तेलाने केसांची चांगली मालिश करून बेसनाने केस धुवावेत
♍ दही, लिंबू किंवा आवळ्याचा रस बेसनात मिसळून तयार झालेल्या पेस्टने केस धुवावेत
♍ केस धुतल्यानंतर टर्किश टॉवेल गरम पाण्यात भिजवून त्याने केस बांधून गरम पाण्याची वाफ द्यावी
♍ रात्री झोपण्याच्या आधी केसांना लिंबूच्या रसाने मालिश करावी
♍ त्रिफळा चुर्णाचे सेवन करावे व त्याने आठवड्यातून एकदा केस धुवावेत
♍ शरीरावरील अतिरिक्त चरबी घालवण्यासाठी अचानक जेवण बंद अथवा कमी केल्याचा केसांवर प्रतिकूल परिणाम जाणवतो
♍ केसांचे धुळ मातीपासून संरक्षण करा, अधुनमधुन केसांवर कंगवा फिरवत रहा.
♍ गाजर बारीक करून त्याचा लेप लावल्याने केस तुटणे थांबते.
♍ केस विरळ आहेत आणि ते वारंवार गळतात. अशी स्थिती असल्यास केस मोकळे करून दररोज सकाळी खुल्या हवेत फिरायला गेले पाहिजे.
♍ आवळा चुर्ण लिंबाच्या रसात मिसळून तयार झालेला लेप केसांना लावल्याने केस काळे, मुलायम व मजबूत होतात.
♍ लिंबू तसेच बोराच्या पानांचा लेप लावल्याने नवीन केस उगवतात व केस लांब होतात
♍ रात्री केसांना आवळ्याचा रस लावावा. तसेच कच्चा कोबी, कांदा व कच्चा पालक खावा
♍ मेथीचे दाणे बारीक करून त्याचे चुर्ण केसांना लावल्याने केस गळणे थांबते. 
 माहिती सेवा गृप पेठवड़गाव ♍ दररोज मानेचे व्यायाम केले पाहिजेत
♍ केस दिवसभरातून किमान दोन वेळा तरी विंचरले पाहिजेत.
♍ आवळा, चमेली यांचे तेल केसांना लावले पाहिजे.
♍ दररोज पौष्टीक आहार घ्यावा. त्यात सुका मेवा, जाम, पपई, आंबा, संत्री, गाजर, आवळा, पालक, कोबी आदी क्षारयुक्त फळभाज्यांचा त्यात समावेश असावा.
♍ केस नेहमी स्वच्छ ठेवा. केस धुण्यासाठी केमिकलयुक्त उत्पादने वापरण्यापेक्षा नैसगिक उत्पादने वापरणे उत्तम
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম