असे बंद करता येईल तुम्हाला गुगलचे ‘लोकेशन ट्रॅकिंग
. दि. २३ आॅगष्ट २०२०
फे बु लिंकhttps://bit.ly/2Yqez4R
तुम्ही जर अँड्रॉईड आणि आयओएस डिवाईसवाला स्मार्टफोन वापरत असाल तर तुमचे लोकेशन गुगलद्वारे सहज ट्रॅक करता येते. या दोन्ही वर्जनमधील स्मार्टफोनमध्ये लोकेशन हिस्ट्री ऑफ केल्यानंतरही युजर्सचे लोकेशन गुगलमार्फत ट्रेस केले जाऊ शकते. गुगलकडून ही माहिती एखाद्या संबंधित एजन्सी किंवा तपास यंत्रणांना गरज पडल्यास पुरविण्यात येते.
पण आता गुगलकडून ट्रेस करण्यात येणारे तुमचे लोकेशन हिस्ट्री बंद करण्याचा तुमच्याकडे पर्याय असून तुम्ही गुगल लोकेशन सेटींग्जमध्ये जाऊन ‘गुगल लोकेशन हिस्ट्री’ ऑफ करु शकता. तसेच तुम्ही तुमचा रेकॉर्डेड लोकेशन डेटाही गुगलच्या ‘माय अॅक्टीव्हिटी पॅनलमध्ये जाऊन डिलीट करू शकता. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,तुमच्या मोबाईलचे लोकेशन तुम्ही चालू ठेवा अथवा नको, तुमच्यावर गुगल घारीसारखी नजर ठेऊन आहे. गुगल तुम्ही कुठे जाता, काय खाता, काय करता याचा संपूर्ण लेखाजोखा ठेवत असल्याचा धक्कादायक खुलासा एका न्यूज एजन्सीच्या अभ्यासात झाला आहे. तुमचे गुगल मॅप, सर्ज इंजिन आणि हवामान लोकेशन यावरुन गुगल तुमचे लोकेशन ट्रॅक करत असते.
‘लोकेशन ट्रॅकिंग’ बंद करण्यासाठी सर्वप्रथम सेटींग्जवर क्लिक करा. त्यानंतर गुगल आणि गुगल अकाउंटवर क्लिक करा आणि नंतर data & personalisation tab. त्यानंतर web & app Activity क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर Toggle Web & App Activity off हा पर्याय उपलब्ध होईल.
____________________________
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
_*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛