८० वर्षापूर्वी ॲडॉल्फ हिटलरच्या हस्ते सिद्धनाथ काणेंचा गौरव
- फे. बु लिंक https://bit.ly/2FPCcxu
यवतमाळचे धनवंतरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. मधुसुदन काणे यांचे वडील असलेल्या सिद्धनाथ काणे यांनी आपल्या अंगभूत क्रीडा गुणांच्या कौशल्याने बर्लिंनमध्ये हिटलरलाही प्रभावित केले होते.
बर्लिंनमध्ये ऑलिम्पिकमध्ये भारताला कबड्डी, मलखांब व आट्यापाट्या या खेळाचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी आमंत्रित केले होते. या अस्सल देशी खेळाचे प्रात्यक्षिक दाखविण्याची जबाबदारी अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळावर होती. त्यांनी बर्लिंनला जाण्यासाठी २५ खेळाडूंचे पथक तयार केले. या पथकाचे नेतृत्व डॉ. सिद्धनाथ काणे यांच्याकडे होते.डॉ. सिद्धनाथ काणे यांचे नेतृत्त्वाखाली पाठविले, त्याच्या संपूर्ण खर्च्ची जबाबदारी औंध संस्थानाचा भगवा ध्वज घेऊन हा चमू बेर्लीनला पोहोचला. ऑलिंपिकमध्ये भारतीय व्यायाम पद्धतीचे प्रदर्शन केले. योगासनाचा व्यायाम, साधा व वेताचा मल्लखांब व गादाफरी हे द्वंद यांचे सर्वत्र अतिशय कौतुक झाले. याच पथकात त्यांचे बंधू श्रीपाद दत्तात्रय काणे खेळाडू म्हणून सहभागी झाले होते. या चमूने दंडबैठका, मलखांब, वेताचा मलखांब, गदगाफरी, योगा, आट्यापाट्या, खो-खो या खेळाचे सादरीकरण केले. डॉ. सिद्धनाथ काणे यांनी यावेळी भारतीय व्यायाम पद्धतीचे महत्व व महानता यावर बर्लिंनमध्ये अस्खलीत इंग्रजीतून भाषण केले. या भाषणाचा अनुवाद त्यावेळी जगभरातील अनेक भाषांमधून करण्यात आला होता.
सिद्धनाथ काणे यांच्या खेळाने प्रभावित झालेल्या हिटलरने त्यांचा स्वस्तिक आकाराचे प्लॅटिनम मेडल स्वत:च्या हाताने प्रदान केले होते.
अशा या कर्तुत्वान क्रांतिकारक व प्रखर राष्ट्रभक्ताचे १७ डिसेंबर १९५६ रोजी यवतमाळ येथे दु:खद निधन झाले. यवतमाळ जिह्यातील सर्व वृत्तपात्रांनी यवतमाळ जिह्यातील राजकीय,सामाजिक व शारीरक क्षेत्रांतील ‘भीष्माचार्य’ निवर्तला अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती.
हिटलर म्हणाले, हा देश पारतंत्र्यात कसा ?
डॉ. काणे यांच्या चमूने जेव्हा कबड्डीचे प्रात्यक्षिक दाखविले तेव्हा जर्मनीचा हुकुमशाह ॲडॉल्फ हिटलर व त्याचा सहकारी गोबेल्स उपस्थित होता. प्रात्यक्षिक पाहिल्यावर हिटलर म्हणाले, ह्यमला आश्चर्य वाटते की, ज्या देशाचा एक खेळाडू प्रतिस्पर्धी संघाच्या पाच-सहा खेळाडूंंना ओढून आणण्याची क्षमता ठेवतो तो देश इतक्या वर्षांपासून पारतंत्र्यात कसा राहू शकतो. कार्यक्रमाचे शेवटी हिटलर यांनी गोबेल्स यांच्यासह डॉ. काणे यांना व्यसपीठवर सन्मानपूर्वक आमंत्रित करून स्वस्तिक आकाराचे ‘एक प्लॅटिनम मेडल’ स्वत: प्रदान करून गौरव केल. त्या स्वस्तिक वर खालील शब्द नमूद केले आहेत. Awarded to Dr. S.K. Kane. India-herr Hitler.सिद्धनाथ काणे यांच्या खेळाने प्रभावित झालेल्या हिटलरने त्यांचा स्वस्तिक आकाराचे प्लॅटिनम मेडल स्वत:च्या हाताने प्रदान केले होते.
अशा या कर्तुत्वान क्रांतिकारक व प्रखर राष्ट्रभक्ताचे १७ डिसेंबर १९५६ रोजी यवतमाळ येथे दु:खद निधन झाले. यवतमाळ जिह्यातील सर्व वृत्तपात्रांनी यवतमाळ जिह्यातील राजकीय,सामाजिक व शारीरक क्षेत्रांतील ‘भीष्माचार्य’ निवर्तला अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती.
Tags
माहिती