हौशी नाटय कलाकार : मोहन घाटपांडे पाटील

 हौशी नाटय कलाकार : मोहन घाटपांडे पाटील 


मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत्त्वाचं नसतं. यशापयशाची गणितं हा धंद्याचा भाग आहे. कलात्मकतेशी त्याचा काहीच संबंध नाही. पण पराकोटीची मेहनत आणि असामान्य प्रतिभा ही आपल्या रंगभूमीने नेहमीच जपली आहे आणि त्याहीपेक्षा गौरवलेली आहे. मराठी रंगभूमी मग अशा रंगकर्मींना खूप सांभाळते, त्यांची काळजी घेते आणि त्यांना नावलौकिक आणि प्रतिष्ठा देते. हौशी नाटय कलाकार  मोहन घाटपांडे पाटील हे नाव असेच मराठी रंगभूमीवर वावरत आहे.
माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते याचं सर्वात मोठं उदाहरण जिजाबाईचं असू शकतात. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. स्वराज्य संकल्पनेची बी मातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरली. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला तसेच बालपणापासून त्यांना तयार केले.
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील महेकर तालुक्यातील शिंधखेड गावातील लखूजीराजे जाधव म्हाळसाराणी या राजघराण्यात १२  जानेवारी १५९८  रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांना चार मोठे भाऊ होते. माहेरी त्यांनी त्यांनी राजनीती, युद्धकलेत प्रावीण्य मिळवले. याचा उपयोग पुढे शिवरायांना शिक्षण देण्यासाठी कामास आला.
जिजाऊ हि एक स्त्री होती....
स्वराज घडविणाऱ्या स्पुर्तीची ति एक मूर्ती होती...
शहाजी राजेंचे ति एक विर पत्नी होती ....
जाधव घराण्याची ति एक लाडकी लेक होती ...
भोसले घराण्याची ति एक आदर्श सून होती....
आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी ति एक महान माता होती...
स्त्री शक्ती चे प्रतिक असनाऱ्या त्या एक स्त्री उद्धारक माता होत्या...
जगातील प्रतेक स्त्री यांनी ज्यांचा आदर्श घ्यावा...
अशा त्या आदर्श माता होत्या ...
अशा जिजाऊंची महती सांगणारी नाटिका पुणे जिल्हातील बेल्हे ता. जुन्नुर  गावचे मोहन घाटपांडे पाटील व त्यांची सुपुत्री व्रूषाली घाटपांडे पाटील व मुलगा साईराज हे सादर करतात. नाटकाची हौस हे तर कारण आहेच. शिवाय जिजाऊंची महती सर्व सामान्यापर्यन्त पोहोचवणे हा हेतु आहे.
‘परंपरा उलगडल्याशिवाय आधुनिकतेला अर्थच उरत नाही आणि समाज कळल्याशिवाय व्यक्ती कळत नाही.’ तेव्हा वर्तमान कळायला हा मराठी रंगभूमीचा इतिहास महत्त्वाचा आहे.
आता इतिहास म्हणजे रूक्ष सनावळ्या आणि घटनांची जंत्री नसते. ह् ही लक्षात घ्यायला हवे.
या साठी त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित "जाणता राजा" अंतर्गत "मी जिजाऊ बोलतेय" हे नाटय निवडले आहे. १ जुन २०१२ साली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचेसमोर त्यांनी आपली कला सादर करून वाहवा मिळवली आहे. व्रुषाली ही राजमाता जिजाऊ तर मुलगा साईराज हा छ. शिवाजी महाराज व अौंरगजेब तर स्वत: मोहन घाटपांडे पाटील सर हे शाहीर, पंत, दादोजी कोंडदेव व रांझे गावचा पाटील ही भुमिका करतात.
'साहित्य ही अंतरंगाची अभिव्यक्ती असेल, तर ते साहित्य म्हणजे फक्त काव्य, कथा, कादंबरीच आहे का? साहित्य म्हणजे, मनाला काहीतरी भावलेले, जीवन जगताना अनुभवलेले, जगण्याचे काहीएक निरीक्षण असते आणि हेच सारे नाटकातही असते. फक्त नाटक हे दृश्यकाव्य असते. ते आपण वाचत नाही, बघतो.
कलाकृती लोकांपुढे याव्यात या उद्देशाने घाटपांडे सरानी बरीच मेहनत घेतली आहे. स्पर्धेत अडकण्यापेक्षा जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत नाटक पोहोचण्यासाठी त्यांनी  अधिकाधिक प्रयत्न केला आहे. कुठल्याही क्षेत्रात अनेक वर्षांत बहुविध चांगल्या-बऱ्या-वाईट गोष्टींची भर पडत असते. त्यातून वेगवेगळे विचारप्रवाह तयार होतात. समाजाच्या प्रवासाच्या साऱ्या खुणा कमी-अधिक प्रमाणात कलाकृतींवर पडतात. त्यातून नाटकासारख्या जिवंत माध्यमावर तर त्या त्या काळाची चिन्हे उमटलेली दिसतातच दिसतात.
आपण कुठल्या नाटय़परंपरेचे पाईक आहोत आणि या परंपरांना आपण नेमके कुठले वळण देऊ पाहत आहोत, याचा विचार घाटपांडे सर यानिमित्ताने करत आहेत.त्यांना माझ्या शुभेच्छा.

अनिल पाटील पेठवडगाव 

9890875498

हौशी नाटय कलाकार : मोहन घाटपांडे पाटील
प्रयोगासाठी संपर्क 8830368356

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম