तिथे’ तरंगते साडेसात किलोची दगडी मूर्ती

 ‘तिथे’ तरंगते साडेसात किलोची दगडी मूर्ती  


.        दि. २२ सप्टेंबर  २०२०

फेसबुक लिंक https://bit.ly/33UEEv8

  .         देवास-(म. प्र) मध्यप्रदेशातील देवासच्या नृसिंह घाटावरील भमोरी नदीत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘डोल ग्यारस’ (एकादशी)ला म्हणजेच गुरुवारी भगवान नृसिंहाची साडेसात किलो वजनाची पाषाणातील मूर्ती तरंगली. हे दृश्य पाहण्यासाठी दूरवरून हजारो श्रद्धाळू येत असतात. सायंकाळी मिरवणुकीने ही मूर्ती नदीवर नेण्यात आली आणि पावणेसहा वाजता ती पाण्यावर ठेवण्यात आली. यावेळीही ही मूर्ती तीनवेळा पाण्यावर तरंगली.

तिथे’ तरंगते साडेसात किलोची दगडी मूर्ती

तीनवेळा ही मूर्ती पाण्यावर तरंगल्यास आगामी वर्ष सुखाचे ठरते, असे तिथे मानले जाते. नृसिंह मंदिरातून ही मूर्ती पालखीतून नदीवर आणण्यात आली. त्यावेळी अन्यही मंदिरांच्या पालख्या नदीकाठावर आल्या होत्या.
नदीवर पुजार्यांनी स्नान करून आरती केल्यावर ही पाषाण मूर्ती नदीत सोडण्यात आली. त्यावेळी ती पाण्यावर तरंगू लागली. तीनवेळा असे झाल्यानंतर मूर्तीला हार अर्पण करण्यात आले. हा हार अर्पण करण्यासाठी तिथे बोली लावली जाते. उद्योगपती यशराज टोंग्या यांनी सर्वाधिक म्हणजे एक लाख एक हजार रुपयांची बोली लावून सर्वप्रथम हार अर्पण करण्याचा मान मिळवला. नदीत मूर्ती तरंगवण्याच्या या प्रथेला 151 वर्षांपेक्षाही अधिक काळाचा इतिहास आहे.

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম